मराठी रसिकांनी पाठवलेल्या ‘कविता’

मैत्रीसाठी

मैत्रीसाठी लागतं काय ?
समवयस्क असणं ?
एकच भाषा बोलणं ?
सुंदर दिसणं ?
की अजून काही ?
मैत्रीसाठी हवं,
मनाचं जुळणं !
विश्वासाचं नातं !
मतांची समरसता !
अन् हात हातात,
प्रत्येक संकटात !
हे सारं कुठेतरी
तुला, मला
एकत्र आढळलं.
आणि एक झकास
मैत्रीचं नातं जुळलं.

कौमुदी

प्रेम

प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे
प्रेम असतं,
पहाटेच्या दवबिंदूगत
मनात अलगद उतरतं ।
प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे
प्रेम असतं,
चराचरातील कणाकणाचं
आपापसात असतं ।
प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे
प्रेम असतं,
आई-मुलाचं, भावा-बहीणीचं,
प्रियकर-प्रेंयसीचं खरचं सेम असतं।
प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे
प्रेम असतं,
देहभावापलिकडे जाऊन
विशुध्द पाताळीतच फक्त सत्य असतं ।
प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे
प्रेम असतं,
सिनेमा, सिरीयलमध्ये दिसणारं
वखवख असून प्रेम नसतं।
प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे
प्रेम असतं,
भक्त-भगवंताच्या भावनेत
सगळया नात्यांना सामावून घेतं ।
म्हणनूच – प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे
प्रेम असतं,
मैत्रीत संकुचित न रहाता
विश्वाला व्यापून उरतं ।
(आदरणीय कविवर्य मंगेश पाडगांवकरांची
क्षमा मागुन हे काव्यलेखन कारण प्रेम म्हणजे…..
च्या पुढे कवितालेखन करण्याचा मोह आवरता आला नाही)

कौमुदी

जीवन

जीवनातील प्रत्येक स्वर
कसा जुळवायचा
जुळलेले सुर कसे गायचे
आपणच ठरवायचं असतं
सुख दु:खाच्या अग्नीपरिक्षेतून
बाहेर कसं पडायचं
आपणच ठरवायचं असतं
आयुष्यातील प्रत्येक अनुभवातून
शिकवण कशी घ्यायची
आपणच ठरवायचं असतं
आपले प्रयत्न, आपली निष्ठा
ध्येय कसे गाठायचे
आपणच ठरवायचं असतं
कुणासाठी कुणीतरी
निवड कशी करायची
आपणच ठरवायचं असतं
आपणच ठरवायचं असतं
आपणच ठरवायचं असतं
करण, जन्मापासून मृत्यूपर्यंत
कसं जगायचं
आपल्याच हातात असतं

आरती जोशी

श्वास आणि तू

तुझ येणं, तुझ जाणं
माझ्या प्रत्येक श्वासानीशी असण
तुझ बोलणं, तुझ वागणं
क्षणोक्षणी माझ्याबरोबर राहणं
माझाच ध्यास, माझीच आठवण
माझ्यासाठी सर्व काही
तुझ्या डोळयातील भाव
हळुच सांगून जाई
शब्दा शब्दांनी जवळ येण
स्पर्शा स्पर्शातून एकरूप होणं
माझ्या प्रत्येक श्वासात, तू अनं तूच
तुझ्या प्रत्येक श्वासात, मी अनं मीच
कधी हसणं कधी रूसण
तरीही एकमेकाशिवाय न राहणं
असं हे आपलं निर्मळ नात
कुणालाही न समजण्या सारखं

आरती जोशी