मराठी रसिकांनी पाठवलेल्या ‘कविता’

पंढरी वारी

आषाढीच्या पंढरी वारीला
पांडूरंग दर्शनाची आस
ग्यानबा तुकारामाच्या जोडीला
टाळ मृदुंगाची साथ
माळशिरसच्या अंगणी
रिंगणी दौडणा-या अश्वाची
पदधूळ लावूनी मस्तकी
वाट चालती विठ्ठल मंदिराची
वारक-यांच्या हरीनाम गजराने
दुमदुमले अवघे पंढरपूर
चंद्रभागेच्या पुण्य स्पर्शाने
पावन झाले सारे भक्तगण
संसार थाटियेला गोपाळपुरासी
पुण्य श्लोक ती जनाई
भेट घडता विठुरायाची
साता जन्माची ती पुण्याई

मिलिंद कल्याणकर

छंद

छंद असावा एखादा
जोपासिता ते वाण
ताण तणावाच्या जीवणात
येई आनंदाला उधाण
आंगीकारलेला हा वसा
मनास आल्हादाचं देण
असता तो आगळा
पीडांचे होई विस्मरण
नाद आत्म समाधानाचा
स्वानंदाचे ते क्षण
जपुन ठेवता वाढती
सृजनतेचे हे लक्षण
नववर्षाच्या शुभदिनी
सकल करूया पण
बाणवुया छंद अंगी
फुलवु आमोद क्षण

मिलिंद कल्याणकर

रेशिम गाठ

वा-यावरी फुलांचा
मधुगंध मंद होता
नि:शब्द त्या किनारी
आसमंत धुंद होता
एकटाच होतो तिथे मी
माझ्या कवितांसवे
अन रानगित गात होते
रानपाखरांचे थवे
रूणझुण पैंजणांची
इतक्यात कानी आली
अन पाहता वळुन मागे
निमीषात चांद रात झाली
लावण्याची खाण रूपेरी
की सौंदर्याचे अनुपम लेणे
नजरे समोरी माझ्या होते
एक रूप विलक्षण अति देखणे
नवयौवना कुणी ती
जलभरण्या आली होती
गालावर खळी गुलाबी
नि डोळयात आगळी धुंदि
क्षण दोन क्षण जुळल्या नजरा
नि हृदयांची झाली चोरी
बांधुन रेशिम गाठ आगळी
ढळली ती सायंकाळ रूपेरी

सचिन काळे

करशिल ना?

दूरवर क्षितीजापर्यंत तुझ्यासाठी धावताना
माझ्यासाठी दोन अश्रू तुला ढाळताना पाहायचय
ढाळशील ना?
क्षितीजापार जाऊन आणलेले ते लालबुंद सुर्यबिंब
माझ्यासाठी ललाटावर तुला भाळताना पाहायचय
भाळशील ना?
तुझ्या माझ्या मनातील ध्येयनिश्चीतच्या वाटेवर
माझ्या सवे सावली बनुन चालताना
मला तुला पाहायचय
चालशील ना?
आयुष्याच्या वणव्यात जळताना तुझ्यासाठी तिळतिळ
माझ्या जिवनातील तुला वर्षा होताना पाहायचय
होशील ना?

सचिन काळे