मंगेश पाडगावकर हे मागच्या दशकातले गाजलेले कवी. साध्या, सोप्या आणि थेट शब्दात जीवनाचे गणित मांडणारे पाडगावकर अनेक पुरस्कारांचे मानकारी आहेत. त्यांच्या ‘सलाम’, ‘गाणं कागदावरच’, ‘प्रेम’,’चिऊताई’ अश्या त्यांच्या अनेक कविता नेट वरुन वाचल्या जातात. दुर्दैवाने मंगेश पाडगावकरांना वाहिलेली अशी वेबसाईट नाहीये. पण तुकड्या तुकडयात त्यांच्या विषयी, त्यांची गाणी, लेख, वाचायला मिळतात.
इंटरनेटवरची त्यांच्या बद्दलची माहिती वाचायलाच हवी –
www.geocities.com/kavitayan/mangesh.html, www.esnips.com/_t_/padgaonkar
aamhimarathi.blogspot.com/search/label/Mangesh%20Padgaonkar
goggly.blogspot.com/2007/03/mangesh-padgaonkar.html
memarathi.blogspot.com/2006/01/mangesh-padgaonkar.html
musicforum.org.ua/viewtopic.php?t=034bd0dcd0c,
www.marathimati.com/marathi_kavita/default.asp,
www.geetmanjusha.com/marathi/lyricswriter/40.html
आपले ‘विंदा’
भारतातील सर्वोच साहित्यातील मान, ज्ञानपीठ मिळवणारे गोविंद विनायक करंदीकर प्रेमाने ‘विंदा’ म्हणून ओळखले जातात. त्यांना साहित्य अकादमी, केशवसूत, कबीर सन्मान असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. श्वेतगंगा, मृदगंध, धृपद ह्या त्यांचा गाजलेल्या साहित्याकृती तर आहेतच त्याच बरोबर विंदांनी मुलांसाठीही अत्यंत तरल आणि त्यांना भावेल असे लिखाण केले आहे. लहानांसाठी त्यांचे ‘परी ग परी’, ‘सश्याचे कान’, ‘राणीचा बाग’ हे त्यांचे कवितासंग्रह आजची पीढीही आवडीने वाचते. त्यांच्या काही कवितांचा अनुवाद Vinda Poems नावाने झाला आहे. त्यांनी ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभवाचे आजच्या काळानुरुपही भाषांतर करुन ठेवले आहे.
विंदा विषयी अधिक माहितीसाठी –
http://en.wikipedia.org/wiki/Vinda_Karandikar,
www.epw.org.in/epw/uploads/articles/1638.pdf, thebhandarkars.com/milind/archives/5,
timesofindia.indiatimes.com/articleshow/1363451.cms,
www.astro.caltech.edu/~vam/bkavita.html, www.geocities.com/kavitayan/vinda.html,
www.thehindu.com/2006/08/11/stories/2006081119451300.htm,
www.experiencefestival.com/vinda_karandikar, bhupindersingh.blogspot.com/
2006/02/vinda-karandikar-deserving-jnanpith.html, indianpoetry.wordpress.com/2007/09/28/“
the-wheel”-by-vinda-karandikar/, mr.wikipedia.org/wiki/चर्चा:गोविंद_विनायक_करंदीकर
कुसूमाग्रज
नाशिकच नव्हे तर संपूर्ण भारतात कुसूमाग्रजांचे नाव साहित्य वर्तूळात आदराने घेतले जाते. त्यांना अनेक पुरस्कारांबरोबरच साहित्याचा सर्वोच ज्ञानपीठ पुरस्कार तसेच पुणे विद्यापीठाची डी. लिट ही मानाची पदवी मिळाली होती. त्यांनी कविता, कथा, कादंब-या, नाटक असे अनेक साहित्यप्रकार सर्मथपणे हाताळले. त्यांनी लहांसाठीही कविता, कथा तर लिहील्याच पण प्रथमिक मराठीची गोडी लागावी म्हणून अक्षरबागसारखे अप्रतिम पुस्तकही लिहीले. कुसूमाग्रजांना वाहिलेली साईट माहितीपूर्ण आहेच त्याच बरोबर वाचकांनीही त्यांच्या विषयी, साहित्याविषयी अनेक साईटवर लिहून ठेवले आहे.
अधिक माहितीसाठी –
http://www.kusumagraj.org/, http://en.wikipedia.org/wiki/Kusumagraj,
www.kusumaavali.org, www.nashik.com/organisation/kpratisthan.html,
www.geetmanjusha.com/marathi/lyricswriter/49.html,
www.screenindia.com/old/fullstory.php?content_id=713,
www.kusumagraj.com, www.esnips.com/_t_/kusumagraj,
www.aathavanitli-gani.com/Lists/Lyrics %20Details/Kusumagraj.htm,
geetgunjanmarathi.tripod.com/marathi/lyricswriter/49.html
वसंत बापट
बिजली, मानसी, सेतू, सकीना असे वेगवेगळे विषयांवरचे वसंत बापटांचे तीसच्यावर कवितासंग्रह आजही वाचले जातात. वसंत बापट विंदा आणि पाडगावकर ह्या आपल्या समकालिन कवींबरोबर कविता वाचनाचे कार्यक्रम करत असत. काही काळ त्यांनी साधना मासिकाचे संपादनही केले होते. १९९९ साली बापट मराठी साहित्य संम्मेलनाचे अध्यक्ष होते. नेटवर वेगवेगळ्या ब्लॉग्सवर त्यांच्या कविता वाचायला मिळतात.
अधिक माहितीसाठी –
en.wikipedia.org/wiki/Vasant_Bapat, timesofindia.indiatimes.com/articleshow/22450176.cms,
aamhimarathi.blogspot.com/2007_01_01_archive.html,
www.sabrang.com/cc/comold/feb99/sreport.htm,
chaukatraja.blogspot.com/2005_10_01_archive.html,
www.indianexpress.com/res/web/pIe/ie/daily/19990210/ige10084.html,
www.ekata.ca/oct02.htm, www.anothersubcontinent.com/forums/index.php?
showtopic=4180&view=getlastpost
बा.भ. बोरकर
कविवर्य बोरकर हे सौंदर्यप्रेमी आणि सौंदर्यवेधी होते. त्यांनी अत्यंत लहान वयातच कविता करायला सुरुवात केली. त्याच बरोबर ते गद्य लिखाणही करत असत. बोरकरांनी १९५० सालच्या गोवा स्वतंत्र संग्रमातही भाग घेतला होता. त्यानंतर त्यांनी पुण्यात स्थायीक होऊन रेडिओवर नोकरी केली. त्यांच्या दीर्घ कविता महात्मायन आणि तमाहस्तोत्र (मधुमेह आणि वार्ध्यक्यामुळे आंधळेपण येण्याची शक्यता असतांना लिहीलेले काव्य) आजही वाचल्या जातात. बोरकरांनी मराठी आणि कोकणीत कविता लिहील्या आहेत. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कवितांचे वाचन पुल आणि सुनिताबाईंनी महाराष्ट्रात गावोगावी केले.
अधिक माहितीसाठी –
http://en.wikipedia.org/wiki/Poet_Borkar, www.marathiworld.com/sahitya/sahitik/borkar.htm,
en.wikipedia.org/wiki/Category:Indian_poets, marathi-kavita.blogspot.com,
www.goakonkaniakademi.org/konkaniweb/language-literature.htm,
www.indianexpress.com/res/web/pIe/ie/daily/19990313/iex13048.html,
http://marathi-kavita.blogspot.com,
www.kamat.com/kalranga/konkani/prominent_konkanis.htm,
aamhimarathi.blogspot.com/2007/11/chitraveenaba-bha-borkar.html,
www.sahitya-akademi.org/sahitya-akademi/bklst16.htm
बा. सी. मर्ढेकर
मर्ढेकरांना मराठीतील आधुनिक कवी म्हटले जाते. त्यांनी मराठी कवितां मध्ये शहराचे चित्रिकरणही केले. त्यांचे शिक्षण पुणे आणि लंडन येथे झाले. शिक्षणानंतर मात्र त्यांनी अखंड ऑल इंडिया रेडिओ मध्ये नोकरी केली. मर्ढेकर समीक्षक आणि प्रयोगशील कादंबरीकार होते. त्यांचा शिशिरग्राम कवितासंग्रह अतिशय तरल होता परंतु त्या नंतर आलेला ‘काही कविता’, ‘आणखी काही कविता’, ‘सौंदर्य आणि साहित्य’ ह्या संग्रहांनी मात्र मराठी साहित्यात खळबळ केली.
मर्ढेकरांच्या कविता आणि अधिक माहितीसाठी –
http://en.wikipedia.org/wiki/B._S._Mardhekar,
http://www.geocities.com/indian_poets/marathi.html,
www.springerlink.com/index/D6788UW07730W38G.pdf,
www.epw.org.in/epw/uploads/articles/9392.pdf,
www.india9.com/i9show/B-S-Mardhekar-39240.htm,www.geocities.com/indian_poets/marathi.html,www.indianetzone.com/2/marathi_literature.htm
www.museindia.com/showcont.asp?id=53, www.ciil-ebooks.net/html/kelkar/html1/f64.htm
– सौ. भाग्यश्री केंगे