मराठी रसिकांनी पाठवलेल्या ‘कविता’

पहिला पाऊस

आकाशात जमले काळे काळे ढ़ग
सोसाटयाचा वारा सुटला मग
पावशाने आपला काढला सुर
ढगाकडे पाहून नाचू लागले मोर
ढगांनी सुरु केला गडगडाट
वीजांचाही व्हायला लागला कडकडाट
ढगांनी हळूच उघडले आपले दार
पावसाला सुरुवात झाली धुवांधार
सारे आनंदाने लागले नाचायला
मजा आली पहिल्या पावसात भिजायला
चोहीकडे झाले पाणीच पाणी
त्यात हळूच होडया सोडल्या कुणी
खिडकीतून डोकावून पहात होते काही
घरात बसायला पोर म्हणत होती नाही
रस्त्यावर वाहनं धावायला लागली हळू
पुढचं काही दिसेना म्हणती कसं पळू?
काहीची तर खूप झाली होती फजिती
तरीही पहिल्या पावसाने आनंदली होती
जेव्हा हा धो धो पाऊस पडला पहिला
सगळयांच्या मनीचा आनंद ओंसडून वाहिला

सौ. मनिषा नवले
पुणे

क्षितीज

आकाश म्हणाले धरतीला
खुप भेटावेसे वाटते तुला
मग धरती म्हणाली आकाशाला
खरच जर असे वाटते तुला
तर जाऊन विचार त्या क्षितीजाला
तोच राहिल आपल्या मिलनाची साक्ष
आणि मगच खऱ्या अर्थाने
मिळेल आपल्या प्रेमाला मोक्ष

सौ. मनिषा नवले
पुणे

प्रतिमा

तुझी प्रतिमा कशी विसरावी
क्षणोक्षणी तू मज आठवावी ॥धृ॥
नाजुक चालणं, मृदू भाषण
पाहून ह्रदयाचे, होते स्पंदन
मनात नाजूक लहर उठावी ॥1॥
ओठ पोवळी, हनू चिंचोळी
भासे तुझी गं, कांती कोवळी
जशी यौवनाची लहरच यावी ॥2॥

उदय गोखले

स्वप्न

हिरवा शालू नेसून आली मदनाची मंजिरी
अंगात जिने घातली चोळी जरतारी
तारुण्याने मुसमुसलेला जिचा शरिरभाग
पाहुन तिजसी होते ह्रदयाची तगमग
हातात हात घेता तिचे शहारले अंग
वाटे मज मी केली तिची एकाग्रता भंग
क्षणात ती निघून गेली ना कुठे दिसे माग
शोधता तिला मी आली मज वास्तवात जाग

उदय गोखले