बहुगुणी गाजर

वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा! हल्ली थंडी मध्ये मिळणारे गाजर अत्यंत बहुगणी आहे. युरोप आणि पूर्व अशिया खंडाकडून आलेली ही फळभाजी आज सा-या जगात वापरली जाते. भारतात मिळणा-या गाजरां व्यतिरिक्त फिक्कट रंगाची गाजर, बेबी कॅरट्सही अलिकडे बाराही महिने मिळू लागली आहेत. गाजरा मध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन ए व बीटा कॅरोटीन असते. जगातील सर्वात मोठे गाजर अलास्कातील जॉन इव्हान ह्या शेतकरयाने त्याच्या शेतात १९९८ साली उगवले होते. गाजराचे वजन होते ८.६१४ कीलो. अधिक माहितीसाठी –

en.wikipedia.org/wiki/Carrot,
www.indiaparenting.com/homeremedies/data/008.shtml,
www.medindia.net/alternativemedicine/ayurvedaanddiet/juices/Carrot-Juice.asp,
www.bawarchi.com/cookbook/dressing7.html,
fruitsnvegetables.com, www.calorie-count.com/calories/item/11124.html,
www.great-workout.com/nutrition/vegetables/carrot-nutrition-facts.cfm

मटर और बहुत सारे मटर

थंडीत गाजराच्या बरोबरीने मिळणारी भाजी म्हणजे हिरवेगार कोवळे मटार. मटार ही जरी भाजी म्हणून आपण वापरत असलो तरी मटार हे फळ आहे. थंडीत येणारी ही भाजी पूर्वी वाळवून डाळ करुन खालली जायची. कालांतराने कच्चे कोवळे मटार नुसतेच खाण्याबरोबर भाजीतही खाल्ले जाऊ लागले. आता हे फ्रोझन मटार वर्षभर खाल्ले जातात. मटार मध्ये व्हिटॅमिन सी, झींक आणि थायमिन मुबलक प्रमाणात असते. मटारच्या रुचकर रेसिपीजसाठी –

en.wikipedia.org/wiki/Pea, whfoods.org/genpage.php?tname=foodspice&dbid=55,
southernfood.about.com/od/peas/Recipes_with_Green_Peas.htm,
www.bawarchi.com/amul/dhara/dhara4.html,
www.indianchild.com/Recipes/gravies_and_masala/green_peas_ambti_recipe.htm,
foodcourt.wordpress.com/2006/12/14/methi-mutter-malai-fenugreek-green-peas-curry, www.mumbaimirchi.com/recipe/raita_green_pea_gooseberry_raita.htm

एक लिंबू झेलू बाई दोन लिंब झेलू

लिंबू ही आपल्या जेवणात लज्जत वाढवणारी फळभाजी अत्यंत उपयुक्त आहे. ५% सायट्रीक ऍसीड असणारया ह्या फळात भरपूर व्हिटॅमिन सी आहे. त्यामुळे लिंबू प्रतिकारशक्ती व पचनशक्ती वाढविण्यासाठी तसेच सौंदर्यवर्धक म्हणून वापरले जाते. लिंबाच्या मूळा विषयी फारशी माहिती नसली तरी असे म्हणतात त्याची जन्मभूमी आसाम आहे. काही जणांचे असे म्हणणे आहे की मूळ हे इटली आणि इजिप्तचे फळ आहे. हिंदू धर्मात चांगल्या कार्यापासून वाईटा पर्यंत लिंबू वापरण्याची प्रथा आहे. ह्या फळाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी –
http://en.wikipedia.org/wiki/Lemon, www.hort.purdue.edu/newcrop/morton/lemon.html, www.oohoi.com/natural%20remedy/everyday_food/lemon.htm ,
www.online-family-doctor.com/fruits/lemon.html ,
www.steadyhealth.com/Benefits_of_drinking_lemon_juice_t77177.html, ,www.supplement-directory.com/article/Lemon:%20Benefits,%20Uses/,
hubpages.com/hub/Health_Benefits_of_Lemon, www.vitaminstuff.com/herbs-lemon-balm.html

टोमॅटो

रोज कोशिंबीर, भाजी, सूप,सॅलड मध्ये वापरला जाणारा टोमॅटो मूळ दक्षिण अमेरिकेचा. स्पेन मध्येही ह्याचा वापर फार पूर्वी पासून होत असे. जगभरात लाल, तांबडा, हिरवा, पिवळ्या, गुलाबी, जांभळया रंगाचे आणि आकाराचे टोमॅटो उपलब्ध आहेत. ३० ऑगस्ट २००७ रोजी स्पेन मध्ये ४०,००० ब्रिटीश, स्पॅनिश आणि फ्रेंच लोकांनी ११५००० किलो टोमॅटो एकमेकांच्या अंगावर फेकून ‘टोमॅटीना उत्सव’ साजरा केला. टोमॅटो मध्ये कॅन्सरला उपयुक्त घटक असे म्हटले जाते. अधिक माहितीसाठी –
en.wikipedia.org/wiki/Tomato, www.tomato.org, www.tomatoesareevil.com, http://www.food.com, www.calorie-count.com/calories/item/11529.html,
www.floridatomatoes.org/glossary.html, southernfood.about.com/od/tomatoes/Tomato_Recipes.htm, homeparents.about.com/cs/recipescooking/a/tomato_index.htm

काकडी

कच्ची, कोशिंबी, सॅलड, कोल्ड सूप मध्ये वापरली जाणारी काकडी व्हिटॅमिन सी, के, ए आणि इतर घटकांनी उपयुक्त आहे. काकडीचा वापर अशियात ३००० वर्षांपासून आहे तर फ्रान्समध्ये काकडी ९व्या शतका आधी पासून वापरली जाते. परंतू प्रत्येक देशा आणि प्रदेशानुसार काकडीचा रंग, पोत, आकार वेगवेगळे आहेत. खमंगकाकडी, काकडीचा कायरस, दह्यातली काकडी, रायता मराठी जेवणाची लज्जत वाढवतात. काकडी विषयी अधिक माहिती –

http://en.wikipedia.org/wiki/Cucumber, www.whfoods.com/genpage.php?tname=foodspice&dbid=42, www.cucumbergrowingtips.com, www.disabled-world.com/artman/publish/cucumber_benefits.shtml,
www.everynutrient.com/healthbenefitsofcucumbers.html,
www.organicfood.com.au/Content_Common/pg-cucumber-information.seo,
health.learninginfo.org/nutrition-facts/cucumber.htm,
www.great-workout.com/nutrition/vegetables/cucumber-nutrition-facts.cfm, southernfood.about.com/od/cucumbers/Cucumber_Recipes.htm,
allrecipes.com/Recipes/Fruits-and-Vegetables/Vegetables-A-M/Cucumber/Main.aspx

– सौ. भाग्यश्री केंगे