स्वयंपाक हे फक्त स्त्रियांचे कार्यक्षेत्र नसून आता पुरुषही तितक्याच रुचीने ह्या कलेत सहभागी होतात. ग्लोबलाझेशनच्या ह्या जमान्यात आपले स्वयंपाकघर फक्त पारंपारिक पाककृतीं पर्यंत मर्यादीत राहीले नसून परप्रांतीय आणि परदेशीय रेसिपीज आवर्जून केल्या जातात. त्यामुळे आता स्वयंपाकघराच्या कक्षा अधिक रुंदावल्या आहेत. ह्यासाठी नेटवर अनेक साईट्सवर रेसिपीज शिकता येतात. एखाद्या रेसिपीसाठी लागणारे पदार्थ, त्यांचे प्रमाण, करतांना घ्यायची काळजी अश्या अनेक गोष्टी आपल्याला वाचायला मिळतात. त्यामुळे पदार्थ करणे अधिक सोप्पे जाते. लज्जदार रेसिपीजसाठी पुढील साईट्स बघायलाच हव्यात –
www.aayisrecipes.com, www.sanjeevkapoor.com,
www.bawarchi.com, www.tarladalal.com,
www.awesomecuisine.com, www.recipesindian.com,
www.food.sify.com, www.kitchensofindia.com,
www.aaiskitchen.blogspot.com
मराठी ‘ग्लॉसरी’
परदेशात गेलेली मराठी मंडळी विशेषता तरुण पिढी घरच्या स्वयंपाकाची चव ‘मीस’ करतात. त्यामुळे थोडेफार प्रयोगही त्यांच्या आधुनिक स्वयंपाकघरात केले जातात. अहो पण जिन्नसांची अचूक नाव तर माहिती हवी ना. मसाल्यात असलेल्या ‘दगड फुलाला ‘ इंग्रजीत ‘ स्टार अनिझ’, ‘ डाळींब्यांना ‘ ‘फिल्ड बीन्स’, ‘ जवाला’ ‘बार्ली’ म्हणतात. आणखीन कितीतरी नावे माहिती करुन घ्यायची असल्यास http://www.mumbai-masala.com/glossary/jglossary.html,
http://www.cuisinecuisine.com/Glossary.htm, http://www.rangat.com/foodcorner/glossaryl.asp
ह्या साईटच्या सहाय्याने परदेशातल्या दुकानातून वस्तू खरेदी करुन तुम्ही सहज मराठी पदार्थ करु शकता.
केक्स
ख्रिसमसच्या सणाला केकचे एखाद्या पकवान्ना इतके महत्त्व आहे. मुख्यता मैदा, साखर आणि लोण्यापासून तयार होणारा हा पाश्चिमात्य पदार्थ भारतात चांगलाच रुळला आहे. अंडवापरुन किंवा नवापरताही हा वेगवेगळ्या फ्लेवर्स मध्ये तयार करता येतो. घरी करता येण्याजोगा असला तरी बाजारात ब्रॅंडेड केकही उपलब्ध आहेत. केकच्या विविध पाककृती शिकायच्या असल्यास ह्या साईट्स जरुर बघायला हव्यात –
www.creativecakes.com, www.recipes4cakes.com, cake.allrecipes.com,
www.bestcookrecipes.com, cake.betterrecipes.com, www.recipezaar.com/recipes/cakes,
www.bestcookrecipes.com, www.cooksrecipes.com/category/cake.html,
www.recipelink.com/rcpcake.html, www.vegansociety.com/html/food/recipes/cakes.php,
www.joyofbaking.com/cakes.html
“अमूल दूध पिता है इंडिया”
आपल्या आयुष्याचा महत्तवाचा घटक असणारे दूध, आरोग्यासाठीही तितकेच मह्त्तवाचे. दूध घालणारा गवळी ते पिशवी आणि टेट्रा पॅक मध्ये मिळणारे ‘फ्लेवर्ड मिल्क’ असा दूधाचा प्रवास आहे. दूधाचे वितरण योग्य पध्द्तीने तसेच योग्य भावात व्हावे ह्या साठी ‘ नॅशनल डेअरी डेव्हल्पमेंट बोर्ड ‘ ची स्थापना झाली. त्यांची साईट आहे http://www.milkmagic.com भारतातले सर्वात मोठे वितरक ‘ अमूल ‘. अमूलची माहिती आपल्याला www.amul.com वर मिळते. ही साईट माहितीपूर्ण असून त्यावर अमूलची उत्पादने, दूधाच्या पाकक्रुती, मिळालेल्या पुरस्कारांची माहिती आहे. दूधाचा अजून एक मोठा ब्रॅंड म्हणजे ‘नेसले इंडिया ‘ दूधाविषयी रंजक माहिती वाचायची असल्यास
http://www.nestle.in, en.wikipedia.org/wiki/Milk, www.whymilk.com,
www.indianmilkproducts.com, www.iloveindia.com/nutrition/milk/index.html,
www.milkdelivers.org/nutrition/index.cfm, www.doctorndtv.com/faq/detailfaq.asp?id=11852
ई-शॉपिंग
इंटरनेट वरुन खरेदी ही आता रुढ होत चाललेली संस्कृती आहे. परदेशी तसेच मायदेशी अनेक कंपन्या ह्या ऑनलाईन व्यवसायात आहेत. आपण दुकानात जातो तसेच ह्या शॉपिंग वेबसाईटवर जायचे, हवी असलेली वस्तू निवडायची, क्रेडीट कार्डने पैसे भरायचे. आपल्या घरी वस्तू ह्जर होते. ऑनलाईन शॉपिंगमुळे आपला वेळ तर वाचतोच पण बरेचवेळा चांगले ‘डील’ मिळते. समजा काही चूक झाली किंवा तक्रार असल्यास फोन किंवा ईमेलने नोंदवता येते. चला तर मग.
www.nashik.com, www.rediff.com, www.ebay.com, www.amazon.com,
www.shopping.indiatimes.com वरच्या ई-दुकानांना भेट देऊ या. इंटरनेटवर खरेदी करण्याआधी ‘ साईट सिक्यूरिटीचे ‘ चिन्ह मात्र जरुर तपासून घ्या.
जीवनसाथी
चहापोहे घेऊन लाजत येणारी उपवर कन्या ते इंटरनेटवर थेट आपल्या अपेक्षा सांगणारी स्मार्ट ‘वुड बी ब्राइड’ … लग्न सोहळ्यातला हा बदल आता सर्वांनीच स्विकारला आहे. आपला ‘ बेटर हॉफ’ शोधण्यासाठी नेटवर अनेक वेबसाईट्स उपलब्ध आहेत जसे की www.bharatmatrimony.com, www.shaadi.com, www.jeevansathi.com,
www.rohini-marriageworld.com, http://www.anuroopwiwaha.com इत्यादी.
ह्या साइटवर प्रथम उपवर वधु-वरांची नोंदणी करावी लागते. त्यातच आपल्या अपेक्षा लिहीता येतात. प्रत्येक नोंदणी धारकांना एक ‘ आयडी’ किंवा क्रमांक दिला जातो. त्या द्वारे एकमेकांशी संपर्क साधता येतो. आपण नोंदणी धारक नसाल तरी आपल्या हवे असल्यास आपण आपल्या हवी असलेली स्थळे पाहू शकता. प्रत्येक जाती व धर्माची स्थळे उपलब्ध आहेत. तर मग आता लग्नाची चिंता सोडा आणि मॅट्रिमोनियल साइट्सना लॉग इन करा.
– सौ. भाग्यश्री केंगे