मीराबाई

श्रीकृष्णाची परमभक्त मीराबाईने १६व्या शतकात १३०० भजन/अभंग लिहून ठेवले आहेत. मीराबाईच्या ह्या भजनांना राजस्थानी बोली भाषेत पाडा किंवा पाडली म्हणत असत. ही सगळी भजन मीराबाईने ब्रीज (वृंदावनात बोलली जाणारी) आणि राजस्थानी भाषेत लिहीली आहेत. १६व्या वर्षी चित्तोडचा राजा भोजशी मीरेचा विवाह झाला असला तरी रुढ अर्थाने ती कधी वैवाहीक आणि पारंपारिक आयुष्यात ती कधी रमलीच नाही. कृष्णाच्या निस्सीम भक्तीमुळे ती राजघराणे सोडून सामान्य लोकांमध्येही मिसळत असे. त्यापायी तिला अनेक अत्याचार सहन करावे लागले. तिला दोन वेळा विषप्रयोगही करण्यात आला. वयाच्या तिसाव्या वर्षी मीराबाई मथुरा, वृंदावन मध्ये जाऊन शेवटी द्वारिकेत त्यांना मुक्ती मिळाली. मीराबाई विषयी अधिक माहितीसाठी –
http://en.wikipedia.org/wiki/Mirabai, www.chittorgarh.com/meera-bai.asp ,
www.sankeertanam.com/meera.html, www.intelindia.com/mahabharat/meerabai.htm, tdil.mit.gov.in/coilnet/ignca/meera.htm, www.dollsofindia.com/read/meerabai.htm

मुक्ताबाई

”Where darkness is gone I live” हे मुक्ताबाईंच्या एका अभंगाचे साईटवर इंग्रजीत सुंदर रुपांतर केलेले होते. फक्त ज्ञानेश्वरांची धाकटी बहिण इतकीच मुक्ताबाईंची ओळख नसून त्यांचे लेखन स्वतंत्रपणे लिहीले आहे. वयाच्या १४व्या वर्षी चांगदेवांना मुक्ताबाईंनी मोक्ष मार्गाची शिकवण दिली होती. मुक्ताबाई म्हणत मोक्षासाठी भक्ती सर्वात महत्त्वाची. भक्तीमुळे वैराग्य येते. वैराग्य ज्ञान मार्गाकडे नेते. तर अशी ही मुक्ताई आपला बंधू ज्ञानेश्वरांच्या पाठीवर चूल नसतांना भाक-याही थापत असे. मुक्ताबाईं १८व्या वर्षीच पंचतत्वात विलीन झाल्या. नेटवर फारश्या साईट आढळल्या नसल्या तरी पुढील साईट्सवर त्यांची माहिती वाचायला मिळते – http://www.dlshq.org/saints/jnanadev.htm, www.marathiworld.com/abhanga/,
www.marathiworld.com/muktai/, http://en.wikipedia.org/wiki/Changdev,
www.mumbai-central.com/nukkad/jan2004/msg00092.html

बहिणाबाई

‘अरे खोप्या मधी खोपा’ किंवा ‘अरे संसार, संसार जसा तवा चुल्यावर’ ह्या आपल्या ओव्यातून जीवनाचा अर्थ उलगडून दाखवणा-या कवयत्री बहिणाबाई निरक्षर होत्या हे सांगूनही खरे वाटणार नाही. जळगाव जिल्ह्यातल्या असोदा गावी त्यांचा जन्म झाला. दुर्दैवाने तारुण्यातच वैधव्य आले परंतु बहिणाबाई त्या काळातही स्वतंत्र विचारांच्या होत्या. फुल, पानं, पक्षी, प्राणी ह्यांच्या विषयी त्यांना अतोनात प्रेम होते. त्यांची निरीक्षण शक्तीही अफाट होती ह्याचा प्रत्यय त्यांच्या अहिराणी भाषेतल्या ओव्या वाचतांना येतो. महाराष्ट्राला लाभलेल्या ह्या थोर कवयत्री विषयी अधिक माहितीसाठी –
http://en.wikipedia.org/wiki/Bahinabai_Chaudhari,
http://nashik.com/bahinabai-chaudhari, jalgaon.nic.in/html/History.htm,
home.infionline.net/~ddisse/bahina.html, www.ucalgary.ca/~mamaes/17a.html,
www.travelchacha.com/cities/maharashtra/jalgaon.html,
www.dabase.org/bahinaba.htm, www.tukaram.com/pages/intro1.asp

अमृता प्रितम

पद्मविभूषण, द्यानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्काराच्या प्रथम महिला विजेत्या अमृता प्रितम ह्या पंजाबी कवयत्री आणि लेखिका. फाळणी नंतर अमृता प्रितम भारतात परतल्या आणि ऑल इंडीया रेडिओवर रुजू झाल्या. वयाच्या १६व्या वर्षी त्यांचा पहिला लेख प्रसिध्द झाला. पहिल्या विवाहाच्या कटू अनुभवानंतर त्यांचे लिखाण हे स्त्रियांविषयी अधिक असे. स्त्रियांच्या व्यथा, दुःख, संवेदना त्यांनी समाजापुढे प्रभावीपणे मांडल्या. स्त्रियांसाठी ‘पाचवा कोना’ (पाचवा कोनाडा) असावा असे त्यांना वाटायचे. त्यांनी त्यांचे उर्वरीत जीवन इमरोझ बरोबर व्यतित केले. अमृता प्रितमविषयी अधिक माहितीसाठी –
en.wikipedia.org/wiki/Amrita_Preetam,
www.scribd.com/doc/1008249/Dark-Sun-Amrita-Pritam,
www.littlemag.com/jan-feb01/amrita.html, www.sawnet.org/books/authors.php?Pritam+Amrita,
www.upperstall.com/people/sahir.html, www.chowk.com/articles/9116 ,
www.languageinindia.com/dec2005/amritapritamsunwani1.html, news.bbc.co.uk/2/hi/south_asia/4393970.stm

शांता शेळके

‘ही वाट दूर जाते’, ‘रेशमाच्या रेघांनी’, ‘ऋतू हिरवा’, ‘जाईन विचारीत रानफ़ुला’ … अशी अनेक वैविध्यपूर्ण गाणी, कथा, कादंब-या, मुलांसाठी सुध्दा लिहिणा-या शांता शेळकेंनी मराठी साहित्य त्यांच्या दर्जेदार लेखणीने संपन्न केले आहे. मराठीच्या प्राध्यापक म्हणून त्यांनी नागपू, मुंबई, पुणे इथल्या विद्यापीठातून अध्यापन केले. अध्यापना बरोबरच नवयुग ह्या मासिकाच्या उपसंपादक, सेंन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षा, थिएटर परिक्षक बोर्डाच्या सदस्या, मराठी चित्रपटांसाठी गीत लेखन अश्या अनेक जवाबदा-याही त्यांनी पेलल्या. त्यांची गीते लता मंगेशकर, आशा भोसले, किशोरी अमोणकर ह्यांनी गाऊन अजरामर केली आहेत. शांताबाई विषयी अधिक माहितीसाठी –
http://en.wikipedia.org/wiki/Shanta_Shelke, http://www.marathimati.com/home/Home.asp,
www.hamaraforums.com/lofiversion/index.php/t10475-50.html

इंदिरा संत

१९१४ साली पुण्यात जन्म झालेल्या इंदिरा बाईंनी आपल्या कारर्किदीची सुरुवात शिक्षिका आणि लहान मुलांच्या लेखनांपासून केली. १९५० पासून त्यांच्या कवितेचा विषय स्त्रीयांभोवतीच केंद्रीत होता. त्यांचा कवितांमधून स्त्रियांचे भावविश्व, त्यांना सोसावे लागणारे कष्ट, नात्याची तरलता इंदिरा बाईंनी अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या इंदिरा संतांविषयी फारशी माहिती उपलब्ध नसली तरी पुढील साईट्सवर आपल्याला त्यांच्या विषयी वाचायला मिळते –
http://bedfordstmartins.com/introduction_literature/poetry/sant.htm,
http://en.wikipedia.org/wiki/List_of_Marathi_writers,
books.google.co.in/books?isbn=1558610294…,
www.nd.edu/~milind/posts/marathi.html,
en.wikipedia.org/wiki/Sant,
www.rrtd.nic.in/medup-1-15july.html, www.anothersubcontinent.com/forums/index.php?showtopic=2923&view=getlast

– सौ. भाग्यश्री केंगे