मराठी रसिकांनी पाठवलेल्या ‘कविता’

या दिवाळीत…

या दिवाळीत तरी आता
खरा प्रकाश पडेल काय?
स्वच्छ, नितळ, कोमल हात
कमळासारखा दिसेल काय
सुंदर बहरलेला कमळ
दलदलीतून निघेल काय
धनुष्यातील तीर आता
उचित लक्ष्य साधेल काय
या दिवाळीत तरी आता
खरा प्रकाश पडेल काय?॥१॥

चक्र आडवे पडले आहे
तिरंग फिके पडले आहेत
स्तभांवरील अक्षरेही
अस्पष्ट-पुसट झाली आहेत
गांधीजींचा जीवनरंग
नोटेला तरी मिळेल काय
या दिवाळीत तरी आता
खरा प्रकाश पडेल काय? ॥२॥
रांगोळीतील अनंत स्वप्ने
दिव्यामध्ये जळून गेली
दिव्याखाली अंधार उरला
आशेची ज्योत भिजून गेली
तिमिराला जाळणारा
सूर्य आता उगवेल काय
या दिवाळीत तरी आता
खरा प्रकाश पडेल काय? ॥३॥
सत्य आणि धर्म रक्षक
‘कृष्ण’ पुन्हा येईल काय
‘गुंड’ गजाआड – सज्जन
उजळ माथी फिरेल काय
‘पसायदान’ प्रत्यक्षात
आता तरी मिळेल काय
या दिवाळीत तरी आता
खरा प्रकाश पडेल काय? ॥४॥

भालचंद्र भारद्वाज

माझं स्वप्ने…..

का माझं स्वप्न मला
इतिहास काळात नेते
वावरंत असलो वर्तमानात
तरी भूतकाळात नेऊन ठेवते
हे इतिहास कालीन स्वप्न
मला रोज रात्री भ्रमण करून आणते
आणि स्वप्न पूर्ण झाल्यावर
माझे मनच माझ्यावर हसते
असेच मला यांनी
एका इतिहासात नेऊन ठेवले
कळलेच नाही मला
म्हणुन एकाला जाऊन विचारले
‘हे सर्व काय चालू आहे
सागांल का हो मला’
तो म्हणाला ‘माहित नव्हते बावळटा
मग इथे कशाला आला’
तोवर आले शिवाजी एेंटीत
काय एेंटं त्याची जिरेटोप डोळयातं
लवकरच माझे मला कळले
आणले मला यांनी शिवकळांत
तो अभूतपूर्व राज्यभिषेंकाचा सोहळा
माझ्या डोळयाने मी पाहिला
जो आजवर मी
फक्त फोटोतच पाहिलेला
असेच एकदा याने
मला सिहंगडावर नेऊन ठेवले
मी म्हटले ‘ अरे ये बाबा रांत्रीचे
मला तू इंथ कुठे रे आणल’
समोर बघताच मला
तानाजी हा दिसला
मी म्हटले ‘ अरे यांनी तर
मला लढाईत नेऊन ठेवला’
चढणारा मावळाना
सूर्याजी काहि बोलला
परत येणारा घोरपडीला
पाहून तानाजी ओरडला
‘हे यशंवती परत का आलीस
काळजी करू नकोस माझी
मी म्हटल ‘अरे बाबा जरा हळू
नाही तर आई उठलंना माझी
सर केला मावळांनी किल्ला
चढवून मुघलावर हल्ला
गड आला पण सिंहं गेला !
असे बोलायला माझ्या शिवबा आला
माझ्या या स्वप्नावर
कोणाचाच विश्वास नाहि बसला
उलट मलाच ते म्हणु लागले
ये ….. तू वेडा तर नाहीना झाला
पण …..मी ऋणी आहे माझ्या स्वप्नाचा
जे मला भूतकाळात नेतात
मी न मागताच
मला खूपस काहि देऊन जातात.

आकाश राणे

नकोत दु:खे…

नकोत दु:खे, नकोत चिंता नकोच यातना
या दिव्यात सा-या लुप्त होऊ दे खंत वेदना ॥१॥

कर नवीन पर्व सुरू घेऊनी नवीन प्रेरणा
कर कार्यान्वित नव्या योजना, नवीन कल्पना ॥२॥
अस्त होऊ दे भांडण-तंटा, द्वेष, मनीचे क्लेष
प्रसन्न चित्त, धीर, धाडस राहू दे इतुके शेष ॥३॥
आनंदाची लहर घेऊनी, आली आज दिवाळी
आज इथेच घाल आशेची, स्वप्नांची रांगोळी ॥४॥
लुकलुकत्या या तेल-दिव्यांनी, उजळू दे ही अवनी
ज्योतीच्या तेजाने येऊ दे उष:काल जीवनी ॥५॥

भालचंद्र भारद्वाज

आकाश…..

का कोनास ठाऊक
अस का मला वाटत
हजारो लाखोच्या मध्ये
माझ्याकडे बघणार कोणी असंत
आहेत माझ्याच भोवती
हे नक्षत्र, चंद्र, सूर्य, तारा
तरीपण का मी असा
नेहमीच शांत आणि बिचारा
का हे काळे ढग निघाले
माझं निळरूप झाकायला
का लोक कटांळले
माझ्याकडे एक नजर बघायला
का मीच नेहमी सर्वाना
आपल्यात सामावून
घ्यावे मला ही वाटत असंत
कोणी मला ही गवसनी घालावे
म्हणतात नेहमीच लोक
आभाळाने स्वप्न पहायची नसतात
पण आपली स्वप्न मात्र माझ्याकडे
पूर्ण होताना पहात असतात
एवढे काहि झाले तरी
रोज समजावेन मी माझ्या मनाला
पण रोज नेहमी एक नजर
बघाना तुमच्याच ….. आकाशला !

आकाश राणे