टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

संस्कार व आदर्शांशी बांधिलकी व नव्या विचारांचे स्वागत असा दोहोंचा मिलाप साधत, गेली ५३ वर्षे टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कार्यकरत आहे. झाडाची किंमत फक्त फांद्यांच्या बहरावर ठरते त्याचप्रमाणे मंडळ किती वर्ष जुने आहे.
त्यापेक्षा त्याचा विस्तार किती आहे यावर त्याचे मोठे पण अवलंबून असते.

टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने ५३ वर्षांची गौरवशाली परंपरा सांगताना आपल्या बहु आयामी, लोकाभिमुख व समाजपोयोगी उपक्रमाद्वारे सर्वांच्या हृदयात स्थान मिळवले आहे. रक्तगट सूचीवर रक्तदाते उपलब्ध करून देणे, इ. ४ थी व ७ वी स्कॉलरशीप मार्गदर्शन व सराव परीक्षा, वसंत व्याख्यानमाला व वसंतोत्सव, सार्वजनिक गणेशोत्सव, दिवाळीपहाट, किल्ले बांधणी स्पर्धा, किल्ले दर्शन शैक्षणिक सजल, सार्वजनिक वाचनालय या सारखे कायमस्वरूपी व परिस्थितीसदृश्य विविधांगी उपक्रम यामुळे हे मंडळ कायमच सर्वांच्या सकारात्मक चर्चेचा विषय ठरला आहे. या मंडळाने स्वत:ची वास्तू होण्यासाठी ‘वास्तू निधी संकल्प’ या उपक्रमाचे आयोजन सुरू केले आहे. नि:स्वार्थी व आपलेपणाने कार्य करणारे कार्यकर्ते व नगरातील तसेच बिवलीकरांचे प्रेम यामुळे या मंडळाचा विस्तार वाढतच आहे. मंडळाचा प्रमुख उपक्रम म्हणजे सर्वाजनिक गणेशोत्सव या वर्षी १०-०९-२००२ ते २०-०९-२००२ या कालावधीत गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. वेगवेगळया संस्कृतींचे दर्शन घडवणा-या भव्य देखाव्यांची सजावट मंडळ करते. थायलंड, दक्षिण भारत व चीन यांच्या संस्कृती दर्शनानंतर या वर्षी मंडळ ‘इजिप्शियन संस्कृती’ विषद करणारी कलाकृती साकारत आहे. फक्त देखावा म्हणून न ठेवता मंडळाचे कार्यकर्ते त्या संस्कृतीचा अभ्यास करून भाविकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्या संस्कृतीची ओळख करून देतात. दि. १२-०९-२००२ ते १७-०९-२००२ या कालावधीस मंडळाने ‘ग्राहक पेठेचे’ आयोजन केले आहे. प्रत्यक्ष जाऊन विविध संस्कृतीचे दर्शन घेता येणे शक्य नसेल तर व ज्यांनी या स्थळांना भेटी दिल्या आहेत त्यांना पुन:प्रत्ययाचा आनंद अनुभवण्यासाठी व गणेशदर्शनासाठी मंडळ या निवेदनाद्वारे आपणा सर्वांना हार्दिक निमंत्रण देत आहे. गणेशोत्सवाचे

स्थळ
सयोग मंगलकार्यालय,
टिळक रोङ टिळकनगर,
डोंबिवली (पू) स्थापना १९५०
– अभ्यंकर