मराठी रसिकांनी पाठवलेल्या ‘कविता’

बोंन्साय

फुलायचय बहरायचय मला
मुक्त श्वास घ्यायचाय मला
उन पावसात मुक्त नहायचयं
पण मोहोरच जळालाय…
जगतेय मी एक संकुचित आयुष्य
नियतीने करकचुन बांधलीत माझी मुळं
जगतेय एक खुंट्लेलं आयुष्य
वर्तुळातल्या बिंदुसारखं…
जळालेल्या इच्छा आकांक्षांनी
करपलेल्या स्वप्नांना उराशी बाळगून
नियतीने दिलेली शिक्षा भोगत
जगतेय एक आश्रित जीवन
मी झालेय एक बोंन्साय…

प्रिती

कळी

आलीस जीवनात माझ्या, एक माळीण म्हणुन
माझ्या काटेरी जीवनातील एक कळी फुलावी म्हणुन
पण काय आणलं कुणास ठाऊक
लगेच निघुन गेलीस ‘नाही’ म्हणुन
जाऊ दे एक कळी उमलायच्या आतच कोमेजुन गेली
आपल्या नशिबी फुलणेच नाही म्हणुन

अभिजीत

नाते आपुले सप्तपदीचे

नाते आपुले सप्तपदीचे
हास्यातूनी फुलणारे
स्पर्शातूनी दृढणारे
स्वरांतुनी झंकारणारे
मौनातुनी उमगणारे
नाते आपुले सप्तपदीचे
शब्दांतूनी उमलणारे
श्वासातूनी बहरणारे
नाते आपुले सप्तपदीचे
नादातूनी उमटणारे
बहरूनी बरसणारे
नाते आपुले सप्तपदीचे
अतुलनीय मज भासे सारे
अद्वैतामधुनी प्रकटणारे !

सौ. चैताली मायभाटे

तू

तुला विसरायचा प्रयत्न केला,
तरी तुझी आठवण येते अधनं मधनं,

विसरणार तरी कशी,
ही असतात दोन वेडया जीवांची बंधनं,

तुझी आठवण आली की, सोबत अश्रू घेऊनच येते,
माझ्याशिवाय देखील तु आनंदात रहावं…
ही एकच इच्छा मनात असते.

रुपाली बोरसे