तो दिवस होता ८ जुलै १९१०. . .

जुलै १९१० मध्ये सावरकरांना लंडनमध्ये अटक करण्यात आली आणि त्यांच्यावर sedition च्या आरोपाखाली खटला भरण्यासाठी, मुंबई प्रांताच्या गर्व्हनरच्या हुकुमाप्रमाणे, S. S. Morea या बोटीमधून अत्यंत कडक बदोबस्तात मुंबईला रवाना करण्याची व्यवस्था करण्यात आली. बोटीवर वीर सावरकरांवर २४ तास सतत नजर ठेवण्याची खबरदारी घेण्यात आली होती. ती इतकी कडक होती त्याच्यांसाठी असलेल्याना संडासांनासुध्दा नेमक्या ठिकाणी आरसे लावून ते एक क्षणभरसुध्दा पहारेकर्‍यांच्या नजरेआड होणार नाहीत अशी सोय केलेली होती. त्यावेळेच्या पध्दतीप्रमाणे बोट इंग्लंडहून निघाल्यावर फ्रान्समधल्या मार्से (Marselle) या बंदरातंल्या धक्क्याला लागली. सावरकरांनी त्यांच्या पहारेकर्‍यांना आपल्याला प्रांतविधीला जायचं आहे असे सांगितलं. त्याप्रमाणे त्यांना नेण्यात आलं. पण Toliet मध्ये शिरल्याबरोबर त्यांच्या लक्षात आलं की जवळचं एक Port Hole उघडं आहे. सावरकरांना तेवढं पुरे होतं. त्यांनी लगेच आपला गाऊन त्या Toilet ला किल्लीसाठी जे भोक होतं त्यावर अडकवला आणि उघडया Port hole मधून समुद्रात उडी मारली व ते मार्से बंदराच्या धक्क्याची जी भिंत होती त्या दिशेने पोहू लागले. पण थोडयाच वेळात नजर ठेवणार्‍या पोलीसांच्या लक्षात आलं की सावरकरांनी आपल्या हातावर तुरी दिली आहे. त्यांनी ताबडतोब सावरकरांचा पाठलाग सुरू केला. पण सावरकर त्या धक्क्यांच्या भिंतीजवळ पोहोचले आणि अत्यंत थकलेल्या अवस्थेतही ते ती भिंत चढून गेले आणि त्यांनी फ्रान्सच्या सार्वभौम भूमीवर पाय ठेवले. ते स्वत: Barrister असल्यामुळे त्यांना एवढं नक्की माहित होतं की त्यांनी फ्रान्समध्ये कुठलाही गुन्हा केला नसल्यामुळे, फ्रान्समध्ये त्यांना अटक होण्याची अजिबात शक्यता नव्हती, आणि त्यानंतर धक्क्याची उंच भिंत चढून येणं यामुळे ते थकलेही होते. पण तेवढयात त्यांना एक पोलीस दिसला. सावरकर स्वत:ला त्याच्या हवाली करण्यासाठी गेले, पण त्या पोलीसाला इंग्‍लीश येत नव्हतं आणि सावरकरांना फ्रेंच येत नव्हतं. त्यामुळे घोटाळा झाला. तेवढयात पाठलाग करणारे ब्रिटीश पोलीस तेथे येऊन पोहोचले. त्यांनी सरळ सरळ त्या पोलीसाचे हात ओले केले आणि सावरकरांना ताब्यात घेतलं. The rest is history. पण फ्रान्सलामधल्या लोकांना जेव्हा कळलं की ब्रिटीशांनी फ्रान्सच्या सार्वभौमत्वाचा अपमान केला तेव्हा फ्रान्समध्ये तुफान गदारोळ माजला. फ्रेंच सरकारच्या एका उच्च अधिकार्‍याला त्याच्या पदाचा राजीनामाही द्यावा लागला. प्रकरण शेवटी The International Court of Justice, in The Hage पर्यंत गेलं. पण त्याकाळी ब्रिटन हा फारच शक्तीशाली देश होता. त्यामुळे ब्रिटीश सरकारला हे सर्व प्रकरण दडपून टाकता आलं. वीर सावरकरांच्या त्या पराक्रमी उडीला ८ जुलै २०१० रोजी १०० वर्षे पूर्ण होत होती. त्या निमित्ताने त्यांना आदरांजली वाहण्यासाठी महाराष्ट्रातून साधारण २५० ते ३०० लोक इंग्लंडमधून मी, श्री. व सौ. गोडबोले आणि शिकागोहून दामले नावाचे गृहस्थ ८ जुलैला मार्सेला होतो. आम्ही अगोदरपासून आखलेल्या कार्यक्रमाप्रमाणे वीर सावरकरांना आदरांजली वाहिली आणि त्याच रात्री लंडनला परत आलो.

– मनोहर राखे, लंडन