कल्पना करा आपल्या पूर्ण शरीराची किंमत किती असू शकेल? आपला एखादा किंवा अनेक अवयव नादुरुस्त झाले तर? दोन्ही किडन्या निष्क्रिय झालेल्या किंवा अपघातात हात वा पाय गमावलेल्या व्यक्तीला विचारा. किंवा स्वतः अपघातातून सुखरूप वाचल्यानंतर काय वाटते याचे विश्लेषण करा. आपण स्वतःला नशीबवान समजतो. तेव्हा कुठे आपल्याला आपल्या शरीराची किंमत कळते. देवाने आपल्याला पुनर्जन्म दिला असं आपण मानतो. तर हे इतकं मौल्यवान शरीर आणि त्याला अर्थ देणारे, त्याला चालवणारे आपले अवयव यांच मृत्यूपश्चात काय होते? प्रत्येक धर्माच्या प्रथेनुसार मृत मानवी देहाची ‘विल्हेवाट’ लावली जाते. इथेच आपण आपली किंवा जिवलगांची पुनर्जन्माची संधी हिरावून घेतो. होय….मृत्युपश्चात पुनर्जन्म शक्य आहे. अवयवदानाच्या माध्यमातून! आपला अवयव किंवा पेशी एखाद्या गरजू व्यक्तीचे जीवन घडवते त्यात आपलही योगदान ठरत. मरुनही जगण्याची सुवर्णसंधी आणि कोणालातरी जगण्याचं बळ दिल्याचा आनंद, पुण्य पदरात पडून घेण्याइतकं सुख नाहीच!
भारतात अवयवदानाची गरज आणि परिस्थिती
दरवर्षी शेकडो लोक अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत मृत्युमुखी पडतात. कारण प्रत्यारोपण करण्यासाठी लागणाऱ्या अवयवांची कमतरता.
अवयवदात्यांच्या कमतरतेची कारणे
गैरसमज
अवयवदानासाठी आपण काय करू शकतो?
यासाठी कुठलीही वयोमर्यादा नाही. आपल्या पेशी, अवयव आपण दान करू शकतो. काही बाबी ध्यानात घ्याव्या लागतात. त्या म्हणजे व्यक्तीचा मृत्यू कुठे, कसा झाला, त्याचे अवयव, पेशींची सद्यस्थिती कशी आहे?
आपले वय, वैद्यकीय इतिहास पाहून आपण अवयवदानासाठी खूप लहान किंवा वृद्ध आहोत हा (गैर)समज आहे. आपल्याला मृत्यू कधी येईल हे सांगता येत नाही त्यामुळे आपली इच्छा आधीच व्यक्त करून अवयवदानासाठी नोंदणी करणे गरजेचे ठरते.
अवयवदानासाठी नोंदणी कशी करायची?
याशिवाय www.donatelifeindia.org या संकेतस्थळावर अवयवदानाविषयी तुमचे प्रश्न, शंका विचारू शकतात. याठिकाणीही तुम्ही आपली नोंदणी अवयव दानासाठी करू शकता.
संदर्भ – www.donatelifeindia.org
– विशाखा एस. ठाकरे