मराठी रसिकांनी पाठवलेल्या ‘कविता’

मिलाप

शब्द बोललेच नाही तरीही त्याने
भाव अंतरीचा ओळखला होता
कारण तेव्हा हातात त्याच्या
हात तिने गुंफला होता
मनातली अमूर्त प्रतिमा
समूर्त साकार जाहली
तिच्याच स्वप्नी रंगला तो आणि
जीव त्याचा गुंतला होता
अजुनही आठवतात मजला
क्षण भेटीचे पहील्या
जेव्हा दोन मनात मनस्वी
एक पारीजात दरवळला होता
आठवली भेटींची स्थळे आणि
संवाद तो स्मरला होता
तो सह्याद्रीही तेव्हा
निर्झराला भुलला होता
नकळत दोषांच्याही
मनोमिलन जाहले
तो चंद्रही त्या समयी
मधुसवे रमला होता
सुर जुळले परस्परांचे अन्
जगण्याची मैफल जाहली
स्वर अन् सुरांचा तो
मिलाप अनोखा होता

राहुल सुदामे

आयुष्य कसं जगावं?

आयुष्य फुलांसारखं जगावं
कोमेजून जाण्यापूर्वीच
सुगंधाचं देणं देउन जावं

आयुष्य मुलांसारखं जगावं
निरागस चेहे-यामधून
खळखळून हसावं
आयुष्य वा-यासारखं जगावं

प्रचंड वेगाने
बेभान धावत रहावं
आयुष्य नदीसारखं जगावं
वेगवेगळी वळणे घेत

सागराला जाउन मिळावं
आयुष्य पक्षांसारखं जगावं
अंतरीच्या उर्मिनं भरारी घेउन
सारं आकाश काबीज करावं

आयुष्य मेघांसरखं जगावं
चैतन्याचा मनस्वी वर्षाव करून
समाधानानं रीतं व्हावं

राहुल सुदामे

मांगल्याची गुढी उभारू

स्वागत करुया नव वर्षाचे
हातात घेऊनी हात
मांगल्याची गुढी उभारू
करुया तिमीरावर मात
हेवे-दावे विसरून जाऊ
करूया नवी सुरूवात
मैफल जमवू हर्षभराने
सुर घेऊनी सात
नव-वर्षाच्या प्रतिपदेला
नविन टाकूया कात
चैतन्याच्या समईमध्ये
स्नेहाची वात
खाऊ गाठी देऊ भेटी
लुटुया आनंद दिनरात
गुढीपाडवा साक्ष ठेऊनी
पेटवू प्रेमाची फुलवात
घराघरात मोहरावा
आनंदमयी पारिजात
तिथे असावी सदैव प्रीती आणि
आपुलकी काळजात
संकल्प हा नव-वर्षाचा
एक वेगळी रुजवात
एकदिलाने सारे राहू
समाधानाने वैभवाता

राहुल सुदामे

एखाद्या वळणावर

एखाद्या वळणावर एक झाड असत
कुणी लावलं कधी लावलं का लावलं
याचं कुणालाच काही नसतं
रखरखत्या ऊन्हात एकटच ऊभं असतं
त्याची किती पाने गळाली किती फान्द्या तुटल्या
याचं सावलीतल्या वाटसरूला काहीच नसतं
त्यालाही स्वत:ची दु:ख असतात
वादळाने केलेले आघात जखमा कुरहाडीने केलेल्या
याच घरटयातल्या पाखराला काहीच नसतं
तो एकटाच आयुष्यभर ऊभा असतो
आपलं दु:ख लपवायचं चटके खातही हसायचं
त्याचा स्वभावच तसा असतो
पण आपण भावनाशुन्यच राहायचं का
मायेच्या सावलीत बसूनही आपल्या माणसांच प्रेम विसरून
असंच रूक्ष राहायचं का
का आपणही त्यांच्यावर प्रेम करायचं
प्रेमाची सावली मायेचा हात आणि विश्वासाचा आधार देऊन
ते वळणावरच झाड आपलं म्हणायचं

निलू