गोविंदा जय गोपाला

जन्माष्टमीचा उत्सव देशभरात मोठया उत्साहाने साजरा केला जातो. चतूर, उत्साही, खोडकर आणि तेजस्वी अश्या सावळ्या कृष्णाचा हा जन्मदिवस श्रावण महिन्यात कृष्ण पक्षात आठव्या दिवशी येतो. कृष्ण हा विष्णूचा अवतार असून भारतात त्याची वेगवेगळ्या नावांनी उपासना केली जाते जसे घननिळा, सावळा, जगन्नाथ, मुरलीधर, बन्सीधार, कान्हा, ब्रिजवासी… इतकेच कशाला हिंदू धर्मा व्यतिरीक्त जैन, बुध्द, बहायन आणि परदेशी (हरे राम हरे कृष्ण) संस्कृतीतही कृष्ण भक्ती आहे. कृष्णाची वेगवेगळी रुप मोहवणारी तर आहेतच तर गीतेतला संदेश समस्त मानवजातीला मार्ग दाखवणारा. नेटवर कृष्णाविषयी अनेक वेबसाईट्स, छायाचित्र, शुभेच्छापत्र, वॉलपेपर्स उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी –

http://krishna.avatara.org/,
http://en.wikipedia.org/wiki/Krishna,
www.hindunet.org/god/Gods/krishna/index.htm,
www.lordkrishna.info, mathuravrindavan.com,
www.lotussculpture.com/krishna1.htm,
www.krishna.com/main.php?id=452,
en.wikipedia.org/wiki/Krishna_Janmaashtami,
www.girirajji.com/lord-krishna.html, www.krishna.org,
www.dlshq.org/download/lordkrishna.pdf,
www.sanatansociety.com/indian_art_galleries/ie_life_krishna_paintings.htm

गोविंदा आला रे sss
कृष्ण जन्माचा हा उत्सव भारतात वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. उत्तरेत मंदिरांना रंगरंगोटी करुन रासलिला खेळली जाते तर दक्षिण भारतात दारापासून घरात कृष्णाची छोटी छोटी पाऊले काढली जातात. महाराष्ट्रात मात्र हा सण दही-हांडी फोडून साजरा केला जातो. दही-लोणी ह्यांनी भरलेले मडके उंच टांगलेले असते आणि गोविंदा पथक मानवी मनोरा करुन ते मटके फोडते. आता तर महिलांचे वेगळे गोविंदा पथक असते. त्यावर काही लाखांचे बक्षिसही असते. परदेशी लोकांचे ह्या गोविंदांवर संशोधनही चालू आहे. अधिक माहितीसाठी –
http://www.krishnajanmashtami.com/, en.wikipedia.org/wiki/Krishna_Janmaashtami,
www.krishnajanmashtami.com/ceremony-dahi-handi.html ,
www.indiatravelogue.com/pass/fest/fest4.html, http://www.dwarkadhish.org/,
http://www.festivalsinindia.net/janmashtami/index.html,
http://holidays.vgreets.com/Janmashtami, http://www.vgreets.com/events/Janmashtami

ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर
ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर हे नाशिक पासून साधारण ४० कि.मी. वर आहे. त्र्यंबकेश्वर येथे ब्रम्हगिरी पर्वतावर गोदावरी नदीचा उगम झाला. गंगे इतकेच महत्त्व गोदावरीला आहे. शिवपुराणानुसार गोदावरी, गौतम कृषी व इतर देवांनी भगवान शंकराला त्र्यंबकेश्वर येथे वास करण्याची विनंती केली. भगवान त्र्यंबकराज नावाने येथे स्थानपन्न झाले. ज्योतिर्लिंगाचे दर्शन व धार्मिक पुजेंसाठी अनेक भाविक त्र्यंबकेश्वरस भेट देतात. तिर्थक्षेत्री जाण्यासाठी अधिक माहितीसाठी –
http://nashik.com/trimbakeshwar, http://urday.com/trimbaknath.html,
www.mahashivratri.org/trimbakeshwar-temple-nasik.html,
www.thepalaceonwheels.com/nasik.html

ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर
ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर हे औरंगाबाद पासून बारा किमी असणा-या वेरुळ गावी आहे. घृष्णेश्वराचे मंदिर अहिल्याबाई होळकरांनी बांधले. घृष्णेश्वराला घृष्मेश्वरही म्हणतात. शिवपुराणानुसार सुधर्म नावाचा ब्राम्हण आपली पत्नी सुदेहा सहीत पुत्र नसल्यामुळे कष्टी होता. सुदेहाने सुधर्म चा दुसरा विवाह आपली धाकटी बहिण घुष्मासह लावला. घुष्मा दररोज एकशे आठ पिंडी करुन त्यांची मनोभावे पुजा करत असे व जवळ्च्या तळ्यात विसर्जन करत असे. पुजेचे फळ म्हणजे तिला पुत्रप्राप्ती झाली. सुदेहाच्या जळाऊ वृत्तीमुळे तिने पुत्राला ठार मारले. पण घुष्माने तिचा पुजेचा नेम चुकवला नाही. ती जेंव्हा पिंडी विसर्जन करायला गेली तेव्हा तिला तिचा पुत्र जिवंत झालेला दिसला. घुष्माची भक्ती पाहून भगवान शंकराने तिला दर्शन दिले.तेव्हा पासून भक्तांचे हे श्रध्दा स्थान म्हणून लोकप्रिय झाले. तिर्थक्षेत्री जाण्यासाठी अधिक माहितीसाठी –
www.mahashivratri.org/ grishneshwar-temple-daulatabad.html ,
www.rajasthaninfoline.com/dest/jyotirlinga.html,www.jyotirlingatours.tripod.com/id3.html, www.indiantemples.com/Maharashtra/grish.html, www.dhyansanjivani.org/jyothirlinga_shrines.asp

– सौ. भाग्यश्री केंगे