आचार्य अत्रे

प्रल्हाद केशव अत्रे उर्फ आचार्य अत्रे हे लेखक, कवी, शिक्षणतज्ञ, वृत्तपत्र संपादक, राजकीय नेते, चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक तर होतेच परंतु उत्कृष्ट वक्ते होते. अत्र्यांचे विनोदी आणि वैचारिक लेखन सारख्याच गुणवत्तेचे असे. त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात शाळा शिक्षक आणि प्राध्यापक म्हणून केली. त्याकाळात त्यांनी प्राथमिक आणि माध्यमिक वर्गांसाठी अभ्याक्रम तयार केले जे कितीतरी वर्ष वापरले जात होते. त्यांनी स्थापन आणि संपादन केलेली वृत्तपत्रे ‘मराठा’ आणि ‘नवयुग’ ही एकेकाळी अत्यंत लोकप्रिय होती. अत्रे हे काही मोजक्या ब्राम्हणां पैकी होते ज्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला पाठिंबा दिला. अत्रे साहित्य संम्मेलनाचे ही अध्यक्ष होते.
अधिक माहितीसाठी –
http://en.wikipedia.org/wiki/Prahlad_Keshav_Atre, en.wikipedia.org/wiki/Samyukta_Maharashtra_Samiti, http://marathiworld.com/sahitya-m/pkatre, www.punediary.com/html/Acharya_Atre.html, www.sabrang.com/cc/comold/august98/hameed.htm

जीए

जीए कुलकर्णींना प्रेमाने जीए म्हणून संबोधत असत. जीएंच्या कथा ह्या अत्यंत तरल आणि मनाचा ठाव घेणा-या असत. त्यांच्या ‘काजळमाया’ ह्या कथा संग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. मध्यंतरी आलेला अमोल पालेकरांचा ‘कैरी’ चित्रपट जीएंच्या कथेवर आधारीत होता. जीए धारवाडला चाळीस वर्ष इंग्रजी भाषेचे प्राध्यापक होते. धारवाडसारख्या गावात राहून त्यांचा इंग्रजी साहित्याचा व्यासंग मोठा होता. जीए अविवाहीत होते पण आपल्या खाजगी आयुष्याबद्दल ते फारसे बोलत नसत. त्यांनी सुनिताबाई, भागवत… इतर लेखक मित्रांना लिहीलेली पत्र त्यांच्या मृत्यू नंतर पुस्तकरुपाने प्रसिध्द झाली. जीएंच्या कथांचा अनुवाद हिंदी, इंग्रजी आणि कानडीत झाला आहे. नेटवर त्यांना वाहिलेली साईट आहे तसेच इतर साईटवरच्या माहितीसाठी –
www.gakulkarni.info, http://en.wikipedia.org/wiki/G._A._Kulkarni,
www.dharwad.com/nimmaputa/ga.html,www.chakpak.com/celebrity/g.a.-kulkarni/27210, www.indiafm.com/celebrities/filmography/14558/index.html,
www.spock.com/G.-A.-Kulkarni, www.upperstall.com/kairee.html

वसंत कानेटकर

मराठी कलाजगतात जेव्हां संगीत नाटक संपुष्टात येत होते तेव्हा वसंत कानेटकरांच्या नाटकांनी नाटयसृष्टीचे पुनरुजीवन केले. पुणे आणि सांगलीतून शिक्षण पूर्ण केल्यावर वसंत कानेटकरांनी नाशिकला एचपीटी कॉलेजमध्ये प्राध्यापकी केली. विद्यार्थांना शिकवत असतांनाच, “वेड्याचे घर ऊन्हात”, “प्रेमा, तुझा रंग कसा?”, “अश्रूंची झाली फुले”, “रायगडाला जेंव्हा जाग येते”, “सूर्याची पिल्ले”, “जिथे गवतास भाले फुटतात” अशी अनेक दर्जेदार नाटके कानेटकरांच्या लेखणीतून रंगभूमीवर आली. १९८८ साली ते मराठी साहित्य सम्मेलनाचे अध्यक्ष होते. त्यांना पद्मश्रीने सन्मानित केले गेले होते. त्यांना वाहिलेली अशी वेगळी वेबसाईट नाही परंतु अनेक साईट्सवर त्यांच्या विषयी वाचायला मिळते –
http://en.wikipedia.org/wiki/Vasant_Kanetkar,
http://www.nashik.com/vasant-kanetkar, http://nashik.nic.in/htmldocs/personalities.htm,
www.indiantelevision.com/headlines/y2k1/feb/feb2.htm,
sureshkhare.com/television.php, www.goahinduasso.org/act_cultural2a.php ,
www.seagullindia.com/index-books/reviews/playwright1.html, books.google.co.in/books?isbn=8126011947…

वपु

पार्टनर, वपुर्झा, ऐक सखे, ही वाट एकटीची, ठिकरी अशी साठापेक्षाही अधिक पुस्तके लिहीणारे वपु काळे उर्फ वपुंनी कथा, कादंब-या, आणि व्यक्तीचित्रही लिहीली. वपु खरे तर उत्कृष्ट कथाकथनकार होते. व्यवसायाने ते आर्कीटेक्ट होते. ते भगवान ओशो आणि रजनीशांचे अनुग्रही होते. त्यामुळे त्यांच्या लिखाणातून कायमच जीवना विषयीचे तत्वद्यान वाचायला मिळते. त्यांना वाहिलेली अशी वेगळी वेबसाईट नाही परंतु अनेक साईट्सवर त्यांच्या विषयी वाचायला मिळते –
en.wikipedia.org/wiki/V._P._Kale,
www.esnips.com/web/VaPuKale,
smusale.tripod.com/mar/vapu.htm,
davbindu.com/marathi.htm,
www.onesmartclick.com/marathi/marathi-katha-kathan.html,
memarathi.blogspot.com/2005/04/va-pu-kale.html,
tarunaai.blogspot.com/2005/07/partner.html

जयवंत दळवी

‘पुरुष’, ‘नातीगोती’,’बॅरीस्टर’,’संध्याछाया’ सारखी दर्जेदार नाटक, ‘चक्र’, ‘रावसाहेब’, ‘उत्तरायण’ सारखे वेगळे चित्रपट, ‘ठणठणपाळ’, ‘कवडसे’ इत्यादी दर्जेदार साहित्यकृती जयवंत दळवींची वेगळी ओळख देतात. त्यांच्या लिखाणाला बहुतेक वेळेला वसंत सरवटयांच्या चित्राची जोड मिळत असे. जयवंत दळवी ‘प्रभात’ आणि ‘लोकमान्य’ ह्या वृत्तपत्रांचे संपादकही होते. दळवींनी इंग्रजीतले दर्जेदार साहित्य मराठीत यावे ह्या साठी अनुवादकांचा चमू एकत्र आणून भरीव कामगिरी केली. त्यांना वाहिलेली अशी वेगळी वेबसाईट नाही परंतु अनेक साईट्सवर त्यांच्या विषयी वाचायला मिळते –
http://en.wikipedia.org/wiki/Jaywant_Dalvi, www.imdb.com/name/nm0198400,
movies.nytimes.com/person/308751/Jaywant-Dalvi/filmography,
wikimapia.org/574960/, www.dilipprabhavalkar.com/v1/biography.htm,
www.chakpak.com/celebrity/jaywant-dalvi/11867,
www.film.com/celebrities/jaywant-dalvi/14756467,
www.fancast.com/people/Jaywant-Dalvi/1292006/main, en.wikipedia.org/wiki/Vasant_Sarwate

प्रकाश नारायण संत

इंदिरा संतांचा मुलगा असला तरी प्रकाश नारायण संतांची स्वतःची वेगळी ओळख आहे. ‘वनवास’, ‘शारदा संगीत’, ‘झुंबर’ हे त्यांची पुस्तक ‘लंपन’चे भावविश्व अत्यंत तरलपणे उलगडून दाखवतात. ह्या सगळ्या पुस्तकांतून विशेषता वनवास मधून त्यांनी लंपनची विचार करण्याची पध्दत, त्याच्या भोवतालचे लोक, सवंगडी ह्यांची मांडणी अत्यंत प्रभावीपणे केली आहे. प्रकाश नारायण संत हे लेखक तर होते परंतु अत्यंत चांगले चित्रकारही होते. त्यांचे खरे नाव होते भालचंद्र गोपाळ दिक्षित. त्यांना वाहिलेली अशी वेगळी वेबसाईट नाही परंतु अनेक साईट्सवर त्यांच्या विषयी वाचायला मिळते –
http://www.anothersubcontinent.com/forums/index.php?showtopic=5543,
www.maayboli.com/hitguj/messages, 103385/46727.html?1145866786,
libibm.iucaa.ernet.in/wslxRSLT.php?A1=70948&PHPSESSID
=4315d4835bd138e4a593a084b5025624,
www.blogger.com/profile/12235399201770528578,
www.vidyaonline.org/arvindgupta/mbooklist.doc ,
marathisahitya.blogspot.com/2006/01/blog-post.html,
www.ndtv.com/ent/kathaawards.asp?part=3,
www.maayboli.com/hitguj/messages/103385/2241.html?967472675

– सौ. भाग्यश्री केंगे