गुरु पौर्णिमा हा भगवान व्यासांचा जन्मदिवस. आषाढ महिन्यात १५ व्या दिवशी पौर्णिमेला हा दिवस असतो. भगवान वेद व्यासांना असे दिसले की भविष्यात वेदांचा अभ्यास कमीकमी होत जाणार आहे म्हणून त्यांनी वेंदांना सोप्या भाषेत सामान्य लोकांपुढे आणले. काळाप्रमाणे आपल्याला शिकविणा-या शिक्षकांना, आपल्या दैवत असणा-या भगवंताला आपण गुरु मानून त्यांनाच आपले दैवत मानतो. नेटवर त्या संदर्भात आपल्याला माहिती, शुभेच्छापत्र पाहायला मिळतात.
http://en.wikipedia.org/wiki/Guru_Purnima,
http://www.rudraksha-ratna.com/articledt.php?art_id=147,
www.swaminarayan.org/festivals/gurupurnima/index.htm,
http://www.dalsabzi.com/Language_Festivals/guru_purnima.htm,
www.divyajivan.org/articles/siva/gurupurnima_signi.htm,
www.saibaba.org/gurupoor.html,
www.sathyasai.org/calendar/gurup.html
पाऊले चालती पंढरीची वाट
’वारी’ करणारे ते वारकारी. गेले काही दिवसांपासून हे वारकरी ऊन-पावसाची तमा न बाळगता, मुखात फक्त पांडूरंगाचे नाव घेऊन पंढरीची वाट चालत होते. साधा वेष, गळ्यात तुळशीच्या माळा असणारे वारकरी संपूर्ण जगात कुतूहलाचा विषय आहेत. त्यांच्यावर काही परदेशी लोकांचे संशोधनही चालू आहे. त्यांच्या विषयी अधिक जाणून घेण्यासाठी –
http://www.marathiworld.com/sanvar3#palkhi,
http://en.wikipedia.org/wiki/Warkari,
http://www.tukaram.com/pages/lele1.asp, www.tukaram.com/pages/intro4.asp
www.hindubooks.org/temples/maharastra/pandharpur/page22.htm,
www.nandhi.com/jnaneswar.htm, www.carnatica.net/harikatha.htm
विठ्ठल तो आला आला
विठ्ठल हा विष्णूचा अवतार आहे. विटेवर उभी असलेली त्याची सावळी मूर्ती सा-यांवर बापाच्या मायेची नजर फिरवत आहे असा भक्तांचा समज आहे. विठ्ठलाचे मुख्य मंदिर महाराष्ट्रात पंढरपूर येथे आहे. विठ्ठल हे नाव विष्णू नावापासून मिळाले आहे. तर पांडूरंग हे पंढरपूरपासून. पांडूरंगाचा आणखीन एक अर्थ म्हणजे पांढ-या/श्वेत रंगाचा म्हणजेच शिवाचा अवतार. ह्याचा अर्थ विठ्ठल प्रथम शिवाचा आणि मग विष्णूचा अवतार आहे. महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात विठ्ठलाचे भक्त अधिक आहेत. नेटवर ही माहिती वाचायची असल्यास –
www.hindubooks.org/temples/maharastra/pandharpur/index.htm,
http://en.wikipedia.org/wiki/Vitthal, www.tukaram.com/pages/Glossary5.asp,
www.sanathanadharma.com/glory/index.htm, www.tukavipra.org/English/Penance.html
भक्त पुंडलिक
असे म्हणतात पुंडलिका सारखा भक्त सा-या जगतात नाही. कथा अशी आहे की पुंडलिकाचा विवाह झाल्यावर पुंडलिक त्यांच्या मात्यापित्यांशी अत्यंत वाईट वागायचा. एकदा यात्रेला जातांना आपल्या ह्या वाईट कृत्यांचा त्याला साक्षात्कार होतो. तेव्हांपासून आपल्या मातापित्यांची तो अत्यंत मनोभावे सेवा करतो. एकदा मातापित्यांना जेवायला वाढत असतांना प्रत्यक्ष भगवान विष्णू त्याचे दार ठोठवतात. परंतु पुंडलिक हातातले काम टाकून न देता देवाला उभे राहायला एक विट देतो. विष्णू पुंडलिकावर प्रसन्न होतो. तेव्हा पासून विष्णू भगवान विठोबाच्या रुपाने भक्तांसाठी विटेवर उभे आहेत. भक्त पुंडलिका विषयी जाणून घेण्यासाठी –
http://www.gsbkerala.com/panduranga.htm, en.wikipedia.org/wiki/Vitthal,
www.hindubooks.org/temples/maharastra/pandharpur/page4.htm ,
www.sanathanadharma.com/bhakti, www.answers.com/topic/vithoba ,
www.bhagawannityananda.org/bn1.html , www.tukaram.com/pages/Glossary2.asp ,
www.nayna.in/blog, www.shirishshete.com/documentary/warkaris.htm
अंगणातली तुळस
आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात तुळशीचा घमघमाट असतो. विठोबाला प्रिय असणारी ही तुळस लक्ष्मीचे रुप समजली जाते. विष्णू आणि कृष्णाला प्रिय असणा-या तुळशीचा उल्लेख वेदपुराणात आणि चरक संहितेतही सापडतो. तुळशीचे अनेक औषधी उपयोग आयुर्वेदात सांगितले आहेत. तुळशीचा चहा, वाळलेल्या पानांची पावडर, साजूक तुपा बरोबर, किंवा तुळशीची पाने नुसतीच खाल्ली जातात. दिवाळी नंतर होणारे तुळशीचे लग्नही धामधूमीत पार पाडले जाते. अशी ही प्रत्येकाच्या दारात असणारी तुळस मात्र विठोबाच्या गळयात दिमाखात असते. राम आणि कृष्ण तुळस अश्या दोन प्रकारात असणारी ही तुळस ’ इंडियन होली बसील’ नावाने ओळखली जाते –
en.wikipedia.org/wiki/Ocimum_tenuiflorum,
www.organicindia.com/tulsi-facts.php,
www.organicindia.com,
www.ayurvediccure.com/tulsi.htm,
www.omorganics.com/tulsi_article, www.hindunet.org/day_as_hindu/tulsi.htm,
www.yogamag.net/archives/1981/2feb81/tulsi.shtml, www.holy-basil.com,
www.boloji.com/environment/32.htm
आषाढस्य दिवसे
आषाढ महिन्याची सुरुवात झाली की ‘कालिदास’ ह्या विद्वान कवी-लेखकाची हटकून आठवण येते. भारतात ठिकठिकाणी, श्रध्दांजली म्हणून नाटक, कवितेचे आयोजन केले जाते. ‘मेघदूत’, ‘कुमारसंभव’, ‘रघूवंश’, ‘शाकूंतल’, ‘ऋतुसंहार’ अश्या अनेक अमर कलाकृती लिहिणारा कालिदास संस्कृतचा गाढा पंडित होता. कालिदासाच्या खाजगी आयुष्याबद्दल फारशी माहिती नाही पण त्याच्या विषयी असणा-या अनेक आख्यायिका आहेत. नेटवर त्याच्या विषयी बरीच माहिती सापडते –
http://en.wikipedia.org/wiki/Kalidasa, www.yogaworld.org/amazing/kalidas.htm,
http://www.freeindia.org/biographies/greatpoets/kalidas/page1.htm,
www.geocities.com/desirajuhrao/RS/sarga1/rs_1_frame.htm,
www.indiaparenting.com/articles/data/art40_001.shtml, http://sanskrituni.net
www.aryabhatt.com/fast_fair_festival/Festivals/The%20Kalidas%20Festival.htm
– सौ. भाग्यश्री केंगे