लगन

laganकथा अपंग शास्त्रज्ञ व त्याच्या विज्ञान भरारीची

प्रोफेसर ब्रजेश शास्त्री, अपंग, व्हिल चेअर शिवाय आयुष्याची कल्पनाही न करु शकणारा जागतिक किर्तीचा शास्त्रज्ञ ! ब्रम्हांडाची निर्मिती कधी व कशी झाली तसेच काळाचा प्रवाह कोठून व कधी सुरु झाला? ‘कृष्ण विवर’ या सारखी अवघड समीकरणे सोडवून जागतिक, वैज्ञानिक विकासाची नवी मानव जातीला अर्पण केली ! या विश्वातील अपंग मानवास नवा आव्हानात्मक संदेश पाठविला ‘मन में अगर लगी लगन मुठ्ठी में आ जायें सारा गगन’…!

प्रोफेसर ब्रजेश शास्त्री यांना ऐन विशीतच ‘मोटार न्युरॉन डिसीझ’ नावाचा असाध्य रोग जडला. सदर आजारात मनुष्याच्या शरीरातील सर्व अवयव हळू-हळू निकामी होऊन संपूर्ण अपंगत्व येते. त्यातच त्यांना न्युमोनिया झाला त्यामुळे त्यांची वाचाही गेली. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार प्रोफेसर काही महिन्यात प्राण गमावतील. परंतु, प्रो. ब्रजेश शास्त्रींनी आयुष्यावर विजय मिळवत, मेडिकल सायन्स् ला आव्हान करीत स्वत:ला कॉम्प्युटराईज्ड व्हिल-चेअर मध्ये अडकवून घेत कॉम्प्युटरच्या सहाय्याने कृत्रिम आवाजाची निर्मिती करुन या ब्रम्हांडातील न्युटन व आइनस्टाइन यांच्या पंक्तीतील महान शास्त्रज्ञ ही बिरुदावली मिरविली.

प्रोफेसर ब्रजेश शास्त्री हे विज्ञान जगातील मान्यवरांमध्ये गणले जाऊ लागतात. जगातील प्रयोगशाळांमध्ये भौतीकशास्त्र विषयक अडचणी त्यांच्या मार्फत सोडविल्या जातात. प्रो. ब्रजेश शास्त्री करिता ‘काम’ हेच आयुष्य शिल्लक राहते. प्रो. ब्रजेश शास्त्री यांच्या कामात त्यांना दोन सहकारी शास्त्रज्ञ रोहित आणि नीना हे मदत करतात. परंतु, रोहित आणि नीना यांची तपश्चर्या प्रो. ब्रजेश शास्त्रीच्या तुलनेत अत्यल्प असते.

श्रेया ही एक अतिशय हुशार विद्यार्थिनी जी प्रो. ब्रजेश शास्त्री यांच्या विषयी त्यांच्या विद्वतेमुळे त्यांच्याकडे आकर्षित झालेली असते. या आकर्षणामुळे ती भौतिकशास्त्र या विषयात प्राविण्य मिळवते व पुढे ती प्रो. ब्रजेश शास्त्री यांच्या ‘इन्स्टिटयुट ऑफ प्युअर सायन्सेस् या संस्थेत स्वत:ची निवड करवून घेते. प्रो. ब्रजेश शास्त्री तिचे आदर्श असतात. प्रो. ब्रजेश शास्त्री संशोधन करत असतांना त्यांच्या एक गोष्ट लक्षात येते की श्रेया ही त्यांच्या बरोबरीची शास्त्रज्ञ होऊ शकेल. तिची मेहनत, तपश्चर्या ही प्रो. ब्रजेश शास्त्री यांच्या काकणभर ही कमी नसते. याच कारणांमुळे प्रो. ब्रजेश शास्त्री हे श्रेयाच्या नकळत अतिशय जवळ येतात.

सुरवातीच्या काळात प्रो. ब्रजेश शास्त्री व श्रेया हे संशोधनात मग्न असतांन त्यांच्यात नकळत भावनिक धागे उमलु लागतात. ही गोष्ट त्यांच्या आधी प्रो. ब्रजेश शास्त्रीचा काळजीवाहू नोकर श्यामलाल याच्या लक्षात येते. पुढे श्यामलाल हा कायम या प्रयत्नात असतो की श्रेया व ब्रजेश हे एकत्र यावेत व संशोधनाचे कार्य पुढे न्यावे तसेच, प्रो ब्रजेश शास्त्री यांच्या जीवनात आनंदाचे, प्रेमाचे क्षण यावेत.जेव्हा प्रो. ब्रजेश शास्त्री यांना त्यांच्या जीवनात नकळत झालेल्या प्रेमाच्या आगमनाची जाणीव होते तेव्हा ते हेलवतात. कारण त्यांना ही वस्तुस्थिती माहीती असते की या प्रेमाचा स्विकार करुन ते श्रेयाच्या आयुष्यात दु:ख व वेदनाच निर्माण करतील. ते कोणत्याही प्रकारचे शारीरीक सुख तिला देऊ शकणार नाहीत. इतकेच काय ते किती काळ जगू शकतील याची शाश्वती त्यांचे डॉक्टर किंवा ते स्वत: ही देऊ शकणार नाहीत. मृत्यु कधीही झडप घालू शकतो याची त्यांना जाणीव असते.

lagan श्रेयाच्या कर्तृत्वाची तसेच तिच्यात व प्रो. ब्रजेश शास्त्री या दोघांत रेशमी धागे उलगडू लागल्याची जाणीव त्यांच्याच संस्थेतील रोहित व नीना या सहकारी शास्त्रज्ञांना होते. याच कारणांमुळे ते श्रेयाला त्यांचे प्रतिस्पर्धी समजू लागतात. श्रेयामुळे त्यांच्या स्थानाला धक्का लागेल याची चिंता त्यांना सतावू लागते. म्हणूनच, ते श्रेया व प्रो. ब्रजेश शास्त्री यांचा तिरस्कार करु लागतात व त्याच्या मार्गातील श्रेया ही धोंड आहे असे समजू लागतात.

प्रो. ब्रजेश शास्त्री ज्यांनी अपंगत्वावर मात करुन धवल यश मिळविले असते त्याच्या मनात प्रेमाच्या झालेल्या शिरकावामुळे त्यांना श्रेयाची ओढ लागते व त्यांचे मन वैज्ञानिक व अध्यात्मिक यांच्या सूवर्णमध्य असलेल्या संशोधनाकडे झुकते. यामुळे सर्व जगात खळबळ उडते.

मनुष्य जेव्हा मरतो, त्यावेळी त्याच्या शरीरावर नेमकी काय प्रक्रिया होते? त्याच्या शरीरातुन आत्मा नेमका कसा व कोठून बाहेर पडतो? शरीरातुन बाहेर पडलेल्या आत्म्याशी व त्याच्या पंचतत्वात विलिन होण्याच्या कालावधीत त्याच्याशी संपर्क तसेच त्याच्या प्रवासाची दिशा जाणून घेता येते काय? आत्म्याला विशिष्ट प्रयोगाने किती काळ एकाचा जागी थांबविता येते व त्याच्याशी संपर्क ठेवता येतो? याविषयी प्रयोग करुन तो यशस्वी करायचा ते ध्यास घेतात व त्याद्वारे श्रेयाच्या संपर्कात राहता येईल याची खात्री त्यांचे मन व विज्ञान देत असते. सदर प्रयोग ते यशस्वी करुन दाखवितात.

lagan आता मात्र, जर्जर शरीराशिवाय श्रेयाच्या संपर्कात राहण्याकरिता ते मरण निश्चित करतात. आत्म्याच्या स्वरुपात राहून ते विज्ञानाची प्रगती, श्रेयाला विविध प्रकारचे संशोधन करण्याकरीता मार्गदर्शन व पवित्र प्रेम करण्याकरीता शरीराचे बंधन तोडून आत्म्याच्या स्वरुपात श्रेयाच्या सहवासात राहण्याचे नक्की करतात.

पुढील दिवशी अचानक त्यांचा मृत्यु होतो. मृत्यु कसा होतो? मृत्युचे कोडे आत्मा कसा सोडवितो? श्रेयाला शरीर व आत्मा यांतील फरक कसा समजतो? ती पुढीलसर्व आयुष्य प्रो. ब्रजेश शास्त्री यांचे स्वप्न साकार करण्याकरिता वेचते.

यासर्व ‘लगन – THE DEDICATION ‘ या चित्रपटातील खास आध्यात्मिक व वैज्ञानिक गोष्टी आहेत. वरील चित्रपट हा सामान्यत्वा पासून विशीष्ठ पैलुंमुळे असामान्यत्वा कडे झुकलेला आहे.

कलाकार

कलाकार
भाषा   – हिन्दी
निर्मिती व दिग्दर्शन – महेश केंगे
क्रिएटीव्ह हेड  – प्रभाकर बांधेकर
असोशिएट डायरेक्टर व ई.पी.  – सुधिन ठाकुर
कथा – महेश केंगे
स्किनप्ले ऍण्ड डायलॉग्ज् – सुदिन ठाकूर
कलाकार – यतिन कारेकर, दिपा परब, सचल राज, त्रिश्ना, शशीकांत गंधे, सुजाता ठक्कर, वैभव माथुर, दिपक पाटील, राजा कापसे, अलोक वर्मा आणि इतर.
सिनेम्यॉटोग्राफी – संजय पाठक
संगीत – संजय गिते
गीतरचना – सुधाकर शर्मा, मिलिंद गांधी, साना असलम
संकलन – अमित आणि राजेश
पार्श्वगायन – अलका याज्ञिक, बाबुल सुप्रियो, पामेला जैन, वृंदा केंगे
नृत्य दिग्दर्शन – दिनेश बलराज
आर्ट डायरेक्टर – साई एस. पाथे (बॉबी)
प्रमुख सहाय्यक दिग्दर्शक – शिवम बोरकर
प्रोडक्शन कंट्रोलर – पवन वैद्य, शंकर धुरी

छायाचित्रे

सहकार्य

प्रसिध्दी –
अधिकृत संकेतस्थळ ऑनलाईन पार्टनर
ऑनलाईन पार्टनर मराठीवर्ल्ड डॉट कॉम www.marathiworld.com/gaiir

संपर्क – देवराई

श्री माताजी फिल्म्स
जसपार्क १, सी. एच. एस. बी/१०२,
पहिला मजला, बिल्डींग नं. २/६९
अरुण कुमार वैद्य मार्ग, गोकुलधाम,
गोरेगाव (पूर्व),
मुंबई – ४०००६३
महाराष्ट्र, भारत
फोन – ९१-२२-२८४२२७८६