ब्लॉग्स

प्रत्येकाला आपल्या मनातले लिहायची उर्मी असतेच. पण सगळ्यांचेच लिखाण प्रसिध्द होणे शक्य नसते अश्या वेळेला इंटरनेटवरची उपयुक्तता लक्षात येते. इंटरनेटवर ब्लॉग्स नावाची सेवा प्रचलित आहे. ब्लॉग्स म्हणजे इंटरनेटवरचा स्वतःचा हक्काचा कोपरा. येथे आपल्याला मोफत जागा दिली जाते जेथे आपण आपले विचार मांडू किंवा अर्थातच लिहू शकता. हे लिखाण इंग्रजी, मराठी, हिंदी आणि इतर काही भारतीय भाषांमध्ये सुध्दा लिहीता येतात. विषय आपल्याला आवडतील ते आणि सुचतील तसे. ब्लॉग्स लिहीणा-या लोकांना ब्लॉर्ग्स म्हणतात. काही साईटसवर ब्लॉर्ग्सना लिहीण्याचे पैसे सुध्दा मिळतात. तर लिहायला सुरुवात करा –
www.blogger.com, googleblog.blogspot.com, blogs.rediff.com, www.sulekha.com/blogs

मराठी ब्लॉग्स
हल्ली मराठीतून ब्लॉग्स लिहाणा-यांचे प्रमाण वाढते आहे. मराठीसाठी ही सुखद बाब आहे.

येथे साहित्य, संस्कृती, सिनेमा, पाककृती, शैक्षणिक, मैत्री, प्रेम, मातृत्व … अनेक विषयांवर लिहीले जाते. त्या लेखांवर ओळखीच्या तसेच अनओळखी लोकांच्या प्रतिक्रीयाही मिळतात त्यामुळे संपूर्ण मराठी माणसे जोडली जातात. http://marathiblogs.net ह्या साईटवर ब्लॉग्सचे वर्गीकरण केले आहे.
असे विविध विषयांना वाहिलेले, वाचायलाच हवे असे काही ब्लॉग्स-
marathiblogs.net, www.filmyblogs.com/marathi.jsp, paamar.blogspot.com/ ,
aamhimarathi.blogspot.com, b hurjee.blogspot.com, marathi.blogspot.com,
www.bloggapedia.com/World_Blogs/Marathi, www.blinklist.com/tag/marathi

पेड ब्लॉग्स
इंटरनेटवरच्या ब-याचश्या साईट्स तुम्हाला तुमच्या लिखाणाचा मोबदला देतात. मोबदला देणा-या ब्लॉग्स साईट्सना पेड ब्लॉग्स म्हणतात. येथे तुम्हाला एखाद्या उत्पादनाविषयी, उदयोगाविषयी, चित्रपटाविषयी … आपले मत आणि प्रतिसाद लिहावा लागतो. त्याबद्दल आपल्याला अद्यावत माहिती असणं आवश्यक आहे. त्याच बरोबर तुमचं लिखाण किती लोकप्रिय आहे, तुम्हाला किती व कसे प्रतिसाद मिळतात, किती लोकं आठवडयाला तुमचं लिखाण वाचतात ह्या सा-या गोष्टींवर तुमचं ‘रॅंकींग’ अवलंबून आहे. त्याप्रमाणे तुम्हाला पैसे दिले जातात हे पैसे अर्थातच डॉलर मध्ये असतात. तुम्ही ह्या साईट्सला भेट देऊन बघा –
www.43things.com, www.payperpost.com, www.ibibo.com, www.weblogsinc.com,
www.idk.in/blogs/, www.blogitive.com, www.blogz.in, www.reviewme.com, blogintro.com/get-paid,
www.payu2blog.com/home.htm, www.creative-weblogging.com, www.mycontentwebsite.com

फोटोज
पूर्वी फोटो काढणे, डेव्हलप करुन आणल्यावरच बघायला मिळणे… ह्या सा-या कंटाळवाण्या प्रक्रियेतून डिजीटल कॅमेरयाने सुटका केली आहे. इंटरनेटने त्या पुढेही जाऊन अधिक मजल मारली आहे. काढलेले फोटो किंवा स्कॅन केलेल्या फोटोंचा अल्बम करता येतो. तुम्हाला फोटो अपलोड करण्यासाठी एक लॉगइन आणि पासवर्ड मिळतो. अपलोड केल्यावर अल्बम जगाच्या कानाकोप-यात असणा-या आपल्या मित्रांना/नातेवाईकांनाही पाहता येतो. इंटरनेटवरच्या ह्या फोटो अल्बममुळे आपल्या असंख्य सुखद आठवणी जपून ठेवायची सोय झाली आहे – photos.yahoo.com, www.flickr.com, www.pixyshare.com, picasaweb.google.com,
www.kodakgallery.com, www.picturetrail.com, www.web-a-photo.com

व्हिडियोज
डिजीटल कॅमे-यामुळे फोटोंबरोबर व्हिडियो काढणेही अत्यंत सोईचे आणि सोपे झाले आहे. डिजीटल कॅमे-याने शूट केलेल्या फाईल्स संगणकावर सहजपणे डाऊनलोड करता येतात. आता हे व्हिडियोज किंवा फाईल्स दुस-यांबरोबर शेअर करायचे असल्यास नेटवरही सोय उपलब्ध आहे. येथे तुमच्या संगणकावरुन तुम्ही त्या फाईल्स थेट त्या साईटवर अपलोड करु शकता. ह्या साईट्सवर आपल्याला वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडियोज/फिल्म्स पाहायला मिळतात. त्यावर प्रेक्षक आपल्या प्रतिक्रीया, रेटींग्स पाठवतात. त्यानुसार फिल्म्सच्या दिग्दर्शकांना पारितोषिके दिली जातात. तर वेगळ्या विषयांवरच्या व्हिडीओज पाहायला ह्या काही साईट्सना जरुर लॉगइन करा –
www.grouper.com, www.youtube.com, www.dropshots.com, www.nautanki.tv

गुगल टॉक
लॅंडलाईन फोन्स आणि मोबाईलची नवलाई केव्हाच संपली आहे. इंटरनेटने काही साईट्सतर्फे बोलायची सोय करुन क्रांतीच घडवून आणली आहे. इंटरनेटवर बोलण्यासाठी तुम्हाला संगणकाला मल्टीमिडीया कार्ड, स्पीकर आणि मायक्रोफोन असणे आवश्यक आहे. लोकप्रिय आणि दर्जेदार सेवा देणारी कंपनी आहे गुगल टॉक – http://www.google.com/talk गुगल टॉक आहे तरी काय ? गुगल टॉक हे संपर्क आणि संवादाचे नवीन माध्यम आहे. गुगल टॉक दोन प्रकारे काम करते. एक म्हणजे तुम्ही एका संगणकाहून दुस-या संगणकावर मेसेजेस पाठवू शकता. हा संपर्क काही क्षणात जगभरातल्या कुठल्याही संगणकाशी साधता येतो. दुसरे म्हणजे एका संगणकाहून दुस-या संगणकाशी संवाद (व्हॉईस कॉल) साधणे. व्हॉईस कॉल करायचा असल्यास आपल्या संगणकावर गुगल गॅजेट डाऊनलोड करुन घेता येते त्यावर ऑनलाईन असणा-या आपल्या मित्रांची यादी दिसत राहाते. व्हॉईस कॉल करायची आणखीन एक पध्दत म्हणजे गुगल क्लायंट आपल्या संगणकावर बसवणे. गुगल टॉकमुळे तुम्ही अत्यंत स्वच्छ, स्पष्ट आवाजात आणि अल्प दरात जगाच्या कोप-यात असणा-या आपल्या सहका-याशी / नातेवाईकांशी संपर्क साधू शकता.

– सौ. भाग्यश्री केंगे