थांब !
कुणीच थांबत नाही कुणासाठी कारण,
जगायचच असतं तिथे स्वता:साठी
कारण हे माहित नाही,
कारण, तेही समजत नाही
तिथे असतं फक्त ते विश्व,
नाही कुणी कुणाचं असतं
ज्याला आपलं समजावं,
ते आपल्यापासून सागरापार जावं
का असतो हा जिव्हाळा,
का असतो हा मनाचा कोंडाळा
स्पष्टपणे नाही,पण,
कुठेतरी असतं कुणीतरी थांबलेलं
ह्यात….त्यात….. प्रत्येकात…
वैशाली गिते
|
सागरा….
सागरा सांग तुझा खोलावा,
दूर अंतरी घुमत जावा
तू तर असतो सामावणा-यांना,
मनाचे हे असेच सा-यांना
तुझ्या रंगाचा नाही ठेवा,
तू दूर अंतरी नेणारा,
मध्येच थांब म्हणावं,
पहावं त्यांने मध्येच रहावं,
त्यातच रंगून जावं
तुझं रौद्र आहे रूप,
पण प्रेमाचा संथपणा त्यातच,
घे तुझ्यात विरून मला,
जसे सामावले आहेस साऱ्यांना,
तुझ्यात… खोलात…
वैशाली गिते
|
निसर्ग
अज्ञातासही ठाऊक नाही
निसर्गरूपी अगम्य कोडे
कळतो दिसतो पण वळत नाही
एवढे मात्र खरे
याचा नियम लिखित नाही
याला अलिखित नियम नाही
सप्रमाण आणि समतोल सर्वथा
यमनियमांची असे न चिंता याला सर्व बंध तोकडे
अज्ञातासही ठाऊक नाही
निसर्गरूपी अगम्य कोडे
असे जरी तो निराकार परि
असंख्य रूपे धरित्रीवरी
सजिवतेने वावर ज्याचा
जल भूमी अन् वायु रूपी हा
भरून सगळीकडे
अज्ञातासही ठाऊक नाही
निसर्गरूपी अगम्य कोडे
सौदर्यासह भरूनि राहिला
भव्य पणाला नसेच सीमा
रौद्र रूप तितुकेच भयंकर
आश्चर्याच्या गोष्टी बघता
खुलती मनाची कवाडे
अज्ञातासही ठाऊक नाही
निसर्गरूपी अगम्य कोडे
आत्मप्रौढीही नसे तयाला
निसर्ग नेमाची ही किमया
गरज असे ती आत्मचिंतना
जाण असावी हीच माणसां
न पडे पाउल भलतीकडे
अज्ञातासही ठाऊक नाही
निसर्गरूपी अगम्य कोडे
कळतो दिसतो पण वळत नाही
एवढे मात्र खरे
रामकृष्ण पटवर्धन
|
सहवास
सहवास हा सुखाचा
जन्मजन्मांतरीचा
आहे मोलाचा नाही फोलाचा
सहवास असावा बोलका
सुगंधित फुलासारखा
टवटवीत तजेलदार
अखंडित अविस्मरणीय
सहवास हा एकमेकांचा श्वास
एकमेकांचा ध्यास
तोच व्हावा निदिध्यास
आयुष्याचा
सहवास क्षणाक्षणांनी जगलेल्या आठवणींचा
एकमेकांच्या रेशीमी धाग्यांनी बांधलेला
हे रेशीम बंध प्रेमाचे रागाचे लोभाचे
आपलाच सहवास दृढ करतील असे
सहवास हेच तर आयुष्य
त्यावर तर जगतो सामान्य मनुष्य
म्हणून सहवासाची ठेवावी गोडी
मिळतील फळे गोमटी थोडी
रामकृष्ण पटवर्धन
|