हायकू
रणरणत्या उन्हाचा
असहय उन्हाळा
तहानेनं सुकलाय गळा.
चोचीच्या खुणा
पिकल्या पेरूवर
पोपट गेल्यावर
फटाक्यांचा आवाजानं
पक्षी उडाले.
सैरभैर झाले.
एक काजवा
कुट्ट काळोखात
उडतो दिमाखात.
एक झाड उभं
पालवी फुटलेलं
नवंनवं झालेलं.
भव्य इमारत
उंच उभी
भिडलीय् नभी.
दिवे गेले
दाटला अंधार.
काजव्यांचा आधार.
एकचं दिवा
लांबसडक रस्त्यावर
कुठवर पुरणार.
त्या गाईच
मेलयं वासरू
आवरेनात तीला अश्रू
धुकचं धुकं.
दवांनी भिजलीत
सारी पिकं.
भलमोठं जहाज
पळतयं वेगानं.
किना-याच्या ओढीनं
टकटक आवाज
सारखा झाडावर.
चोची मारतोय सुतार.
ती गेली
मी दार लावलं
घर रडलं
जमा झालेत शंख
किना-यावर
पाणी ओहटल्यावर
गार वारा अंगभर
थोडीशी ऊब
शेकोटी पेटवल्यावर
मी काठावरून
पाण्यात पाहिलं
माझं प्रतिबिंब दिसलं
दिसत नाही काही
वातावरण धूसर.
अथांग समुद्रावर.
दोन बोके
भांडून शांत झालेले.
तरी केस पिंजारलेले.
राजन पोळ
|
पाखरा….!
हे पाखरा वाटे
मज हेवा तुझा
शिकव मला झेप
आकाशी घेह कसा…
विहार जगी स्वतंत्र
कसले तुला बंध
नाही उद्याची खंत
मी मात्र सचीत…
आज मला ओळ
तिला भेटन्याची
कसा जावु सांग ?
आहे दूर ती…
किती झाले दिवस
नाही तिचे उत्तर
त्याच वाटेवर
लक्ष जाह परत….
संदेश माझा आत
नेशील का त्वरीत
विसरलिस का तू ?
वाट आहे मी पहात…!
अनिल आहेर
|