सूर्य मावळतो आणि….
सूर्य मावळतो हळूच आणि
दिवसाच्या काठावर अलगद
सांज येऊन उभी रहाते
त्या क्षणी अस्पष्ट कुणाची
आठवण येत रहाते
प्रारब्ध म्हणावं की अकल्पित!
काही तरी सलतं
दिवसभर साचवुन ठेवलेलं
एक-एक अश्रु वाहतो
ह्याच क्षणाला मनापासून वाटतं
माझा हात हातात घेवुन
तू निशब्द उभं रहावं
आणि प्राजक्ताचं हळू हळू
उमलणं पहावं
शुभ्र निळया आकाशाचा
ताम्र वर्णी एक कोपरा होतांना
त्या कोप-या मधून मंदगतीने
पाखरं घरी जातांना
तु फक्त बोटांनी दाखवावं
आणि मी हलकेच तुझ्या खांद्यावर
मान टाकून ते पहावं
दीपाली पाटील
|
सुर्य
खूप खूप लवकर सुर्यबाप्पा उठला
ढगांच्या मागुन माझ्याशी हसला
तांबुस कोवळया कि रणांच्या संगतीला
येतोस क मित्रा माझ्याशी खेळायला
सुर्यदादा तू आहेस फारच लांब
तुझ्याशी खेळायला मी येणार कसा सांग
सुर्यबाप्पा रागाने लालबुंद झाला
दुपारी माझ्या डोक्यावर आला
हाय हाय हुश हुश उकाडा झाला
थांब आता अशीच शिक्षा करतो तुला
थोडया वेळानी राग शांत झाला
वा-याच्या झुळुकीने गारवा आला
जाऊ दे मित्रा उदया येतो म्हणाला
ढगांच्या कुशीत दडी मारु न झोपला
सौ. वर्षा छत्रे
|
फरक
तू अन् मी
एकाच अगीत
तू अन् मी
एकाच तळयात
तू अन् मी
एकाच रानात
तू अन् मी
एकाच श्वासात
तू अन् मी
एकाच स्पंदनात
तू अन् मी
एकाच मनात
तरीही अलग
वेगवेगळे अन्
बऱ्याच फरकाचे…..
संदिप धुरी
|
विरह
किती वेदनामय होती
ती क्षणं
ज्यावेळी माझी पावलं तिच्या
घरांपासून दूर जात होती
डोळयांना आवरणे तर कठीण
माघे वळून पाहण्याचे सुध्दा
भान राहीले नाही
अशा ह्या विरहात
तुझ्या आठवणींचा एक व एक कन
मी साठविला
सोबत
अशा या एकांतात
माझ्या आसवांचा एक न एक थेंब
त्यात मी सामाविला
कळत न कळत होत असलेल्या
ह्या त्रिकूटीला
सावरणे कोणाला आवडले ?
मला तर बिलकूल नाही
विनोद शहरी
|