नीलकमल

नीलकमल किंवा Blue water lily आपल्या इथे बागेतली शोभा वाढवण्यासाठी विशेष लावली जातात. ह्याला बोली भाषेत बहुतेक वेळा कमळ म्हणूनच संबोधले जाते. नीलकमळाचे फुल साधारण १०-१५ सेंमी व्यासाचे असते. त्याच्या पाकळ्या आकाशी निळ्या, जांभळ्या रंगात असतात आणि फुलाच्या मध्यभागी त्याला पिवळसर झाक असते. कळी पाण्याच्यावर आली की तीन-चार दिवसांनी सकाळी नऊच्या दरम्यान फुल उमलते आणि दुपारी तीन नंतर मिटायला लागते. इजिप्तच्या संस्कृतीत नीलकमळाला अतिशय महत्त्व आहे. छायाचित्रकारांना ह्या फुलांची भूरळ न पडली तरच नवल.
अधिक माहितीसाठी –

en.wikipedia.org/wiki/Nymphaea_caerulea,
www.plantzafrica.com/plantnop/nymphnouch.htm,
www.flowersofindia.net/catalog/slides/Blue%20Water%20Lily.html ,
www.thekeep.org/~kunoichi/kunoichi/themestream/egypt_waterlily.html,
www.touregypt.net/featurestories/lotus.htm,
www.flickr.com/photos/konaboy/42783679,
books.google.co.in/books?isbn=1564147827,
www.digitalphotoartistry.com/waterlilypictures/waterlilypictures001.html

बोगनवेल
बोगनवेल किंवा Bougainvillea आपल्या लाल, गुलाबी, राणी, पिवळ्या, पांढ-या रंगानी आपले लक्ष वेधून घेतो. ही फुल मूळ ब्राझिलची. फ्रेंच सैनिक लुइस बोगनवेला ही प्रथम सापडली आणि त्याने ती युरोप मध्ये रुजवली. त्यानंतर सा-या जगभरात ही फुले आता रुजली आहेत. ह्या फुलांना पेपर फुलेही म्हटले जाते. ही झाडे वेली, झुडूप, कुंडीतही वाढवली जाऊ शकतात. बोगनवेलीचे बोन्सायही खूप लोकप्रिय आहेत. ह्या झाडाला टोकदार काटे असल्यामुळे किडक, पक्षी, प्राणी फारसे त्यांच्या जवळ जातांना आढळत नाही. बोगनवेल बहुतेक वेळा कुंपण किंवा ऑरनमेंटल ट्री म्हणून लावले जाते.
अधिक माहितीसाठी –
en.wikipedia.org/wiki/Bougainvillea , plantanswers.tamu.edu/publications/bougainvillea.html ,
www.floridata.com/ref/B/boug_spp.cfm , www.home-herb-garden.com/bougainvilleas.html,
www.livemint.com/2008/02/14001203/About-bougainvillea.html ,
www.ehow.com/how_2020130_grow-bougainvillea.html,
blog.gardeners.com/2008/02/growing-bougainvillea-indoors.html

तगर
तगर किंवा चांदणी (capejasmine) नावाने ओळखली जाणारी पांढरी फुले बागेत मुबलक प्रमाणत लावली जातात. हे झाड साधारण ६ फुटा पर्यंत वाढते. ह्या फुलांना सुगंध नसतो परंतु ती जवळजवळ वर्षभर फुललेली असतात. हल्ली ह्या मध्ये डबल चांदणी, छोटी चांदणी वगैरे प्रकार तयार करण्यात आले आहे. तगरीचे फुल तोडल्यावर चीकासारखा पांढरा पदार्थ निघतो. ह्याची पाने मात्र अतिशय गडद हिरव्या रंगाची आणि चमकदार असतात. ही फुले पुजेसाठी वापरली जातात. चांदणीचे झाड एकदा रुजले की त्याकडे फारसे लक्ष द्यावे लागत नाही. अधिक माहितीसाठी –
www.ctahr.hawaii.edu/oc/freepubs/pdf/OF-1.pdf, davesgarden.com/guides/pf/go/59477/,
www.walterandersen.com/pdf/cs-capejasmine.pdf,
books.google.co.in/books?isbn=1561641111…, www.floridata.com/ref/T/tabe_div.cfm ,
www.flowersofindia.net/catalog/garden-frame4.html,
www.suite101.com/article.cfm/florida_gardening/22564,
www.answers.com/topic/crape-jasmine-crepe-jasmine-crepe-gardenia-
pinwheel-flower-east-indian-rosebay-adam…

टिकोमा
टिकोमा किंवा Mexican / Yellow Oleander ही रस्त्याच्या दुतर्फा फुललेली आपण पाहतो. शंकूच्या आकाराची पिवळी, कधी लाल गुलाबी फुले गुछाने फुललेली असतात. ह्याची पाने लांबट फ्रेश हिरव्या रंगाची तर फळे हिरव्या रंगाची असतात. ही फळे, पाने, फुले अतिशय विषारी असतात त्यामुळे तोंडात कुठल्याही प्रकारे जाऊ न देणे चांगले. ह्याच्या अंगाला खास, डोळयांची जळजळ, केस गळणेही होऊ शकते. लहान मुलांना टिकोमापासून दूर ठेवलेलेच चांगले. वर्षभर फुलणा-या टिकोमाच्या अधिक माहितीसाठी –
http://www.health.qld.gov.au/poisonsinformationcentre/
plants_fungi/yellowoleander.asp, qjmed.oxfordjournals.org/cgi/content/full/92/9/483,
indianheartjournal.com/Nov- Dec%202006/art17.pdf,
www.indianetzone.com/5/the_yellow_oleander.htm, davesgarden.com/guides/pf/go/2248,
books.google.co.in/books?isbn=0781728452…, www.definitions.net/definition/yellow+oleander,
books.google.co.in/books?isbn=1874545944…, www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/10357862

कण्हेर
कण्हेर किंवा Oleander ही टिकोमाच्या जातीचीच फुले. गडद गुलाबी, फिक्कट गुलाबी, पांढ-या रंगात असणारे फुलांचे घोस आपले ल्क्ष वेधून घेतात. ह्या झाडाची पाने, फुले अथवा बिया पोटात सेवन केल्यास अत्यंत विषारी आहेत. त्यामुळेच ह्या झाडाकडे कीडे, जनावरे, पक्षी फारसे आकर्षित होत नाहीत. त्याच्या ह्याच गुणांमुळे भारतात कण्हेरीची झाडे रस्त्याच्या दुतर्फा लावली जातात. बागेतही ह्यांचा वापर केला जातो. ह्या झाडाची वाढ तीन मिटर पर्यंतही होते परंतु ‘Petit Salmon’ ह्या नवीन जातीची वाढ फक्त ४ फुटापर्यंतच होते. पाच पाकळ्या असणा-या ह्या फुलांच्या हल्ली डबल पाकळ्याची जातही तयार केल्या गेल्या आहेत. अधिक माहितीसाठी.
en.wikipedia.org/wiki/Oleander, www.floridata.com/ref/N/nerium.cfm ,
www.webindia123.com/garden/flowers/oleander.htm, www.oleander.org/culture.html,
www.pfaf.org/database/plants.php?Nerium+oleander,
www.webindia123.com/garden/flowers/oleander.htm,
ag.arizona.edu/pima/gardening/aridplants/Nerium_oleander.html,
books.google.co.in/books?isbn=0881925853…,
www.ces.ncsu.edu/depts/hort/consumer/factsheets/shrubs/nerium_oleander.html

झेंडू
दस-यापासून दिवाळी पर्यंत झेंडूची फुल ऐन बहरात असतात. थोडीशी बटबटीत, सुगंध विरहीत, पिवळ्या आणि केशरी रंगात असणारी गेंदेदार झेंडूची फुलं प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतात. इंग्रजीत मॅरीगोल्ड म्हणून ओळखली जाणारी ही फुल भारतात सर्वत्र आढळतात. ह्या फुलांमध्ये काही औषधी गुणही आहेत. भारताबरोबरच अमेरिका, फ्रांस आणि अफ्रिकेतही झेंडू सापडतात.
अधिक माहितीसाठी –
www.sriaurobindosociety.org.in/flrarch/flrjun00.htm,
www.webindia123.com/garden/flowers/marigold.htm, www.jutesource.in,
www.indiaagronet.com/indiaagronet/Research%20Update,
marketing_of_flowers_in_goa_stat.htm, www.ecoindia.com/flora/flowers,
www.bawarchi.com/features/feature7.html, ablbiotechnologies.com/Products.htm,
www.indiaagronet.com/indiaagronet/crop%20info/Marigold.htm,
www.blonnet.com/bline/2002/07/24/stories/2002072400271100.htm,
www.mapsofindia.com/delhi/delhi-florists.html,www.backyardnature.net/fl_marig.htm,
www.plantcultures.org/plants/marigold_landing.html, www.flowers.vg/flowers/marigold01.htm

– सौ. भाग्यश्री केंगे