मराठी रसिकांनी पाठवलेल्या ‘कविता’

माया

पहिल्या भेटीत असे काय झाले
नजरकटाक्षाने तुझ्या घायाल मी झाले
कवेत येता तुझ्या हरपून भान गेले
नकळत मी माझे अस्तित्व विसरून गेले

प्रेमा तुझा रंग कसा
पहिल्या पावसातल्या सरीसारखा
मातीत गेल्यावर चिखलासारखा
ओंजळित आल्यावर आरशासारखा

मन व्यथा ही माझी मलाच न कळते
जवळ असता मला तुझी जाणीवही नसते
दुर जाता नयनातुन अश्रु हे ढळते
आसवात ही माझ्या तुझिच प्रतिमा दिसते

जीवनातले हे सखे सोबती
भेटी आयुष्याच्या वाटेवरती
जोडुन मनाशी अनमोल नाती
एकाएकी निघुन जाती

दु:ख लपवण्यासाठी हसवतो मी
असे स्वता:लाच फसवतो मी
अश्रुंना डोळयातच अडवतो मी
नकळत माझ्या मनालाच रडवतो मी

पंख छाटलेल्या पक्षालाही उडावंस वाटतं,
जगावसं वाटतं, फिरावंस वाटंत
पण निष्कर्मी झाल्याची जाणीव झाल्यावर,
त्यालाहि हे जीवन संपवावंस वाटतं

सतिश मनगुतकर

पाऊस

लावून डोळे नभाशी
पाहिन वाट वसंताची
नभ येता दाटुन आकाशी
नवतारूण्य येई पंखाशी

सतिश मनगुतकर

तू येतेयस ना….

आंतरिक ओढ
तुझ्या मीलनाची
मनपाखरू केव्हाच उडून गेलंय
तुझ्या विशाल नेत्रसागराच्या
क्षितिजपार
स्पंदनास्पंदनांतून
जाणवू लागलीय
तूझी चाहूल
रोम न् रोम
तुझ्या सहवासाच्या सुखद
कल्पनेनं
पुलकित झालाय
डोळयांनी उभारल्यात
गुढया, तोरणे, कमानी
हृदयाच्या पाऊलवाटेवर
तुझ्या मीलनाची आतुरता
व्याकुळतेस मनाला
तू येतेयस ना ?

प्रकाश वैद्य

वाट आपुली……..

आपली वाट आपणच
ठरवायची असते
घसरणा-या आपल्या
पावलांना
आपणच सावरायचे असते
मोहाच्या क्षणांचे मोल
आपणच ठरवायचे
असते
मोहाला बळी पडल्यावर
पाऊल घसरल्यावर
मिळत नसतो
पश्चात्तापाला वेळ
तेव्हा नशिबाला बोल देण्यात अर्थ नसतो
आपल्या वाटेला आपणच
वळण द्यायचे असते.

प्रकाश वैद्य