प्रेम
प्रेम केले तुझ्यावर
करत राहिन सदा
प्रेमात तुझ्या मीच काय
माझे जीवनच आहे तुझ्यावर फिदा
आपल्या प्रेमाची ही प्रेमवेल
वाढत राहवी अशी
जणू वाढता वाढता
आपल्याला बहरून टाकेल जशी
प्रेमाच्या या बहराला
ऋतू काळ नसावा
दोन मनांच्या मिलनाचा
हळूवार स्पर्श असावा
मनिषा दबडे
|
अंतरमन
अंतरमनी तूझाच ध्यास
सारखाच होई मज तूझाच भास
का माहित नाही पण
सारखेच वाटे तूच आहेस
पण जेव्हा मी तिथे पाही
तेव्हा होई माझा विरस
तिथे कधी कुणीच नसे
असे तिथे ती प्रतिमा
जी माझ्या मनी वसे
मनिषा दबडे
|
प्रेमपत्र
तू पाठवलेल पहिलचं
प्रेम पत्र मिळालं रे मला
वाचताच क्षणी वाटलं
हो म्हणू का मी याला
प्रेम, माया, एकनिष्ठता,
होती त्या पत्रात
जीवनभर साथ आणि
प्रेम निभवण्याची वचनं
होती त्या पत्रात
प्रेम पत्र म्हणू याला की
नशीबाचा लेख
होकाराचा नादच
झाला मनातून एक
मनिषा दबडे
|
तू
तू म्हणजे नक्की कोण ?
हा प्रश्न नेहमीच पडतो
मनाला सतावतो
त्यावेळी मला समजलं
तूच तर आहेस माझ जीवन
माझं सर्वस्व, माझं भाग्य,
तूच तर आहेस तो
जो निराशेतही मला आशेचा किरण दाखवतो
तूच तर आहेस तो
जो दु:खात मला सुखाची साथ देतो
आणि आयुष्याच्या या खडतर वाटेवर
प्रेमाने मला विश्वासाचा हात देतो
मनिषा दबडे
|