राणेंना राजयोग

महसूलमंत्री म्हणून ३० जुलैला श्री राणे यांचा शपथविधी होण्यापूर्वी marathiworld.com चे राशि भविष्यकार : एस. जी. अकोलकर यांनी १५ दिवस आधी वर्तवलेले भविष्य

शिवसेनेतून बाहेर पडलेला-शिवसेनेतून हकालपट्टी झालेला कुणीही नेता बडा झाला नाही, त्यामुळे नारायण राणेसुध्दा उद्ध्वस्तच होणार, असा प्रचार उध्दव समर्थक करत असले तरी ग्रह मात्र वेगळेच सांगत आहेत. नारायण राणेंचे भवितव्य हे अत्यंत उज्ज्वल असून, येत्या काही वर्षात नारायण राणे हे केवळ राज्यापातळीवरच नव्हे, तर राष्ट्रीय पातळीवरही ठळकपणे चमकणार आहेत. कुंडलीत राजयोग असल्यामुळे ते राज्यात महत्त्वाचे सत्तापद, केंद्रात महत्त्वाचे सत्तापद पटकावण्याची शक्यता आहे. राज्यातील एक प्रभावी नेते. असा त्यांचा लौकिक होणार आहे.

नारायण राणे यांचा जन्म १- एप्रिल १९५२ रोजी पहाटे ४:३० मिनिटांनी तत्कालीन रत्नागिरी जिल्हात मालवण तालुक्यात झाला. त्या दिवशी हनुमान जयंती होती. सूर्योदयापूर्वी हनुमंताचा जन्म झाला होता. राणेंचा जन्मकालही असाच असून, हनुमंताप्रमाणे त्यांचा जबरदस्त प्रभाव पडणार असल्याचे त्यांची कुंडलीच दाखवून देते.

नारायण राणे यांच्या कुंडलीचा विचार करता सध्याचा थोडासा काळ वगळता काही दिवसांत नारायण राणे यांचे नेतृत्व जबरदस्त चमकणारे आहे. त्यांनी आता आमदारकीचा राजीनामा दिला व ते जर निवडणुकीला उभे राहिले; तर ते पुन्हा हमखास जिंकतील आमदारच नव्हे, तर खासदारही बनू शकतील. राज्यात व केंद्रात त्यांना राजयोग आहे. रवी, बुध व शुक्राची धनस्थानात झालेली युती ही स्पष्टपणे राजयोग दर्शवत आहे. त्यामुळे ते बडया सत्तापदी आरुढ होऊ शकतील असा होरा प्रसिध्द ज्योतिषी एस. जी. अकोलकर यांनी ‘आपला वार्ताहर’ शी बोलताना व्यक्त केला. नारायण राणे व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कुंडलीत काही ग्रहस्थाने ही सारखीच आहेत, असेही अकोलकर यांनी सांगितले.