नमस्कार जंबो

नुकतीच तू आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती जाहिर केलीस. त्या निमित्ताने तुला काही मनातल सांगायचे आहे. म्हणून हा पत्रप्रपंच. तुला माहित असेलच की तुझ्या कसोटी कारकीर्दीचा श्रीगणेशा तू ९ ऑगस्ट १९९० रोजी केलास. ९ ऑगस्ट हा दिवस भारताच्या इतिहासात ऑगस्ट क्रांती दिन म्हणून गणला जातो, अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून. ९ ऑगस्ट रोजी तू पर्दापण केलंस तेव्हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासात एक मानाचं पान तुझ्या नावाने नक्कीच असणार याची पुसटशी कल्पनाही क्रिकेट रसिकांना नव्हती. निवृत्ती जाहिर केलीस तोवर तू तब्बल १८ वर्षे क्रिकेट खेळला होतास. कसोटी आणि एकदिवसीय सामने मिळवता तू तब्बल पंचावन्न हजारांपेक्षा जास्त चेंडू टाकले होतेस. बळी होते कसोटी क्रिकेट मध्ये ६१९ आणि एकदिवसीय सामन्यात ३१७. भारतीय क्रिकेट मध्ये तू एक इंन्श्युरन्स पॉलिसी होतास तब्बल १८ वर्षे. १९६० ते १९७० च्या दशकात आपल्या स्पिन डिपार्टमेंटमध्ये बेदी, चंद्रा, प्रसन्ना आणि व्यकंटराघवन नामक चार इंन्श्युरन्स पॉलिसी होत्या. त्या नंतरच्या काळात स्पिन डिपार्टमेंटला कपिलदेव नावाच्या इंन्श्युरन्स पॉलिसीचा आधार होता. त्यानंतरच्या काळात बरेच स्पिनर आयाराम गयाराम म्हणून वावरले, अपवाद फक्त मनिंदर सिंग आणि रवीशास्त्री यांचा. तुझ्या जोडीला खेळलेले स्पिनर्स कधीच ‘हरिभजन’ कुटायला घरी गेलेत. एकटा हरभजनच काय तो तुझ्या सोबत होता/आहे. इन अ क्लास ऑफ इट्स ओन किंवा क्लास बियोंड अ कंपेअर धर्तीच.

पेशाने तू मॅकेनिकल इंजिनिअर म्हणजे Percision आणि Accuracy ह्या दोन गोष्टी ओघाने आल्याच त्यात तू एकदम डिटरमाईड आणि डेडिकेटेङ या गुणासहित टॉपस्पिन, गुगली, लेगब्रेक तू फ्लाईट आणि व्हेरिऐशन ऑफ स्पेस सहीत असे काही टाकायचास कि बरेच फलदांज हँग व्हायचे. Play him as if he is a fast bowler किंवा Play him with ease as he is not great turner of the ball या आणि अशा अनेक थिअरीज विरूध्द संघाच्या कर्णधारांनी, त्यांच्या कोचेसनी आपल्या संघाला सांगितल्या, अशा थिअरी आणणार्‍या त्यांच्या संघातील कित्येक खेळाडूंना तुझ्यासमोर सामुहिक खो-खो खेळतांना बघितले आहे. भारतातल्या तमाम क्रिकेट रसिकांनी अक्रॉस द लाईन खेळणारे भलेभले खेळाडू तुझ्या गोलंदाजीसमोर तसेच खेळतांना गारद होतांना पाहिले आहेत. बॅकफुटवर जात ‘कट’ किंवा ‘पुल’ अशा विचारात असणार्‍या फलंदाजाचा तुझ्या गोलंदाजीवर पत्ता कसा गुल व्हायचा हे सर्वांनी पाहिलेले आहे.

यश आणि त्याच्या जोडीला आलेली प्रसिध्दी व पैसा या सर्व गोष्टी तुझ्याजवळ असतांना उध्दटपणा, दाखवेगिरी याचा लवलेशही तुझ्यात आढळत नाही. क्रिकेट सोडून आणखी कोणत्याही गोष्टीमुळे तू सतत प्रकाशात नाहीस. भरपूर जाहिराती कधी केल्या नाहीस. मैदानावर किंवा मैदानाबाहेर कधीही हमरी तुमरी नाही, म्हणून तू आम्हाला वॉर्न आणि मुरली पेक्षाही वेगळा भासतोस. तुला मिळालेले पदमश्री, अर्जुन, तसेच अनेक पुरस्कार तुझ्या कामगिरीचा दाखला देतात पण सचिनच तुझ्याबद्दलच ‘extremly tough’ हे वाक्य तुझ्याबद्दल खुप काही सांगून जाते. पाकिस्तान विरुध्द फिरोजशहा कोटला मैदानात ७४ धावात १० बळी घेतल्यावर तुझा एक चाहता ‘It couldn’t have happened to a better cricketer’ हे शेर्न वॉर्नचे उदगार तुला एका वेगळयाच उंचीवर नेऊन ठेवतात.

इतक सगळ असताना भारतीय संघाचे कर्णधारपद तुला फार उशिराने मिळालं पण ते ही तू आनंदाने स्विकारलंस आणि छान निभावलस. आँस्टेलियात गेल्यावर्षी सिडनी क्रिकेट कसोटीत झालेल्या तमाशानंतर तुझ्याच नेतृत्वगुणांमुळे पर्थ येथे आपण ऑस्ट्रेलियाला पराभूत केले हे सगळ एखाद्या परिकथेसारख होतं. त्या मालिकेच्या दरम्यान आलेल्या एका पत्रकार परिषदेत तू तमाम ऑस्ट्रेलियन पत्रकाराना only one team played in the sprit of Game हे सांगायला विसरला नाहीस. यातून तुझी संयमी पण करारीवृत्ती दिसून आली. तुझ control agression आणि तितकच straight from heart बोलणं तमाम क्रिकेट रसिकांच्या कायमच स्मरणात राहिल. तुझा इथवरचा प्रवास बघता आय.आय.एम (Indian institute of Management) ने तुला How to ….. up with success power & wealth या विषयावर आपले विचार मांडायला बोलावले तर आश्चर्य वाटून घेऊ नकोस. एखाद्या शायरला तुझ्या कारकिर्दीबद्दल शायरी किंवा गजल लिहायला सांगितली तर त्याच शीषर्क तो नक्कीच ‘कंब्क्त कुबंळे’ ठेवेल याबाबत शंका नाही. Critisism started 18 years ago when people said I could not play two test match for India. Looking back I have done pretty well. I always had strong belive in my abilities. हे तुझ्या शेवटच्या Interview मधील एक वाक्य ‘सो कॉल्ड’ क्रिकेट पंडितांच्या टिकेला न जुमानता सतत १८ वर्षे सकारात्मक क्रिकेट खेळण्याच्या तुझ्या या कामगिरीला त्रिवार सलाम करत हे पत्र संपवतो. तुला व तुझ्या कुटुंबियांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा.

– मंदार माईनकर, मुंबई