महिलादिन

महिलादिन म्हणजे नेमके काय? वर्षातला एक दिवस महिलांना सन्मानाने वागवायचे? ही स्थिती तर कष्ट करणा-या बैलाची पण असते पोळयाच्या दिवशी त्याला अंघोळ घालतात, सजवतात त्याची पुजा करतात, त्याला गोडधा ड खायला देतात, गावातुन त्याची मिरवणुक काढ़तात, त्याचे खुप कौतुक होते. पण त्या दिवसा पुरतेच. कारण दुस-या दिवशी पुन्हा त्याच्या पाठिवर चाबुक लावलाच जातो. तसेच काहीतरी चित्र आज समाजात महिलां विषयी पाहायला मिळते.

मुलगी जन्माला आली की त्याचा आनंद फ़ार थोडया लोकांना होतो. ‘बेटी धनाची पेटी’ म्हणतात, पण खरचं ह्या धनाच्या पेटी ला तुम्ही योग्य वागणुक देता का? मुलगा आणि मुलगी यात भेदभाव केला जातो तो का?

पत्नी ‘घरची लक्ष्मी’ म्हणतात पण खरंच त्या लक्ष्मीला आपण योग्य मान देतो का, याचा विचार करण्याची गरज कधी पुरुषांना पडलीय का? तिच्या भावना जाणुन घेण्याचा व त्या प्रमाणे वागण्याचा प्रयत्न कधी त्यांनी केलाय का?

म्हणुनच आज काळाची गरज हीच आहे की महिलांनी स्वत:ला कुठ्ल्याही बाबतीत कमी न लेखता पुरुषांच्या बरोबरीने पुढ़े यायला हवे. पण हे पुढ़े येणे म्हणजे नेमके काय? हे जाणुन घेणे सुध्दा तितकेच आवश्यक आहे. फक्त पैसा कमावणे म्हणजे पुरुषांच्या बरोबरीने राहणे नव्ह . तर प्रथम स्वत:चा सन्मान केला तर इतर आपला सन्मान करतील. आणि आपली संस्क्रुती जपुन आपल्यातील कलागुणांना कसे विकसीत करता येईल याकडे प्रामुख्याने लक्ष्य दयावे. कुठलेही काम अशक्य नसते फक्त त्याला प्रामाणिक पणे प्रयत्नांची गरज असते आणि ते प्रयत्न करताना कुणी आपला गैरवापर करुन घेऊ नये याकडे लक्ष्य दयावे. आत्मविश्वास ही एक अशी गोष्ट आहे की ज्यामुळे किती तरी असाध्य कामे साध्य होतात म्हणुन त्याला आपला सगळयात जवळचा मित्र मानावा. मिळाले ल्या प्रत्येक संधीचा पुरेपूर फायदा करुन घ्या.

कल्पना चावला ने आकाशाला गवसनी घालण्याचा प्रयत्न केला, पण मी तर म्हणेन तिच्या गुणांतुन प्रेरणा घेऊन कुणीतरी असेही पुढ़े यावे जे त्याही पुढ़े जाण्याचा प्रयत्न करेल आणि तीची जी काही अपुरी स्वप्ने राहिली असतील ती पुर्ण करेल. कारण यशाला मर्यादा नसल्या तरच पुढ़ झेप घेण्यास उत्साह येतो. आणि मगच वर्षातील फक्त एक दिवस ‘महिलादिन’ न राहाता सर्व दिवस महिलांसाठीचे होतील.

– सौ. मनीषा नवले, चंदननगर, पुणे