आभास भेट
गोवताना फुलांचा सुगंधित गजरा
आठवतात तुझ्या नशील्या नजरा
तुझे माझ्यावरचे प्रेम
घायाळ शब्दांत बरसवणे
तुझ्या धुंद स्पर्शाच्या
नुसत्या कल्पनेत फुलणे
वेड लावतो कातरवेळी
बेहोष करणारा तुझा आवाज
जागवतो रात्र काळी
भारावणारा दवबिंदूंचा श्वास
किलबिलतो एखादा पक्षी जेंव्हा
तुझ्या अस्तित्त्वाचा भास
मिठीत माझ्या तेंव्हा तेंव्हा
तू समोर नसला तरी
असतोस प्रत्येक श्वासात तू
खेळात भास आभासांच्या
रोजच मला भेटतोस तू
शीतल जाखडी- शमा
|
पहाट धुंदी
पहाटेच्या दवात धुंदी
मिटल्या तुझ्या कुशीची
निमूट पडली नभाई
पहाट गर्द धुक्याची
स्पर्शातूनच प्रगटले सारे
मात्र नसे शब्दांचे
धुक्यात सारे विरघळले
सुख हे पहाटेचे
शीतल जाखडी- शमा
|
कोषातून बाहेर पडताना
अचानक जेव्हा तू कोषातून बाहेर पडतोस,
आणि बाहेरच्या जगाकडे पाहतोस,
तेव्हा त्याची भव्यता पाहून,
तुझे मन दबून जोते.
अथांग समुद्राची विशालता पाहून,
तुझे मन भीतीने काठोकाठ भरते,
अनंत अवकाशाकडे पाहताना,
तुझ्या मनात पोकळी निर्माण होते.
आणि हे असह्य होऊन,
तू परत कोषात जाण्यास धडपडतोस,
कोषाबाहेरच्या वास्तवाला घाबरून,
कोषातच गुरूफटायला बघतोस,
पण एक सांगू का मित्रा,
ह्या जगाची भव्यता,
समुद्राची विशालता,
अवकाशाची अथांगता,
स्वत:च्या मनात सामावून घे.
अन् बघ, अवघ विश्व तुझ्यात सामावेल .
आवेग
|
ती कोण ? ती …..
ती कोण ?
स्वप्न की सत्य ?
तिच्या गंधाने मन धुंद बंधुंद होतं,
ती कोण ?
ती …..
तिच्या नजरेत मन हरवून जातं,
ती कोण ?
ती …..
तिच्या दर्शनाने मन बेचैन होतं,
ती कोण ?
ती …..
तिच्या दर्शनाने मन मोहरून जातं,
ती
ती कोण ?
ती……..स्वप्न की सत्य ?
की……फक्त एक आभास ?
आवेग
|