स्वप्न
विसरताही येत नाही
कि आठवताही येत नाही
स्वप्नांच्या राज्यांत तुझ्याशिवाय
जाताही येत नाही
स्वप्नांत मी तुझ्या जवळ असते
आणि सत्यात फार दूर असते
स्वप्नांत गेल्यावर
स्वप्नांतच रहावस वाटतं
कारण थोडावेळ तरी
तुझा सहवास लाभतो
सत्यातला दूरावा
दूरच रहावा
स्वप्नातला जवळीकपणा
सतत लाभावा
मनिषा दबडे
|
सहवास
तुझ्या सहवासातील
प्रत्येक क्षण
माझ्या आठवणीचा
साठा आहे
आणि तूझ्या विरहातील
प्रत्येक क्षण
माझ्या अंतरीचा
ठेवा आहे.
मनिषा दबडे
|
आठवतयं
तुझे ते शब्द….
अजून कानातच रेंगाळतात,
आणि तो चेहरा….
अजून समोरच राहतो,
तुझी ती नजर….
अजून माझ्यावर खिळलेली,
तुझं ते हसणं….
अजून मला भूलवतयं,
तुझी ती आठवाण….
अजून माझ्या स्मरणात, मनात,
तुझा तो खोडकरपणा….
अजून त्रासावतोय,
तुझं ते प्रेम….
अजून सतत आठवतयं….
वैशाली गिते
|
गीत तुझे गाऊ कशी
ढगाळलेल्या नभामध्ये काळोख्या रातीला
चंद्र नाही साथीला उंच उंच जाऊ कशी
काटेरी जंगलात वादळाच्या साथीने
चुकलेल्या वाटेने घर माझे शोधु कशी
वाळवंटी उन्हामध्ये अनवानी पायांनी
थरथरत्या मृगजळांत घरटे बांधु कशी
सुकलेल्या नदीतून खडकाळी वाटेने
निळाईच्या पाखरारे गीत तुझे गाऊ कशी
श्रीधर मेहेंदळे
|