शिल्प
सामोरं तिला जाताना
अपराधी झाल्याचं वाटतं
प्रेमापेक्षा प्रेमाचं
नाटक बरं वाटतं….
डोळयात तिच्या पाहतांना
जग ओथंबल्याचं वाटतं
तिला हसताना पहाणं
जणु सुंदर स्वप्न भासतं
ती मुक असताना
सर्व संपल्याचं वाटतं….
सामोरं तिला जाताना
अपराधी झाल्याचं वाटतं
प्रेमापेक्षा प्रेमाचं
नाटक बरं वाटतं….
– राहुल गुजर
|
माणूस
जगणे न सफल झाले
मृत्यु न विफल होवो
असे काही कर्म करावे
की मरण सुंदर होवो….
जगी शाश्वत न असे काही
चिरंतन जगणे ते काय असावे
जगण्याने आपल्या जिवंत रहावे
मृत्युनेही ती आशा करावी…..
व्यर्थ नको ते हेवे दावे
क्षणिक सुखाच्या मोहापायी
माणुसकी हा धर्म आपला
माणुस म्हणूनी जगावे मरावे……
– राहुल गुजर
|
मी
स्वयंपाकपाणी
धुणीभांडी
झाडझुड
पुसपास
निवडणं टीपणं
सडासारवण
बाळंतपण आजारपण
आल्यागेल्याचं पाहुणपण
जावयाचा दिवाळसण
आंथरूण पांघरूण
दिवाबत्ती शुभं करोती
आणि तू सांगशिल ती ती
कामे अगदी
ऊडया मारीत करीन
तु फक्त हो म्हण….
– प्रकाश गोसावी
|
प्रेम
तुझ्या डोळयातुन
तुझ्या भावना
माझ्या डोळयातुन
माझ्या मनापर्यंत
जावून दोघांचे मिलन होणे
यालाच जर प्रेम म्हणावे
तर इतक्या डोळस प्रेमाला
आंधळे प्रेम म्हणणा-या
जगाला काय म्हणावे
– प्रकाश गोसावी
|