पृथ्वीकडून मातीचा सुगंध, पाण्याकडे ओघवतपण,
अग्नीकडून धग आणि लखलखतीपणा,
वा-याकडून सर्वस्पर्शित आणि आकाशाकडून विशालता व सर्वसमावेशकता
हे सर्व गुण घेऊन एकत्र केले तर त्यातून काय साकार होईल?
नक्कीच सुरेश भट यांची गजल.
सुरेश भटजीवन असलेल्या जिवंत गोष्टी या पंचतत्वातून साकार होत असतात. ह्याच अर्थाने भट यांची जिवंत व चैतन्यपूर्ण गजल पंचतत्वातून विविध गुण घेऊन संपन्न झालेली दिसते. काव्या रसिकांच्या ह्दयावर राज्य करणा-या भटांच्या गजलेमुळे रसिकांनी त्यांना काव्यप्रांतातील ‘गजल सम्राट’ हे पद केव्हाच देऊन टाकले आहे.
ह्या गजल सम्राटाची ७६ वी जयंती रवींद्र नाट्यमंदिर येथे दिनांक १६ एप्रिल २००८ रोजी सायंकाळी ७:०० वाजता साजरी करण्याचे आयोजिले आहे. सुरेश भट यांची गजल ही मराठी कवितेच्या वाटेवरचा ‘मैलाचा दगड’ तर आहेच पण त्याचबरोबर मार्गदर्शक दिपस्तंभही आहे. मराठीमध्ये गजल हा प्रकार भटांनी पेरला खरा पण त्याची फळे रसिकांना खायला दिली ती गजल नवाज भीमराव पांचाळे यांनी. गजल सम्राटांच्या निवडक गजला त्यांच्या वाढदिवसानिमित्त गजल नवाज आपल्या मधुर स्वरात रसिकांच्या साक्षीने सादर करतील. त्याच बरोबर भट यांच्या जीवन कार्याचा आढावा हक्काच्या माध्यमातून रसिकांसाठी सादर केले जाईल.
रसिक गजलप्रेमींसाठी सुरेश भट यांच्या वाढदिवसाचा सोहळा साजरा करताना आनंद होत आहे. आपली उपस्थिती कार्यक्रमाची शोभा वाढवेल हे नक्की.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा
इसरानी एंटरटेनमेंट इंडिया लिमीटेड,
१/३, शेरे ए पंजाब सोसायटी,
अंधेरी पूर्व, मुंबई – ९३.
फोन नं.: ९१-०२२-४०९४ १९९९
मोबाईल.नं.: ९८७०६४०१११