मैत्री
मैत्री हे दोनच शब्द असले तरी त्यात बरीच महानता आहे. जसे ‘आई’ या शब्दात महानता असते.
‘मैफलीत रंगून जाते ती गायत्री
जीवनात विलीन होऊन जाते ती मैत्री’
मैत्री हा विश्वाचा एक धागा असा आहे……………….
जो रक्ताची नातीचं काय पण परक्यालाही खेचून आणतो
आपल्या ही मनाला तो जवळचा करून ठेवतो
आपल्या सुख दु:खात तो स्वत:ला सामावून घेतो
खरंच का रे…………………………..
एखाद्यावर मन लावण्यासाठी सुंदर असावं लागतं का ?
एखाद्यावर प्रेम करण्यासाठी श्रीमंत असावं लागतं का ?
आणि एखाद्याशी मैत्री करण्यासाठी सुंदर आणि श्रीमंत दोन्हीही असावं
लागतं का ?
मग त्याच्याकडे मन नसलं तरी चालतं………
तर नाही……………
मैत्री करण्यासाठी नसावं लागतं श्रीमंत आणि सुंदर
त्याच्याकडे असावं लागतो आपल्या मैत्रीचा आदर
परंतु…………..
मैत्री करणारे तुला खूप भेटतील
परंतु निभावणारे कमी असतील
मग सांगा……खरं मित्र कसे असतील
तर……..
कधी भांडणाची साथ
कधी मैत्रीचा हात
कधी प्रेमाची बात
अशी असते निस्वा:र्थ मैत्रीची जात.
पण या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो तर……
नेत्रकडा ओलावल्या आणि शब्द ओठावरच अडखळला
मित्र या शब्दाचा अर्थ तो दूर गेल्यावर कळला
काही जण मैत्री कशी करतात तर…….
काही जण उबेसाठी शेकोटी पेटवितात जणू शेकोटीची कसोटी पाहतातकाही जण स्वार्थासाठी मैत्री करतात जणू कामाच्या वेळेस आपली कसोटी पाहतात
मग सांगा शेकोटीत आणि मैत्रीत काय फरक दोन्ही पण एकच जाणवतात.
आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं
सुख दु:खाच्या क्षणी आपल्या मनाला जपणारं
अशी असते ती मैत्री
जीवनाला खरा अर्थाने समजणारं
ठेवा या लक्षात गोष्टी
माझ्याशी सुध्दा कराल ना तुम्ही गट्टी !!!
श्रीकला मोरे
|