८ मार्च, जागतिक महिला दिनानिमित्त लिहिताना आनंद व्यक्त करावा की खंत, याचाच संभ्रम पडला आहे. कारण २१ व्या शतकात वावरताना, समानतेची शिदोरी बाळगत असताना जर, ‘महिला दिन’ जागतिक पातळीवर साजरा के ला जातो, तर मग ‘जागतिक पुरुष दिन’ का नाही? कारण, ‘रांधा, वाढा, उष्टी काढा ‘ या परंपरेच्या रुढीतून आता कुठे आमच्या महिला बाहेर पडत आहेत, म्हणजेच पूर्णपणे बाहेर पडलेल्या नाहीत. या रुढीं च्या बेडया जखडणारे दुसरे तिसरे कुणीही नाहीत, ते आहेत समाजात आपल्याभोवती वावरणारे पुरुषच. म्हणूनच तर वर्षातून एक दिवस ‘महिला दिन’ साजरा करुन महिलांच्या तोंडाला पाने पुसली जातात आणि वर्षभर मात्र त्याच महिलांना अत्याचार, जुलूम, यासारख्या आगीत होरपळून जाण्यासाठी भाग पाडले जाते.
एकीक डे ‘प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्रातील ९,७०० गावांत महिला सरपंच ध्वजारोहण करतात’ या गाष्टीचे कौतुक केले जाते, पण त्याच महिला सरपंचांना मात्र राजकीय पातळींवरील निर्णय प्रक्रियेत डावलतानाच दिसून येते. कारण स्त्री चं वर्चस्व पुरुषांना कधीही रुचलं नव्हतं, रूचत नाही आणि रूचणार देखील नाही. ‘मानव विकास अहवाला’ तील नोंदीप्रमाणे आपल्याकडील महानगरपालिंकेमध्ये सुमारे २५ टक्के स्त्रियांचा सहभाग आहे. नगर परिषदेमध्ये १९ टक्के , तर जिल्हा परिषदांमध्ये ५५ टक्के इतका सहभाग स्त्रियांचा आढळून येतो. तसेच या विविध समित्यांच्या अध्यक्षपदी सरासरी २५ टक्कयांहून अधिक महिलांचाच समावेश आढळून येतो. पंचायत समित्यांमधील महिला सदस्यांची संख्या सुमारे ३२ टक्के तर ग्रामपंचायतीमधील महिला सदस्यांची संख्या २८ टक्के इतकी आहे. तरीही राजकीय क्षेत्रातील प्रत्यक्ष निर्णय प्रक्रियेत याच महिला ५ टक्के देखील दिसून येत नाहीत. खरे तर राजकीय सत्तेवरील महिलांचा सहभाग हा गुणात्मक स्वरुपाचा असणे ही आजची नितांत गरज आहे. मात्र त्यासाठीचे पोषक वातावरण निर्माण क रण्याचा प्रयत्न पुरुषवर्गाक डून न होता उलट महिलांचा आहे तो सहभाग कसा डावलला जाईल याकडेच जास्त भर असतो.
‘स्त्री-मुक्ती’ चे वारे जगभर वाहायला सुरु वात होऊ न अनेक वर्षे लोटली, तरीही स्त्री-मुक्ती या शब्दाचा खरा अर्थ आपल्याला कळलेलाच नाही आहे. स्त्री-मुक्ती म्हणजे स्त्री ची मुक्ती, पण कशाक शातून?? गुलामगिरीतून? अत्याचारापासून? गरीबीतून? लाचारीतून? दुबळेपणातून? की पुरु षांच्या मक्तेदारीतून???.. आणि ही मुक्ती करायला स्त्री ला बांधून, जखडून कुणी ठेवलंय? , तर तिने स्वत:च स्वत:ला बांधून घेतलंय. या सर्व बंधनात ती स्वत:च (मर्जीने किं वा गेरमर्जीने) गुरफटून गेली आहे. क रीयर करणारी स्त्री ही आज ‘पती हाच परमेश्वर’ हेच ब्रीदवाक्य मानत आहे. स्त्री-मुक्ती चळवळीत भाग घेणारी, व्यासपीठावर उभे राहून स्त्रियांच्या जुलुमांना वाचा फ ोडणारी स्त्री च घरी जावून पतीला व मुलांना जेवायला वाढते, घरची कामे क रते, घरातील प्रत्येकाची मर्जी सांभाळते, प्रसंगी अपमानही सहन करते. म्हणजेच ज्या स्त्री-मुक्तीसाठी ही स्त्री झटतेय त्याचा तिला अर्थच कळलेला नाही. स्त्री असण्याचा अर्थ समजावून घेणे, स्त्रीत्व स्विकारणे आणि त्याचा आनंद लुटणे यापासून प्रत्येक स्त्रीची समानतेची कल्पना सुरु होते. आणि याची पुढची पायरी म्हणजे त्या प्रत्येक स्त्रीला जीवनाच्या वळणावर येणारे विविध अनुभव. आज आपल्यातील प्रत्येकीला पुरुषी वर्चस्वाला, जबरदस्तीला, शोषणाला समोरे जावे लागते आणि या सर्वांशी संघर्ष करताना मात्र स्त्री एकटी पडते. जखडलेल्या सामाजिक बांधणीची जोखड सावरत पुढे जाताना तिला, राजकीय खाचाखोचांना देखील सामोरे जावे लागते. या साऱ्याची निष्पत्ती काय?- असेही वाटल्यावाचून मग राहात नाही. महिला दिन साजरा करण्याचे उद्दिष्ट म्हणजे पुरुषांचा स्त्रीबद्दलचा असलेला दृष्टिकोण बदलणे हाच असला पाहिजे. कारण जोपर्यंत हा दृष्टिकोण बदलणार नाही, तोपर्यंत स्त्रिया ख-या अर्थाने मुक्त होणार नाहीत.
मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेने महिला स्पेशल ट्रेन सुरु करुन महिलांचा सन्मान केला, त्यांचे समाजातले स्थान महत्वाचे समजून त्याचा आदर केला. बेस्टने देखील अनेक ठिकाणी महिला विषेश बसेस सुरु केल्या. पण याच महिलांच्या डब्यात रात्रीच्या वेळी महिलांवर अतिप्रसंग होऊ नये म्हणून पुरुष पोलिसांचे आरक्षण ठेवण्यात आले. आाज महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे गेलेल्या आहेत. विमाने, रेल्वे, जहाजे, मोटार इ. वाहने चालविणे एवढेच नव्हे तर अंतराळवीर कल्पना चावला सारखीने अवकाश भरारी देखील घेतली आहे. पण रात्री अपरात्री रुस्त्यावरुन एकटे जाताना-येताना लागणारा विश्वास, हिम्मत अजूनही कायम आहे. आणि ही भितीही कुणाची तर पुरुषांचीच. म्हणजे आपलेच दात, आपलेच ओठ. महिला मुक्तीचे नारेही पुरुषांनीच लावायचे आणि जुलूम, अत्याचार करुन तिला पुरुषी वर्चस्वाखालीही ठेवायचे. ही अत्याचारांची भीती मनातून काढून टाकणे महत्त्वाचे. समाजाच्या वेगवेगळया स्तरातून निर्माण झालेल्या रुढींमधून, विषमतेतून स्त्रीला जी वेगळी वागणूक दिली जातेय तिचे मूळ उखडून टाकले पाहिजे. स्त्री-पुरुष समानता अंमलात आली पाहिजे असे म्हणणारेच घरांत मात्र मुलगाच पाहिजे, मुलगी नको असा आग्रह धरतात. हा आग्रहच मोडून काढला पाहिजे. किंबहुना त्यासाठी स्त्रियांनीच प्रयत्न केले पाहिजेत. कारण सुनेला मुलगा हवा असा आग्रह धरणारी सासूही एक स्त्रीच असते हे विसरुन चालणार नाही. भारतीय संस्कृतीचे अनेक आदर्श, नैतिक मूल्ये यांचा चाललेला ऱ्हास थांबविला पाहिजे.
‘मी एक स्त्री आहे’ असे विधान जेंव्हा अभिमानाने व आनंदाने प्रत्येक स्त्री करु शकेल तेंव्हाच महिला दिन खऱ्या अर्थाने साजरा होईल. कारण, ‘स्त्री’ या शब्दांत असणारी शक्ती, निर्भिडता, आत्मविश्वास तिच्यांत आला असेल. रिंकू पाटील ते जयबाला सारख्या प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकद तिच्यामध्ये आली पाहिजे.स्त्री ही ‘एका क्षणाची पत्नी तर अनंत काळासाठी माता असते.’या वचनाप्रमाणे ही माता आपल्या स्त्री शक्तीचा वारसा येणाऱ्या पुढील पिढयांना देत राहिल, जेणे करुन पुढच्या पिढीतील स्त्रीला ‘महिला दिन की महिला दीन’ या विचारांचा स्पर्शही होणार नाही. ती स्त्री फक्त लढेल ते ‘माणूस’ म्हणून जगण्यासाठी. कारण, स्त्री पुरुष या भेदापेक्षा आपण सर्वजण माणूस आहोत हे विसरुन चालणार नाही. माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे या एवढयाश्या हट्टाने पेटलेले आाज आपणाकडे बोटांवर मोजण्याइतकेच आहेत आणि खरे तर आज त्यांचीच नितात गरज आहे. आणि हा माणूस फक्त ‘स्त्री’ च निर्माण करु शकते. म्हणूनच ‘जी स्त्री सर्वसामान्य असून प्रचंड अडचणींना धैर्याने तोंड देते, जिच्याकडे स्वत:ला समर्पित करण्याची अमर्याद शक्ती असते आणि जी तिच्याकडे साधनांची कमतरता असूनही स्वत: त्यातून मार्ग काढते आणि इतरांना जगवायला, टिकून राहायला धीर देते,’ अशा स्त्रीचे आपण महिला दिनानिमित्त कौतुक करुया.
‘हे नारी तू घे भरारी,
व्यापून टाक क्षितिजे सारी’
– कु. वैशाली सुरेश कोरगांवकर