प्रीतीची ही रीत
चंद्र फुलांना सांगतो तुझी न माझी कथा
चांदण्या मिटती लोचन अपुले शब्द शब्द ऐकता
कथीला त्याने तेव्हा स्वप्नांचा आठव मोठा
ती सांज वेळही जेव्हा मोगरा टपोर फुलला होता
निळाईतलं अथांग पाणी काठावरची तरंग गाणी
निरोप देता रवि धरेला क्षितीजावरची मुक विराणी
स्वप्न रंगात रंगलेली रात्रन् रात्र मंतरलेली
मौक्तिकाची सुरेख पंक्ती ओष्ठ द्वयांत उमललेली
त्या सा-या शब्दांची कहाणी तुझ्या भेटीची प्रत्येक निशाणी
हर एक ‘याद’ अधीर दिवाणी शब्दाविनाही जी फुलून गेली
मिटुनी लोचन शशी बोलला का असा हा डाव रंगला ?
कोणासाठी कोणी मांडीला कोण हरला कोणी जिंकीला ?
रातराणी मग हळुच हसली पानांमध्ये जुई मुसमुसली
टिपुन आसवं ती म्हणाली प्रीतीची ही रीत निराळी
देवेंद्र
|
जीवन
काही नसुनही बरेच काही आसते,
सर्व काही असुनही काहिच नसते,
जीवन हे असच आसते….
कधी कळया पाशाहुनही कठिण आसते,
तरी कधी कल्पने इतुकै सोपे नसते,
जीवन हे आसेच आसते…..
करण्या करीता बरेच काही आसते,
तर न करण्या करीता काहिच काहिच नसते,
जीवन हे आसेच आसते….. कधी कधी असते,
कधी कधी नसते,
अश्या असण्या नसण्यात आयुष्य फसते,
जीवन हे आसेच आसते….
गजानन काळे
|
एकच प्रश्न
आज का लिहीतोय, कुणासाठी लिहीतोय,
उगाच चीड आली, नशीबाला कोसतोय,
मी ठिकाणावर नाही, मनाला मी शोधतोय,
का माझ्यावर मीच हसतोय,
हसू का मी झालो, का मलाच फसवायचं,
मोठयांच्या खेळात का मलाच सापडवायचं,
दु:खी का सुखी मी, का मलाच सतवायचं,
कोणावर विश्वास ठेवायचा,
का शब्दालाच बेईमान ठरवायचं,
सर्वसामान्य माणूस कोणाला म्हणायचं,
का आपण दुस-यावर चिडायचं,
माणूस खरंच, ‘माणसालाच’ म्हणायचं,
का नेहमी हे आपणच आपल्याला विचारायचं?
विश्वनाथ क्षीरसागर
|
प्रेमात पडावं….
मलासुध्दा वाटतं प्रेमात पडावं
रोज एकदातरी तुझं दर्शन घडावं
तुझा प्रत्येक निरागस भाव हळूवार टिपावा
तुझा निरागस चेहरा खूप खूप न्याहाळावा
वाटतं तुझ्यासाशी खूप खूप बोलावं
प्रत्येक सुख दु:ख तुझ्याशी वाटावं
प्रेमाने तुझ्या डोक्यावर हळुवार हात फिरावा
तुझा तो कोमल स्पर्श नेहमी मिळावा
तुझ्या काही क्षणांचा सहवास नेहमी मिळावा
त्यांच्या सुगंधात तुझा दुरावा कधी न जाणवावा
वाटतं, प्रत्येक प्रसंगी तुझ्या पाठीशी असावं
ह्या कोमल कळीला सदैव जपावं
वाटतं, माझं प्रेम केवळ सात्विक असावं
काय पाहिलं तुझ्यात कधी न कळावं
वाटतं, खरंच हे कोरडं आयुष्य संपवावं
म्हणूनच वाटतं तुझ्या प्रेमात पडावं…..
सुधीर कुलकर्णी
|