नाते तूझे नी माझे
मनाचे रूपाशी असते
रूपाच मनाशी असते
कसही असले तरी मन एक रूपच असते
सर्व नात्याहून थोर असते
तूटले तर जीवाला घोर असते
असे तूझे नी माझे नाते
सर्व नात्याहून आगळे असते
मैत्रीच्या पलिकडे असते
प्रेमाच्याहिपलिकडे असते
जिव्हाळयाच्या अतूट बंधात
दोन जीवाना विश्वासानं जोडल असते,
असे तूझे नी माझे नाते
ऊन पावसात ही झाकायचे नसते
तूझे नि माझे हे एकच असते
हेच नात्यातील वेगळेपण दिसते
अतूट असे आपले विश्वासाचे नाते
फक्त दोघांनी जपायच असते जपायच असते
नाते तूझे नी माझे हे अनोखेच असे
मनोज राऊत
|
मोल
खरे प्रेम हे आंधळे असते
डोळस पणे करतात ते खरे नसते
ख-या प्रेमाला मोलच नसते
कारण ते अनमोल असते
समजणारे असतात बहू थोडे
पण त्या जीवास म्हणती वेडे
मनोज राऊत
|
प्रतीक्षा
चार डोळे वाट पाहती
अजूनी उभे राहून उंबरठयावरती
—वाट पाहात न थकले परी
—येईल आमच्या उद्या घरी
जगती घेउनी आशा सरती
—काल आमचा छानच गेला
—पण आज, उद्या परदेशाने नेला
ज्याला करून लहानाचे मोठे
आयुष्यभर सोसले खेटे
—ज्यासी ठरवीले उतारवयातील आधार
—तोच करूनी गेला निराधार
दूरावास्था करूनी अशी करूण
माया मोहजाली गूरफटून
विसरून का जाती तरूण
—तया कधी समजेल आहे त्यांचा घरी भूतकाळ
—वेडी आशा ठेवूनी बरी
—चार डोळे अजूनी वाट पाहती दारी
—उद्या आमूचा येईल परदेशातून घरी
मनोज राऊत
(वृध्द माता-पीत्यास सोडून जाणारा तरूण परदेशी,
वीसरून जातो की घरी वेडी आस लावून चार डोळे वाट पाहतात.
त्या माता-पित्यांच्या शब्द सांगण्याचा हा प्रयत्न.)
|
जीहाद
माणूस बनून वैरी
नीष्पाप जिवांचे घेतो का बळी
न कचरे चिरण्यास तान्ह्याचा गळा
जसा पडे भोपळयावर विळा
काय त्या जिवांचा गुन्हा
नाव घेऊनी म्हणती हे जीहाद
करती अनाचारी दंगा फसाद
धर्मयुध्द हे लिखीत आहे
पण धर्माची अर्थ ठावूक आहे
धर्म म्हणजे, निती, परोपकार, शील चांगूलपणा
घण कधी येईल त्या अनाचा-यांसी शहाणपणा
जे करती अनाचार, अन्याय, अधर्म
म्हणती त्यासी डौळात जीहाद
आहे माझी त्या विरूध्द ही फीर्याद
मनोज राऊत
|