पाऊसगाणी

पावसाळी वातावरण असले किंवा पाऊस पडायला लागला की प्रत्येकालाच गाणी आणि कविता सुचायला लागतात. प्रत्येकजण लेखक किंवा कवी जरी नसला तरी मनात आलेले विचार शब्दात व्यक्त करावेसे वाटतात. आणि अर्थातच तुम्हाला ते इतरांनीही वाचायला हवे असतात. त्यासाठी इंटरनेटपेक्षा चांगले व्यासपीठ कुठले ? इंटरनेटवर त्यासाठी वेबसाईट्स, ब्लॉग उपलब्ध आहेत –

www.e-poems.org/rain.html,
www.marathiworld.com/muktangan,
www.geocities.com/Heartland/1133/rainpoems.html,
www.tooter4kids.com/classroom/Rain_poems.htm,
www.mothergoosecaboose.com/rainpoems.html,
www.poemhunter.com/poem/rain-4,
http://www.poemsabout.com/rain,
http://aamhimarathi.blogspot.com,
http://majhyalekhnetun.blogspot.com

इंटरनेटवर अमेरिकेतल्या लहान मुलाने लिहीलेली ही कविता वाचण्यासारखी आहे –
If I were the rain, I would drop so lightly.
But, when I am mad, I’ll drop hard!
When I am sad, I won’t drop at all.
When it’s cold, I’ll turn into snow.

हवामानाचा अंदाज
आकाशनिरिक्षण ते रेडिओ, टिव्हीवरच्या बातम्यांवर आपण हवामान अंदाजासाठी अवलंबून राहात होतो. इंटरनेटमुळे हवामान खात्याच्या वेबसाईटवर अत्यंत ताज्या घडामोडी उपलब्ध असतात. http://www.imd.gov.in ह्या हवामान खात्याच्या वेबसाईटवर होमपेजलाच भारताचा नकाशा दिला आहे.आपल्याला हव्या असलेल्या गावावर क्लिक केल्यास त्या गावाचे संपूर्ण हवामान अंदाज आपल्याला वाचायला मिळते. आजचे तापमान, पाऊस, आद्रता, सुर्योदय, सूर्यास्तची सुध्दा माहिती वाचायला मिळते. भारताच्या नकाशावर दाखवलेले ढगही आपल्या पावसाचा अंदाज सहज देतात. येणा-या पावसाच्या, वादळाच्या, भूकंपाच्या धोक्याच्या सुचनाही साईटवर आहेत. त्यामुळे बरीचशी हानी टाळता येते. शेतक-यांना उपयोगी पडाव्यात म्हणून हवामान खात्याचे स्वत:चे बुलेटीनही निघते. त्याच बरोबर भारतात अनेक ठिकाणी असणा-या हवामान खात्याच्या वेबसाईटच्या लिंक्सही आहेत. फार चांगली डिसाईन केलेली नसली तरी माहितीच्या दृष्टिने उपयुक्त अशी वेबसाईट आहे.

चला ट्रेकिंगला
पावसाळा सुरु झाला की निर्सग प्रेमींना ट्रेकिंगचे वेध लागतात. हिरवे गर्द डोंगरावरचा थरारक अनुभव केवळ अविस्मरणीयच. ह्यासाठी ट्रेकिंगची तयारी मात्र अतिशय चोख हवी. आपण जाणार अहोत त्या ठिकाणची माहिती, तहान लाडू, भूक लाडू, जुजबी औषधे हवी. ट्रेकिंगच्या प्लॅनींगसाठी खालील साईटस बघायलाच हव्या –
www.junglelore.net, sahyadri.himadventures.net, bhatkanti.blogspot.com,
www.maharashtraweb.com/lifeleis/MahaAdv.asp, www.giridarshan.com/atoz.html,
www.indiatravelogue.com/adve/trek/trek30.html, www.sahyaadri.com, www.maharashtratourism.net/trekking/index.html

जागतिक पर्यावरण दिन
World’s Environment Day (WED) साजरा करण्याची संकल्पना युनायटेड नेशन्सनी प्रथम १९७२ मध्ये आणली. ह्या दिवशी पर्यावरणा विषयी जागृती समाजात व्हावी हा मुख्य हेतू ! ह्या दिवशी जगभरात अनेक कार्यक्रम केले जातात. पोर्स्टस, निबंध स्पर्धा, सायकल यात्रा, वृक्षारोपण, शाळेत आणि महाविद्यालयात अनेक उपक्रम राबवले जातात.
वितळणारा बर्फ एक नवी समस्या. ग्लोबल वॉर्मिंग मुळे ही समस्या भेडसावत आहे. अधिक वृक्ष लावणे हाच त्याच्यावर उपाय आहे. एक मध्यम आकाराचे झाड १० टन एसी इतका गारवा देते तर मग ह्या दिवशी एक तरी झाड लावण्याचा संकल्प करु या.
अधिक माहितीसाठी –
www.unep.org/wed, www.wed2005.org, en.wikipedia.org/wiki/World_Environment_Day,
www.environment-agency.gov.uk/wed/, www.un.org/depts/dhl/environment,
www.environment.gov.au/events/wed/index.html, www.mpcb.mah.nic.in,
www.cleanairnet.org/caiasia/1412/article-59454.html

ओझॉन
पृथ्वी भोवती वातावरणाचे सुरक्षित आवरण आहे. त्यात ओझॉन गॅस (O3) सूर्याची प्रखर किरणं रोखण्याची महत्त्वाची कामगिरी बजावतो. परंतु ओझॉन गॅसची ही पातळी हळूहळू कमी होत चालली आहे त्यामुळे सूर्याचे प्रखर किरण पृथ्वीवर सहजपणे येऊ शकतात. त्याचा परिणाम असा की माणसांना त्वचेचा कॅन्सर होऊ शकतो. ह्या प्रखर किरणांचा परिणाम पीकांवरपण दिसून आला आहे. घटत्या ओझॉन पातळीच्या विषयीच्या अधिक माहितीसाठी –
en.wikipedia.org/wiki/Ozone_layer, en.wikipedia.org/wiki/Ozone_depletion,
www.physicalgeography.net/fundamentals/7e.html,
www.umich.edu/~gs265/society/ozone.htm, www.meteo.lv/public/28974.html,
www.livescience.com/environment/071003-ozone-hole-shrinks.html,
www.epd.gov.hk/epd/english/environmentinhk/air/ozone_layer_protection/wn6_info_olp_ue_c.html, www.faqs.org/faqs/ozone-depletion/intro,
www.nature.com/nature/journal/v441/n7089/abs/nature04746.html,
www.msnbc.msn.com/id/21120139/, www.newton.dep.anl.gov/askasci/env99/env106.htm

जमिनीचे प्रदुषण
मानवाची प्रगती कधीकधी त्यालाच शाप ठरु शकते. वाढते जमिनीचे प्रदुषण हा त्याचा परिणाम आहे. कारखान्यातील नको असलेले पदार्थ, विषारी खनिजे, किटकनाशके, जमिनी खालिल ‘स्टोरेज टॅंक’ हे जमिनीचा कस घालवून तिला प्रदुषित करत असतात. पेट्रोलियम, हायड्रोकार्बन आणि विषारी किटकनाशकांचा ह्यात मुख्य हात आहे. जमिन प्रदुषित झाल्यामुळे त्याचे दुषित परिणाम तेथील पाण्यावर आणि शेतीप्रधान प्रदेश असेल तर पीकांवर लगेच दिसून येतात. ह्याचे वाईट परिणाम अर्थातच त्या परिसरातील लोकांच्या तब्येतीवर होतात. जमिनीचे प्रदुषण टाळायचे असल्यास आणि जनजागृती करायची असल्यास ह्या साईट्सना भेट द्यायलाच हवी –
en.wikipedia.org/wiki/Soil_contamination, www.springerlink.com/link.asp?id=100344, www.environmental-expert.com/magazine/springer/wasp/index.asp,
www.all-science-fair-projects.com/category120.html,
www.botany.uwc.ac.za/sci_ed/grade10/ecology/conservation/poll.htm,
www.jnu.ac.in/Syllabus/mscsyll2002.doc , envfor.nic.in/paryaabs/v21n14/em-34-pp.doc,
greenpack.rec.org/soil/problems_and_threats_to_the_soil/03-03-03-05.shtml

– सौ. भाग्यश्री केंगे