गणपती अर्थवशीर्ष
गणपतीच्या दहा दिवसात घराघरांतून किंवा सामूहीक रित्या अर्थवशीर्षाचे पठण आवर्जून केले जाते. विद्यार्थांसाठी अर्थवशीर्षाचे पठण बुध्दीवर्धक मानले जाते. नेटवरही काही साईट्सवर अर्थवशीर्ष व गणपती स्तोत्र वाचायला आणि डाऊनलोड करुन ऐकायला मिळते. साईट्सवर त्याचा अर्थही समजावून सांगितलेला आहे. काही साईट्सवर अर्थवशीर्षाचे रिंगटोन्स ऐकता/डाऊनलोड करता येतात. साईट्सवर अर्थवशीर्ष कॅसेट व सीडी ऑनलाईन खरेदी करण्याची सोय आहे. अधिक माहितीसाठी
www.marathiworld.com,
http://www.dagadushethganapati.com/marathi/worship/aarti.htm,
www.mantraonnet.com/ganesh-aadi-pujya.html,
www.emusic.com/album/Suresh-Wadkar-Aadi-Pujya-MP3-Download/10986037.html,
www.artistdirect.com/nad/music/artist/songs/0,,641018,00.html
बाप्पाच्या आवडीचे ’मोदक’
गणपती बाप्पाला मोदकाचा नैवेद्य अतिप्रिय. उकडीचे, तळलेले, माव्याचे, पेढयाचे असे अनेक प्रकारचे मोदक केले जातात. ह्याचा ११, २१ च्या पटीत बाप्पाला नैवेद्य दाखवला जातो. नेटवर मोदक ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे घरापासून दूर असणा-यांनाही प्रसादाचा लाभ घेता येईल. नवीन पीढीला मोदक करणे एक आव्हाहनच वाटते. करीयर करणा-या गृहिंणीकरिता नेटवर मोदकाच्या पाककृती छायाचित्रा सकट उपलब्ध आहेत –
http://nashik.com/gift-shop, www.aayisrecipes.com/2006/08/27/modak/,
www.mumbai-masala.com/maharashtrafood/modak.html,
http://en.wikipedia.org/wiki/Modak, www.bawarchi.com/cookbook/ganeshfestivedish6.html,
festivals.iloveindia.com/ganesh-chaturti/modak.html,
www.food-india.com/recipe/R026_050/R041.htm,
www.indif.com/Food/recipes/festive/ganeshchaturthi/chaturthi1.asp,
www.chimbori.com/node/20, www.onlinebangalore.com/life/cook/modaka.html
अष्टविनायक
महाराष्ट्रात अष्टविनायक म्हणजेच आठ गणपतींना अतिशय महत्त्व आहे. ह्यातले बहुतेक गणपती पुण्याच्या आसपास आहेत. भक्तांच्या नवसाला पावणा-या ह्या प्रत्येक गणपतीची आख्यायिका आणि पौराणिक कथा वेगवेगळ्या आहेत. मयुरेश्वर, सिध्दीविनायक, बल्लाळेश्वर, वरदविनायक, चिंतामणी, गिरीजात्मज, विघ्नहर, महागणपती अश्या ह्या अष्टविनायकांची माहिती, तेथे पोहोचण्याचे मार्ग इत्यादी सर्व माहिती वेबसाईट्सवर उपलब्ध आहे. त्यासाठी लॉनइन करा –
www.ashtavinayak.net, www.ashtavinayaktemples.com,
www.punediary.com/html/ashtavinayak.html, en.wikipedia.org/wiki/Ashtavinayak,
www.marathiworld.com/paryatan/temples/ashtavinayak/index.htm,
www.templenet.com/Maharashtra/ashtavinayak.html,
www.nivalink.com/maharashtra/ashtavinayak.html, surajinfo.com/ganesha/Ashtavinayak.asp,
www.marathiworld.com/sanskruti/sanvar/ganesh/ashtavinayak.htm
सिध्दीविनायक गणपती
मुंबईत प्रभादेवीला असणारा सिध्दीविनायक गणपती संपूर्ण महाराष्ट्राचे श्रध्दास्थान आहे. सिध्दीविनायक गणपतीची अधिकृत साईट आहे – http://www.siddhivinayak.org साईटचे पहिले पान फ्लॅश तंत्राने डिसाईन केले आहे. इंग्रजीत असणा-या ह्या साईटवर मंदिर, संस्थान, त्यांचे उपक्रम ह्यांची संपूर्ण माहिती मिळते. साईटवर मंदिर आणि पुजेचे ’लाईव्ह वेब कास्टींग’ आहे. भक्तांना ऑनलाईन देणगी पाठवण्यासाठी संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. साईटवर व्हिडीओ, छायाचित्र, शुभेच्छापत्र, वॉलपेपर्स, स्क्रीन सेव्हर्स भक्तांना डाऊनलोड करुन घेण्याची सोय आहे. वृत्तपत्रा मध्ये आलेल्या सिध्दीविनायक गणपतीच्या बातम्याही साईटवर उपलब्ध आहेत. भक्तांच्या इतर काही साईटवर असणारी माहिती –
en.wikipedia.org/wiki/Siddhivinayak_temple, ify.com/siddhivinayak/temple_info/temple_history/,
mid-day.com/metro/ghatkopar/2002/august/29915.htm, http://www.shivajipark.com/ganpati
दगडूशेट गणपती
पुण्याचा श्रीमंत दगडूशेट हलवाई गणपती भाविकांचे श्रध्दास्थान आहे. खुद्द लोकमान्य टिळकांनी श्रींच्या मूर्तिची स्थापना केली आहे. श्रीमंत दगडूशेट हलवाईंनी घरगुती स्वरुपात सुरु केलेला गणपती उत्सव आज पुण्याची शान आहे. ह्या विषयीची संपूर्ण माहिती http://www.dagadushethganapati.com ह्या त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. वेबसाईटच्या मुख्य पानावर गणपतीची सुंदर मूर्ती आणि आरतीचे सुरांनी आपले मन प्रसन्न होते. साईटची माहिती इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये आहे. त्यात मूर्तीविषयी, गणेशोत्सव, दगडूशेट गणपती ट्रस्ट, उपक्रम, समाजकार्य ह्याविषयीची संपूर्ण माहिती मिळते. साईटवर मागील काही वर्षांच्या देखाव्याची छायाचित्रही पाहायला मिळतात. नेट भक्तांनीही आपल्या ब्लॉग्ज आणि साईटवर दगडूशेट हलवाई गणपतीची माहिती, छायाचित्र उपलब्ध करुन दिले आहेत –
amitkulkarni.info/pics/ganpati_photographs/ganpati-pune-2002/ganesh_pictures2.shtml,
timepass.onlyfanpics.com/?dagdushethganapatipuneyear2006withpuneri,
www.ganeshfestival.com/dagdusheth.html, www.flickr.com/photos/77312249@N00/54385412
सारसबाग गणपती
पुण्याचा सारसबाग किंवा तळ्यातला गणपती हा मानाचा गणपती. ह्या गणपतीची अधिकृत साईट आहे – http://www.sarasbaug.in साईटचे पहिले पान फ्लॅश तंत्राने डिसाईन केले आहे. येथे आपल्याला गणपतीच्या आरतीचा व्हिडीयोही पाहता येतो. इंग्रजीत असणा-या ह्या साईटवर मंदिर, संस्थान, त्यांचे उपक्रम ह्यांची संपूर्ण माहिती मिळते. भक्तांना आलेले अनुभवही वाचायला मिळतात. येथे ऑन लाईन लायब्ररीत गणपती १०८ नावे, कथा, आरत्या तसेच पौराणिक माहिती वाचायला मिळते. भक्तांना ऑन लाईन देणगीही देण्याची सोय साईटवर आहे. साईटवर व्हिडीओ, छायाचित्र, शुभेच्छापत्र, वॉलपेपर्स, स्क्रीन सेव्हर्स भक्तांना डाऊनलोड करुन घेण्याची सोय आहे. भक्तांच्या इतर काही साईटवर असणारी माहिती –
en.wikipedia.org/wiki/Sarasbaug_Ganpati,
www.geocities.com/ggavaska/reli-links.html,
www.virtualpune.com/html/localguide/attractions/html/saras_baug.shtml
– सौ. भाग्यश्री केंगे