सुकामेवा – बदाम

थंडी पडायला लागली की सुक्यामेव्यांना भरपूर मागणी असते, बदाम हा त्यातील प्रमुख आणि सर्वांचा आवडीचा. बदाम मूळचा इराणचा पण आता सा-या जगभर स्थिरावला आहे. आपण खातो ती खरं तर बदामाच्या झाडाची बी आहे. बदामाची ही बी आहे त्या स्वरुपात खालली जाते किंवा भाजून, तूप, मीठ किंवा मध लावून अथवा प्रक्रिया करुन खाल्ली जाते. बदाम वेगवेगळ्या पदार्थात वापरले जातात तसेच त्याचे दूध काढले जाते किंवा तेलही काढले जाते. बदाम हा व्हिटॅमिन ई चा मुख्य स्त्रोत असून सौंदर्य वर्धक आहे. अधिक माहितीसाठी –
en.wikipedia.org/wiki/Almond,
www.almondsarein.com, www.whfoods.com/genpage.php?tname=foodspice&dbid=20,
www.nutsforalmonds.com/nutrition.htm, www.calorie-count.com/calories/item/12061.html,
www.nutritiondata.com/facts-C00001-01c20nl.html,
http://www.tipsandtreats.com/beauty-tips.asp,
living.oneindia.in/beauty/skin-n-body-care/ancient-beauty-secrets.html,
http://living.oneindia.in/beauty/skin-n-body-care/ancient-beauty-secrets.html

सुकामेवा – काजू

सुक्यामेव्यातला काजू हा मूळ ब्राझिलचा. पोर्तुगीज लोक त्याला काजू (caju) म्हणत त्यामुळे सा-या जगभरही तो ह्याच नावाने ओळखला जाऊ लागला. काजूच्या फळाला येणारी बी खालली जाते. काजूला मीठ, तिखट किंवा भाजूनही खाल्ले जाते. काजूची फेणीही प्रसिध्द आहे. भारतात समुद्रकिनार पट्टी असणा-या कोकण, गोवा, केरळ ह्या भागात काजू मुबलक प्रमाणात होतो.
www.cashew.in, http://en.wikipedia.org/wiki/Cashew_nuts,
www.udupipages.com/home/ind/cashew.html ,
www.tafcorn.tn.gov.in/Tender/TendercashewNut.htm,
agmarknet.nic.in/rawcashewnutgmr.pdf, www.vittalcashew.com/health.htm,
www.cashewindia.org/html/c0600hea.htm, vasatwiki.icrisat.org/index.php/Cashew_nut,
www.bawarchi.com/health/queries52.html, agriculture.exportersindia.com/dry-fruits

सुकामेवा – पिस्ता

मूळ इराण आणि अफगाणिस्तान मधला पिस्ता आता सा-या जगभर स्थिरावला आहे. पिस्त्याची फळ पिकली की त्यांचा हिरवा रंग बदलून ब्राउन, फिक्कट पिवळा होतो (पिस्ता रंग) व फळाचे टरफल अर्धवट उघडले जाते. ह्या फळातली बी तशीच, भाजून किंवा मीठ लावून खाल्ली जाते. भारतात पिस्ता गोड पदार्थांमध्ये वापरला जातो. पिस्त्या मध्ये प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स आणि इतर बरेच पौष्टीक घटक आहेत. पिस्त्याच्या रेसिपीज आणि इतर माहिती हवी असल्यास –
http://www.eagleranchpistachios.com/recipes/recipes.htm,
http://www.eufic.org/article/en/diet-related-diseases/osteoporosis/expid…,
www.nutritiondata.com/facts-B00001-01c20oa.html,
www.nutnutrition.com/allaboutnuts/pistachio.htm,
www.mothernature.com/Library/Ency/Index.cfm/Id/1880002,
www.settonfarms.com/index.cfm?fuseaction=pistachios.nutrition, en.wikipedia.org/wiki/Pistachio,
www.pistachios.org, www.pistachiohealth.com, www.roasted-pistachios.com

सुकामेवा – जर्दाळू

जर्दाळूचे उत्पादन ३००० वर्षापूर्वी प्रथम चायनात केले गेले. सम्राट अलेकझॅंडरने जर्दाळूचे फळ ग्रीस येथे नेले. त्यानंतर मग ह्या फळाचा प्रसार युरोपमध्ये झाला. जर्दाळूचे फळ ओले आणि सुलवलेले दोन्ही प्रकारे खाल्ले जाते. ह्या मध्ये भरपूर व्हिटॅमीन ए आहे. पर्शिया आणि इजिप्त मध्ये जर्दाळूच्या खास गोड पाककृती आणि दारु मध्ये उपयोग केला जातात. इजिप्त मध्ये जर्दाळूवरुन ”फेल मेश्मेश” अशी म्हण आहे ज्याचा अर्थ ”अशक्य गोष्ट”. जर्दाळू बियांचा वापर तेल आणि औषधासाठी केला जातो. जर्दाळू रेसिपीज आणि इतर माहिती हवी असल्यास –
en.wikipedia.org/wiki/Apricot,
www.apricot-records.de, www.hort.purdue.edu/ext/senior/fruits/apricot1.htm, www.healthrecipes.com/apricots.htm, www.drinksmixer.com/desc177.html,
www.thefruitpages.com/treefruit.shtml, www.califapricot.com/recipes.html,
www.cdkitchen.com/recipes/cat/889/0.shtml, www.chefdecuisine.com/all_fruit/apricot/apricotmain.asp,
www.zoria.com/recipes.htm, www.chefdecuisine.com/all_fruit/apricot/apricotmain.asp,
www.apricotrecipes.net

सुकामेवा – अक्रोड

अक्रोडला इंग्रजीत वॉलनट म्हणतात ज्याचा अर्थ परदेशी सुकामेवा (nut) होतो. अक्रोड हा मूळ इटलीचा त्यानंतर हे फळ जगभरात इतरत्र लावले गेले. जगभरात अक्रोडाच्या विविध जाती आहेत. पिकलेला अक्रोड खाण्याबरोबरच, त्याचा वापर सॅलड, लोणची करण्यासाठीही होतो. अक्रोड हा बुध्दीवर्धक असून परदेशात हृदयरोग निवारण, वजन आणि मधुमेहींच्या रुग्णांसाठी वापरात आणला जातो. अक्रोडच्या खोडाचेही औषधी उपयोग केला जातो आणि लाकडापासून फर्निचर तयार केले जाते. अक्रोडच्या कच्च्या हिरव्या फळांपासून लोणचेही केले जाते. अक्रोडाच्या रेसिपीज आणि इतर माहिती हवी असल्यास –
en.wikipedia.org/wiki/Walnut, en.wikipedia.org/wiki/Walnut,_California, www.walnuts.org,
kashmirwalnut.com, www.botanical.com/botanical/mgmh/w/walnut06.html,
www.hardwoodinfo.com/species_guide/display_species.asp?species=blackwalnut,
www.walnuts.org/recipes/, homecooking.about.com/od/nuts/a/walnuts.htm,
www.walnutinfo.com/recipes.html,
www.bbc.co.uk/food/recipes/database/walnutandmushroompie_74511.shtml,
www.grouprecipes.com/s/banana-walnut-bread/recipe/1/relevancy,
famousrecipes.wordpress.com/2006/10/19/famous-recipes-walnut-butter-recipe

सुकामेवा – खारीक

खारकेला इंग्रजीत ‘ड्राय डेट्स’ म्हणतात म्हणजेच वाळलेला खजूर. हजारो वर्षांपासून खजूर हा अरब देशात खाल्ला जातो. कालांतराने त्याचा प्रसार आणि वापर जगात इतरत्र सुरु झाला. खजूरात पाण्याचा अंश फारच कमी असतो. त्यामुळे खजूर तीन प्रकारे खाल्ला जातो ओला, मध्यम वाळलेला आणि संपूर्ण वाळलेला (खारीक). १०० ग्रम खजूरात मुबलक प्रमाणात व्हिटॅमी सी असून वाळवल्यावर त्याचा संपूर्ण नाश होतो. अरब देशात विविध गोड पक्कवानात आणि दारु मध्ये खारीक आणि खजूराचा वापर होतो. खजूर आणि खारकेच्या रेसिपीज आणि इतर माहिती हवी असल्यास –
en.wikipedia.org/wiki/Date_palm,
www.botgard.ucla.edu/html/botanytextbooks/economicbotany/Phoenix/index.html,
www.indianfoodforever.com/pickles/dry-dates-pickle.html,
www.freshplaza.com/news_detail.asp?id=15953,
www.newkerala.com/recipes/Indian-Recipes/Pickle-Recipes/Dry-Dates-Pickle-Recipe.html,
www.indianfoodrecipes.net/accompaniments/pickles-recipes/recipe-dry-dates-pickle.html,
www.indianfoodforever.com/pickles/dry-dates-pickle.html, oasisdategardens.com/recipes.php,
www.joy2day.com/cooking-recipes/eid-recipes/dry-dates-pudding.php,
www.aayisrecipes.com/2006/05/27/date-cake-eggless

– सौ. भाग्यश्री केंगे