मराठी रसिकांनी पाठवलेल्या ‘कविता’

एकपण शब्दात माझ्या तिचे साम्य नशी….

कपाळी पहाटी रात्र भासत असे,
त्यावर केस तीचे जसे ढग नांदत असे.
चंद्रकोर लाऊनी रात्र दिसेल ती कशी,
रात लाजली बनूनी नवतरुणी तशी.
कपाळी रेषा दिसतील त्या कश्या,
त्याप्रेमळ राती विजा लखलखल्या तश्या.
रात्र कशी,
नवकाव्य लिहावे तशी,
पण शब्दात माझ्या तिचे साम्य नशी.
नयनी हरवून जावसं वाटे,
त्यावर पापणी ओझरून स्वप्न दाखवीत असे.
चिंब हौउनी दिसतील ते कसे,
गगनातील नक्षत्रे दिसतील ते तसे.
समजावत दिसतील ते कसे,
भाव पकटले अंतरीचे तीने तसे.
नक्षत्रे कसे,
नवकाव्य लिहावे तसे,
पण शब्दात माझ्या तिचे साम्य नसे.
औठी श्रावणीकळी मोहरली असे,
लिहले नाही कारण साऱ्या कविने लिहले असे.
खरच ! कळी असे,
कारण श्वासातून तिच्या सुगंध वाहत असे.
औठी बोलतांना दिसतील ते कसे,
धूंद वा-यात फूल नांदते तसे.
फूल कसे,
नवकाव्य लिहावे तसे,
पण शब्दात माझ्या तिचे साम्य नसे.
गाली केशरी समुद्र वाहत असे,
त्यावर खळी तीची जसे मंथनचालले असे.
काजळी लाऊनी दिसेल ती कशी,
त्या अथांग समुद्री नौका विहारे तशी.
गालात हसतांना दिसेल ती कशी,
त्या शांत समुद्री लाट उसळली तशी.
ते दृश्य लिहावे तसे,
पण शब्दात माझ्या तीचे साम्य नसे.

अपूर्वा सिन्नरकर

!!! मी !!!

माझ्यातला मी काही केल्या का बरं मरत नाही ?
हा निरंकुश वाढता ग का बरं सरता सरत नाही ?
कितीही उष्णता असली तरी घाम काही येत नाही
कितीही थंड प्यायलो तरी आग का शमत नाही.
रात्रीची सोड पन माझी दिवसाची गादी सुटत नाही
रात्रा वैऱ्याची आली तरी अंग आळस झटकत नाही.

वेळ कितीही पळाली तरी पाय काही उचलत नाही
काळ समोर आला तरी हृदय माझं धडधडत नाही
हजारदा हरलो तरी घमेंड काही जिरत नाही
वरती मनच म्हणतं मला जिंकायची इच्छा नाही
भव्य काही पाहिल तरी तोंडात बोट जात नाही
दिव्य काही दिसलं तरी हात काही जुळत नाही.
काहीही झालं तरी निर्लज्ज मन सलज्ज बनत नाही
तू कितीही समजव मला कळतय पण वळत नाही.

डॉ. शिवप्रसाद राजमान

आनंद यात्री

कुठून सुरू झालं हे माहित नसलं, तरी कुठे थांबायचं हे ठरवायचं असतं,
आयुष्य असचं जगायचं असतं.
कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं, स्वत:च्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचं असतं,
आयुष्य असचं जगायचं असतं.
दु:ख आणि अश्रुंना मनात कोंडुन ठेवायचं असतं, हसता
नाही आलं तरी हसवायचं असतं,
आयुष्य असचं जगायचं असतं.
पंखामध्ये बळ आल्यावर घरटं सोडायच असतं, आकाशात
झेपावूनही धरतीला विसरायचं नसतं,
आयुष्य असचं जगायचं असतं.
मरणानं समोर येऊन जीव जरी मागितला तरी मागून मागून काय मागितलसं असचं म्हणायचं असतं,
आयुष्य असचं जगायचं असतं,
इच्छा असो वा नसो जन्मभर वाकायचं असतं, पण जग
सोडताना मात्र समाधानानं जायचं असतं,
आयुष्य असचं जगायचं असतं,
आयुष्य असचं जगायचं असतं…

राहुल भालेराव

तू……….

तुझ्या नजरेतनं
बरसणा-या शीतल
चांदण्याचीही कधी कधी
भीती वाटते

वाटतं या शीतल किरणांनी
तनमन व्यापून टाकलं
तर तो किरणमयी दाह
मला सहन होईल का ?

तुझ्या हास्याचा खळखळणारा निर्झरही
मनाला कधी कधी अस्वस्थ करतो
भीती वाटते आपण त्यात
स्वत:ला झोकून तर
देणार नाही ना ?

तरीही सतत वाटतं
तुझ्या नजरेचं चांदणं सतत बरसावं
तुझं निर्मळ हसणं अखंड निर्झरावं

प्रकाश वैद्य