मीच माझी सखी
मी आरशासमोर उभी होते
आरसा माझ्यासमोर होता
एकटक स्वत:कडेच पाहत होते.
भविष्याच्या वाटेकडे
सगळेच विचार वेगळे होते
नविन आशा जागणारे
सत्य जरी नसले तरी
सत्यासारखे वाटणारे
फुललेल्या कळीप्रमाणे
मन कस आनंदी होतं
वास्तवात असून देखील
कल्पनेच्या दुनियेत गुंतलं होतं
आरशातल्या सखीने मला हळुच हाक मारली
बुजऱ्या मनाला हळुच साद दिली
ती मला विचारत होती
मी तिला सांगत होते
लपलेल सारं काही बाहेर येत होतं
प्रश्न असे होते मनाला भिडणारे
मात्र केलेल्या चुकांची कबुली द्यायला लावणारे
तिच्याशी बोलण्याने एक गोष्ट मला उमगली
दु:खी जीवन जगण्याची चुक मला कळली
आणि सुखी जीवन जगण्याची रित
तिनच शिकवली
नंदिनी तेली
|
चांदण्या
लांबून आलेल्या चांदण्यांना
गुपित काही सांगावं
स्वत:च्या मनातल्या खुशीनं
स्वत:च स्वत:ला हसावं
लांबून त्यांना पाहिलं की
हेवा त्याचा वाटतो पण
जवळ आल्या की आनंदाचा
मनी झुला झुलतो.
चमकतात त्या कशा
असे प्रश्न अनेक पडतात
पण काही केल्या
उत्तरं नाही मिळत
शुभ्र तेजस्वी रुपानं
मन मोहून जातं
जावे त्यांच्या सवे
असं सारखं वाटतं
नंदिनी तेली
|
पुलं तुंम्ही….
पुलं तुम्ही जाताना
साठवण इथेच ठेवून गेला
आणि तुमच्या आठवणीने
प्रत्येक डोळा पाणावला
पुलं तुंम्ही जाताना
थोडतरी थांबायच होतं
सा-या व्यक्ती वल्लींना
तुम्हाला एकदा भेटायच होतं
‘बटाटयाची चाळ’
आता पोरकी झाली
त्या ‘फुल राणीलाही’
तुंम्हीच बोलकी केली
‘तुझं होतं तुज पाशीच’
हे आता जाणवत
जेव्हा तस नावीन्य
क्वचीत सापडत
‘पुर्वरंग’ ची ‘अपूवाई’
नेहमीच राहिल मनात
देशो देशी फिरताना
स्वदेश नाही विसरलात
‘वा-यावरची वरात’
पोहोचली घराघरात
लहान थोर वेडे होती
हसण्याच्या भरात
तुम्ही फार बिनधास्त होता
जेव्हां हादरवली दील्ली
‘पुलं तुम्ही स्वत:ला काय समजता’
जेव्हा उडवता ‘खिल्ली’
नाटक, संगीत, सिनेमा, लेखन
काही शिल्लक नाही ठेवल
जे जे मिळवल ते ते
तुम्ही नेहमीच वाटून टाकलं
रहावलं नाही म्हणून
प्रयत्ने काहीतरी लिहीन
जेव्हा पत्राचा मजकूर लिहीणा-याने
पत्यातल्या नावाच्या धन्याला बोलावून नेलं……
सुधीर जोशी
|
प्रतिभा आणि प्रतिमा
प्रतिभा आणि प्रतिमा त्यांची
काय वर्णु आता
हर एक गीत मधूर होई,
ज्यांच्या ओठी येता
ज्यांच्या स्पर्शे गीतरामायणही
सुवर्णित झाले
त्यांनी निर्मिता गीतांमधले
भाव स्वरांतुन आले
राष्ट्रभक्त आणि शिस्तप्रीय ते,
आदर्श ज्यांचा वीर
राष्ट्रासाठी लढले ते,
होऊनी सुधीर
मोह न ज्यांना अर्थ किर्तीचा,
असती कर्म योगी
असे बाबुजी होणे नाही,
फिरूनी या जगी….
सुधीर जोशी
|