चार दिवस प्रेमाचे

चार दिवस प्रेमाचे, घर तिघांच, जावई माझा भला, निम्मा शिम्मा राक्षस, अलबत्या-गलबत्या… ही यादी लांबणारीच आहे. ह्या सर्व नाटकांमागे असलेला समान धागा आहे रत्नाकर मतकरी ! अर्ध्या दशकाहून अधिक काळ नाट्य लेखन, दिग्दर्शन, पटकथा, वेशभूषा, बालनाटय चळवळ, चित्रकार आणि लेखक म्हणून सर्वांना सुपरिचीत असणारे मतकरी अनेक पुरस्कारांनी सन्मानित आहेत. त्यांच्या ह्या प्रवासात साथ आहे त्यांच्या कलाकार कुटूंबाची त्यांची पत्नी प्रतिभा, मुलगी सुप्रिया ह्यांची. रत्नाकर मतकरींची स्वतःची साईट तर आहेच परंतु इतरही काही साईट्सवर त्यांची माहिती आहे –

http://www.ratnakarmatkari.com/index.asp,
en.wikipedia.org/wiki/Ratnakar_Matkari,
www.dilipprabhavalkar.com/v1/theatre.htm,
www.answers.com/topic/ratnakar-matkari,
www.thaneweb.com/interviews/interview91_sanyogita.htm,
www.mumbaitheatreguide.com/dramas/marathi/jadooterinazar.asp,
www.pukar.org.in/pukar/pukarmonsoon2006.html,
www.mumbaitheatreguide.com/dramas/marathi

रंगबिरंगी

सत्तर ते ऐंशीच्या काळातील हिंदी पडद्यावरचा सामान्य माणूस म्हणून अमोल पालेकरांची लोकप्रियत अफाट होती. हृषिकेश मुखर्जी आणि बासू चॅटर्जी बरोबर केलेले रंगबिरंगी, गोलमाल, रजनीगंधा, दामाद, नरमगरम …… अश्या अनेक चित्रपटातल्या त्यांच्या भूमिका यादगार आहेत. दिग्दर्शक म्हणून त्यांचे आक्रीत, अनकही, बनगरवाडी, कैरी … आणि ऑस्करसाठी पाठवला गेलेला पहेली चित्रपट. अमोल पालेकरांविषयी नेटवर भरपूर वाचायला मिळते –
http://www.amolpalekar.com,
http://en.wikipedia.org/wiki/Amol_Palekar,
www.imdb.com/name/nm0657505,
www.rediff.com/movies/1999/oct/20amol.htm
www.apunkachoice.com/people/act384/index.html
www.raaga.com/channels/hindi/actors/Amol_Palekar.html
www.cs.wisc.edu/~navin/india/songs/isongs/indexes/starring/amol_palekar.html,
www.dishant.com/cast/Amol-Palekar.html,
www.iloveindia.com/bollywood/actors/amol-palekar.html,
www.mouthshut.com/review/Five_Best_Movies_of_Amol_Palekar-127329-1.html

ऋतू हिरवा, ऋतू बरवा

शहराच्या बाहेर पडल्यावर हिरवाई बघितली की शांता शेळक्यांच्या ह्या गीताची हमखास आठवण होते. शांता शेळके एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. मराठी लेखिका, कवयत्री, कथा लेखिका, गीतकार, अनुवादक, बालसाहित्यीक, पत्रकार आणि प्राध्यापकही ! एकमेकांना परस्पर पूरक असणा-या ह्या सर्व क्षेत्रात त्यांनी त्यांच्या असा खास ठसा निर्माण केला. दुर्दैवाने शांता शेळक्यांना वाहिलेली अशी वेबसाईट नाहीये. पण तुकड्या तुकडयात त्यांच्या विषयी, त्यांची गाणी, लेख, भाषणे वाचायला मिळतात. इंटरनेटवरची त्यांच्या बद्दलची माहिती वाचायलाच हवी –
http://en.wikipedia.org/wiki/Shanta_Shelke,
www.geetmanjusha.com/marathi/lyricswriter/41.html,
www.anothersubcontinent.com/forums/index.php?showtopic=4180&view=getlastpost ,
timesofindia.indiatimes.com/articleshow/24896543.cms,
punerimisal.googlepages.com

अरे संसार संसार

‘आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर ‘ आयुष्यावर सहज सोप्प, अगदी सामान्याना कळेल असं भाष्य करणा-या बहिणाबाई खर तर निरक्षर ! पण त्यांचे निरिक्षण, जीवन सहज सोप्पे उलगडून दाखवण्याची हातोटी एखाद्या विद्वानालाही लाजवेल अशीच. त्यांच्या कवीतां मधून निर्सग, फुल, प्राणी, पक्षी तर ओव्यांमधून जीवनाचे सारं डोकवायचे. दुर्दैवाने बहिणाबाईंना वाहिलेली अशी वेबसाईट नाहीये. पण तुकड्या तुकडयात त्यांच्या विषयी, त्यांची गाणी, लेख, वाचायला मिळतात. इंटरनेटवरची त्यांच्या बद्दलची माहिती वाचायलाच हवी –
http://en.wikipedia.org/wiki/Bahinabai_Chaudhari,
http://www.nashik.com/bahinabai-chaudhari,
http://en.wikipedia.org/wiki/Leva_Patil,
http://marathilevasamaj.com

– सौ. भाग्यश्री केंगे