समीर श्रॉफच्या आयुष्यात नेहाच येणं ही एक सुखद घटना होती. त्यांचे नुकतेच लग्न झाले होते. नेहाचा पायगुण म्हणून की काय त्याच दरम्यान देशातील पहिल्या तीन श्रीमंत व्यावसायिकांच्या पंगतीत समीर श्रॉफने दुसर्या क्रमाकांचे स्थान पटकावले होते. इतक्या कमी वयात यशाचं उतुंग शिखर गाठणार्या समीरचं सर्वत्र कौतुक झालं होतं. समीरने आपल्या यशाचे सगळ श्रेय आपल्या आईला ….जयश्रीला दिल होतं!
नेहा कोठारी ही २१ व्या शतकातील एक संस्कारी मुलगी होती. तिला छायाचित्रणाचा छंद होता. नेहाचे वडील श्री. भास्कर कोठारी हे अनिवासी भारतीय होते.
सगळ छान आणि सुरळीत सुरू असताना अचानक समीरच्या बाबतीत काही विचित्र घटना घडायला लागल्या. समीर श्रॉफ एकाच वेळी दोन वेगवेगळया ठिकाणी दिसला होता. जयश्रीची मैत्रिण इझारिवाला हिने समीरला ह्या शहरात त्यावेळी बघितलेलं होतं….ज्यावेळी समीर कोचिनला होता.
ह्या इझारिवालाच्या वयाचा दोष मानून सगळयांनीच त्या घटनेकडे दुर्लक्ष केले होते. पण जेव्हा समीर श्रॉफच्या ऑफिसमध्ये काम करणार्या मोहनलाही तसाच अनुभव आला…तेव्हा मात्र सगळयांच्याच मनात प्रश्न उभे राहिले. जेव्हा स्वत: नेहाने हाच अनुभव घेतला …तेव्हा ह्याच प्रश्नाचं रूपातंर रहस्यात झालं. समीर श्रॉफ सारख्याच दिसणार्या ह्या व्यक्तीनी त्याला भेटणार्या कुणालाच ओळखलं नव्हत. अगदी नेहाला सुध्दा!
ती व्यक्ती म्हणजे समीरचं प्रतिबिंब होतं. फरक करण कठीण होते! मात्र हुबेहुब समीर…!
ह्या रहस्याचा गुंता अधिकच वाढला जेव्हा तो समीर सारखा दिसणारा….समीर श्रॉफच्या घरी पोहोचला ….त्याने नेहा सोबत रात्र काढली! आणि खरा समीर श्रॉफ घरी पोहोचण्याच्या आधीच तो निघून गेला! नेहा संपली होती!
CBI ऑफिसर इन्सपेक्टर अभिजीत सरदेसाईला ही केस सोपविण्यात आली. अभिजीतने निष्कर्ष मांडला …ह्यात गुन्हा असा घडलेलाच नाही. हा मानसिक आजाराचा एक प्रकार आहे….
पण इन्सपेक्टर अभिजीत सरदेसाईचा हा निष्कर्षही खोटा ठरला…जेव्हा समीरने नेहाच्या वडिलांवर, भास्करांवर त्याच्यांच ऑफिसमध्ये जीवघेणा हल्ला केला! त्यावेळी समीर श्रॉफ होता त्याच्या स्वत:च्याच ऑफिसमध्ये!
– भाग्यश्री केंगे, नाशिक
संजय घोडावत ग्रुप प्रस्तुती |
– प्रमुख भूमिका –
संदीप कुलकर्णी, अंकुश चौधरी, अमृता खानविलकर, तेजस्विनी पंडित, विद्याधर जोशी, इला भाटे, उदय टिकेकर, अमिता खोपकर, संदीप पाठक, महेश जोशी, दीपक करंजकर, आणि संदीप कुलकर्णी |
कथा – पराग कुलकर्णी , शिरीष राजवाडे |
पटकथा – पराग कुलकर्णी, सतीश राजवाडे |
संवाद – पराग कुलकर्णी |
दिग्दर्शक – सतीश राजवाडे |
छायाचित्रणकार – सुरेश देशमाने |
नृत्यदिग्दर्शक – उमेश जाधव , राजेश बिडवे |
कला दिग्दर्शक – महेश साळगांवकर |
वेशभूषा – नेहा नुपुरा |
रंगभूषा / स्टायलिस्ट – अतुल शिधये |
साहसीदृष्य – कौशल मोजेस |
संगीत / पार्श्वसंगीत – विश्वजीत , अविनाश |
संकलन – राजेश राव |
ध्वनी – अतुल देशपांडे |
गीतकार – विवेक आपटे , श्रीरंग गोडबोले , अश्विनी शेंडे |
प्रसिध्दी – सचिन गुरव |
जनसंपर्क – गणेश गारगोटे |
कार्यकारी निर्माता – सुनिल भोसले |
निर्माते – हसमुख हिराणी , जी. प्रशांत , संतोष नवले |
अधिकृत संकेतस्थळ www.gaiir.krutifilms.com
ऑनलाईन पार्टनर मराठीवर्ल्ड डॉट कॉम www.marathiworld.com/gaiir
कृती फिल्मस
तळ मजला, समीकरण अपार्टमेंट्स, संत जनाबाई रोड, विले पार्ले (पूर्व), मुंबई – ४०००५७
राहूल हसकर – +९१-९८२०१९९४१४, गणेश गारगोटे – +९१-९८२०४५५४०३, संतोष नवले – +९१-९८२०८०४२९८