मराठी रसिकांनी पाठवलेल्या ‘कविता’

पु. लं.

पु. लं. तुम्ही खरंच
साहित्याची फुलवली फुले

त्यांचा सुगंध अजून
आसमंतात दरवळे

रेखाटली तुम्ही
छान फुलराणी

आणि दाखवून दिलेत की
अशिक्षितांची सुधारते वाणी

कथा कथन ऐकताना
मन होते तल्लीन

हासता हासता पण
शिकता येते नवनवीन

राजकारणात तुम्ही
दाखवली आपली चुणुक

पण साहित्याशिवाय
तुमची भागली नाही भूक

अखेर एक दिवस
दैवाने घातला घाला

चिरंतर यात्रेचा
तुमचा प्रवास सुरू झाला

निर्व्याज मनाने भरभरून
देणग्या त्यांनी दिल्या

महाराष्ट्राचा पुरूषोत्तम आता
अनंतात विलीन झाला

सुनिता बरोबर, सगळयांना उणिव जाणवेल वरचेवर
विनोदाचा बादशाहा साहित्यात राहील अजरामर

सुनिता नानल

करोडपतीची

कौन बनेगा करोडपतीची
आहे आता हवा

सगळयांनाच वाटतं
त्यात नंबर लागायला हवा

ऐटीत बसावं जाऊन
फास्ट फिंगरवर ठेवून अक्ष

लागलाच नंबर तर पहावं
आपण किती मिळवू शकतो लक्ष

पहिल्याच तीन प्रश्नात ज्यांचे
संपतात सर्व चॉइस

अमिताभ देतो त्यांना धीर
त्यांचा उठवण्या व्हॉईस

एवढा मोठा कलाकार खरंच
सगळयांनाच बांधतो जेंव्हा जंजीर ने

तेव्हा त्याच्या एक नजर ने
उर भरून येतो अभिमानाने

ए बी सीएल च्या घोटयाळयाने
तो मुजरीम झाला पहा

मला खात्री आहे की
दिवार दूर करायला असेल खुदा गवाह

फास्ट मनीसाठी खरंच आहे चुरस
सामान्य ज्ञानासाठी ही मालिका ठरेल सरस

सुनिता नानल

मनात असूनी

मनात असून ही नाही जवळी
झाली मज पासून दूर.

तूझ्या विना जीण्याचा विचार करता
दाटे मनात माझ्या काहूर

नाही होणार का भेट आपूली
लागून राहीलीय हूर हूर

मनात आहे अजून घर करूनी
जरी झालीस मज पासून दूर

पहील्याच प्रीतीने गजब केले
आता जीवनी भावनेचा पूर

भेट न होता आला विरह
वाटे जीवन भर कूणकूण

पहिली प्रीत ही राही
करून कायम मनात घर

राहती तयाच्या आठवणी जीवनभर दूरदूर

मनोज राऊत

मनात माझ्या तू

मनात माझ्या आहेस तू
जीवनात माझ्या येशील का ?

अपूल्या प्रीतीच्या रोपटयाचे
वटवृक्ष करशील का ?

निर्मळ प्रीत असे कोणती
दोन मनातील परीपक्वता

उदात्त प्रेम हेच का ?
जन्मा-जन्मीची साथ तू मला देशील का ?

प्रीत तुझी आहे का मजवरी
ह्या प्रश्नाचे उत्तर तू देशील का ?

मनात माझ्या आहेस तू
जीवनात माझ्या येशील का ?
 
मनोज राऊत