किती खरे किती खोटे
मी तुला भेटायला व्याकुळ किती आहे,
भेटायचे काही कारणही शोधत आहे.
केव्हा तरी भेटशील या आशेने वाट पहात आहे
भेटली तरी बोलायचे काय, हे विसरुन जात आहे.
काय ही दशा झाली माझ्या मनाची
मनातल्या मनात मी जळतो आहे.
तू म्हटले तर खरे, कि प्रेम माझ्यावर आहे,
पण प्रेम करुनही भेटायचे टाळीत आहे,
आणि विषाचे घोटावर घोट मला पाजित आहे.
तू हा गुन्हा केलास की खरी प्रित केली,
की माझ्यावर प्रेम करुन पस्तावलीस,
हे मन ऐकत नाही, तुला विसरायचे आहे.
तुला मी प्रेमात जिंकलो तर खरे
पण जिंकूनी हरलो हेही खरे.
– रवि अवसरे
|
विश्वासघात
किती प्रेम आहे माझ्या मनात कसं सांगू तिला,
तिच्या प्रेमात पागल झालो कसं समजावू तिला
विसरुनही विसरत नाही तिला,
जिवापाड प्रेम केलं तिच्यावर,
का समजलं नाही तिला?
प्रेम करुनही तिने, माझ्या प्रेमाचा विश्वासघात केला
जीवनात हा एकटेपणा काय जिवंत सोडेल मला?
या अखेरच्या क्षणी हे डोळे तिला शोधत आहे,
तुझी वाट पाहण्यात ही जीवन ज्योत विझत आहे.
– रवि अवसरे
|
आई
प्राचीन आई
आई सारखे दैवत सा-या जगतावरी नाही
म्हणूनी देवस्थानी सुध्दा असे आई
संसारामध्ये दंगून जाई
मुलांच्या जीवनात रंग घेई
घराचे नंदनवन करून ठेवी
डोक्यावर नेहमी तिच्या साडीचा पदर
सांभाळे संसाराचा ही भार
अन् मुलांना घडविताना कळत नसे तिला महिना अन् वार
एवढे करता करता माया सुध्दा असे अपार
आईचे ऋण फेडताना कमी पडले आयुष्य
कारण आईने घडविलेले असते आपले भविष्य
किती झाले तरी आई पुढे आपण लहान
म्हणूनी आई एक जगी महान
शिवाजीला घडविले या आईने
कृष्णावरही माया लावली या आईने
भारताची माय संस्कृती बनविली याच आईने
आधुनिक आई
बाबा कोण? आई कोण? हेच मुलांना कळत नाही
कारण आजकाल बाबा आईसारखे वागत राही
आई असते क्लबमध्ये तर बाबा असतात किचनमध्ये
आई जाते पार्लरला तर बाबा राहतात मुलांना घडवायला
आता एकच बाकी राहिलं
बाबांना आई म्हणणे शिल्लक उरले
श्रीकला शां. मोरे
शिवाई नगर – ठाणे
|
डायरी अन् पेन
डायरी अन् पेन दोघे खरे माझे मित्र
त्यांच्यामुळे चांगले वाटतात मला दिवस अन् रात्र
पेन जणू काही माझ्या भावनाच व्यक्त करत असते
आणि डायरी भावना तिच्या अंत:करणात सामावून घेते
पेन जेव्हा समोर येते तेव्हा माझी विचारगंगा उसळते
अन् डायरी जणू त्या विचारगंगेला भरती ओहोटीचे उधाण आणून देते
पेन अन् डायरी मला दोघे ही महासागराच्या मनाप्रमाणे वाटते
पेनने जेव्हा लिहिते तेव्हा ती अखंड काळ साथ देते
डायरी नेहमीच मला तिच्याठिकाणी लिहिण्यासाठी जागा ठेवून देते
दोघांची पण एकांतवेळी मला साथ असते
जणू काही त्यांचे माझ्यावर खुपच प्रेम आहे असे वाटते
श्रीकला शां. मोरे
शिवाई नगर – ठाणे
|