हे राम

भारताच्या इतिहासात महात्मा गांधींचे नाव सुवर्ण अक्षरात लिहीले गेले आहे. सत्य आणि अहिंसा ही दोन मुल्ये त्यांनी आयुष्यभर जपली आणि आपल्या बरोबरच्या सहका-यांनाही त्याचे पालन करायला लावले. चरख्यावर आपले सूत स्वतः कातणारे, शुध्द शाकाहारी असणारे गांधीजी सत्याग्रही होते. लंड्नला कायदा शिक्षण पूर्ण केल्यावर ख-या अर्थाने त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला आणि आयुष्यभर त्यासाठीच झटले. फक्त भारतातच नव्हे तर सा-या जगभर त्यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांच्यावर अनेक पुस्तके, साहित्य आणि चित्रपट निघाले आहेत. भारताचे पितामह म्हणून गौरवले गेलेल्या बापूंविषयी अधिक माहितीसाठी –

en.wikipedia.org/wiki/Mahatma_Gandhi,
www.kamat.com/mmgandhi/gandhi.htm,
www.sscnet.ucla.edu/southasia/History/Gandhi/gandhi.html,
www.quotationspage.com/quotes/Mahatma_Gandhi,
www.mkgandhi-sarvodaya.org,
www.gandhiserve.org,
www.indianchild.com/mahatma_gandhi.htm,
www.iloveindia.com/indian-heroes/mahatma-gandhi/index.html,
www.lucidcafe.com/library/95oct/mkgandhi.html,
www.kamat.com/mmgandhi/mkgtimeline.htm

जय जवान, जय किसान
पाकिस्तानशी युध्दा दरम्यान “जय जवान, जय किसान” चा नारा देणारे लाल बहाद्दूर शास्त्री एक प्रमुख स्वातंत्र्य सेनानी होते. दोन ऑक्टोंबर रोजी त्यांची जयंती . लाल बहाद्दूर शास्त्री स्वतंत्र भारताचे तिसरे पंतप्रधान होते. १९०४ साली, रामनगर, वाराणसी येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे खरे नाव लाल बहाद्दूर श्रीवास्तव परंतु जातीयभेदा विरुध्द असणा-या लाल बहाद्दूर शास्त्रींना आडनावातून जात समजणे मान्य नव्हते म्हणून त्यांनी आडनाव लावणे बंद केले. महात्मा गांधींच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला. लोकमान्य टिळकांचाही त्यांच्यावर प्रभाव होता. १९६६ मध्ये ताश्कंद करार केल्या नंतर दुस-या दिवशी म्हणजे ११ जानेवारी रोजी त्यांचा हृद्यरोगाने मृत्यू झाला. ह्या नेत्या विषयी अधिक माहितीसाठी –
http://en.wikipedia.org/wiki/Lal_Bahadur_Shastri,
www.freeindia.org/biographies/greatleaders/shastri,
www.liveindia.com/freedomfighters/LalBahadurShastri.html,
www.sscnet.ucla.edu/southasia/History/Independent/Shastri.html,
www.ceeby.com/people/lalbahadurshastri.cfm, www.kamat.com/kalranga/freedom/shastri.htm,
www.indiaparenting.com/stories/greatindians/gi009.shtml

कस्तूरबा गांधी
प्रत्येक यशस्वी पुरुषामागे त्याची स्त्री खंबीरपणे उभी असते. कस्तूरबा गांधीनी सुध्दा महात्मा गांधींच्या संपूर्ण कार्यात त्यांना मोलाची साथ दिली होती. त्यांना सारे भारतीय प्रेमाने ‘बा’ म्हणत. पोरबंदर येथे कस्तूरबा गोकूळदास माखर्जीचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी मोहनदास करमचंद गांधीशी झाला. विवाहा नंतर गांधीजींनी त्यांना साक्षर केले. कित्येक वेळा त्यांना गांधींचे विचार पटत नसले तरी त्यांनी गांधीजीच्या स्वातंत्र लढ्यात त्यांना मोलाची साथ दिली. त्यांनी त्या काळात स्त्रिया आणि मुलांना साक्षरतेचे, स्वच्छतेचे धडे दिले. हरिलाल, मणिलाल, रामदास, देवदास अश्या चार मुलांच्या त्या आई होत्या. कस्तूरबा गांधी विषयी अधिक माहितीसाठी
en.wikipedia.org/wiki/Kasturba_Gandhi, rrtd.nic.in/kasturbagandhi.html,
www.sscnet.ucla.edu/southasia/History/Gandhi/Kasturba.html,
www.gandhi-manibhavan.org/aboutgandhi/photographs_kasturba.htm,
www.iloveindia.com/indian-heroes/kasturba-gandhi.html,
www.virtualpune.com/html/localguide/attractions/html/aga_khan_palace.shtml

गांधी चित्रपट
अनेक पुरस्कारांने सन्मानित १९८२ साली आलेला ‘गांधी’ चित्रपट मोहनदास करमचंद गांधीजींचा जीवनपट उलगडून दाखवतो. भारत आणि इंग्लंड मधल्या कंपनींनी ह्या चित्रपटाची निर्मिती केली होती. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक होते रिचर्ड ऍटेनबेरो. तर गांधीजींच्या अजरामर भूमिकेत होते परदेशी नट बेन किंग्जले. त्यांना ह्या चित्रपटातल्या अभिनयासाठी ‘ऍकॅडेमी’ पुरस्कार मिळाला तर भानू अथय्या ह्यांना प्रतिष्ठेचा ‘ऑस्कर’ पुरस्कार. रोहिणी हटंगडी ह्यांनी साकारलेली कस्तूरबा गांधींजी भूमिकाही अजरामर होती. ह्या चित्रपटाविषयी नेटवर बरीच माहिती सापडते –
en.wikipedia.org/wiki/Gandhi_(film), www.imdb.com/title/tt0083987,
www.thecityreview.com/gandhi.html, www.flickfilosopher.com/oscars/bestpix/gandhi.html,
homevideo.about.com/library/weekly/aa090901a.htm, www.mahatmagandhiji.com/ve.html,
video.google.com/videoplay?docid=8859891538096241080,
www.film.u-net.com/Movies/Reviews/Gandhi.html, movies.yahoo.com/movie/1800069218/info

गांधीगिरी
राजकुमार हिरानींच्या ‘लगे रहो मुन्नाभाई’ ह्या चित्रपटाने गांधीगिरीची संकल्पना नवीन पिढी पुढे आणली. अत्याचार झाल्यास प्रत्येकवेळी हिंसेने नव्हे तर अहिंसेनेही जगाला चांगले वळण लावता येते हे दाखवून दिले. संपूर्ण देशात गांधीगिरीचे उत्सफूर्त स्वागत झाले. समाजाने त्यातील काही गोष्टी आचरणातही आणल्या. नेटवर चित्रपटाच्या अनेक साईट्स आणि फॅन्स ब्लॉग्सवर माहिती, छायाचित्र उपलब्ध आहे –
www.lagerahomunnabhai.com, www.imdb.com/Title?0456144,
en.wikipedia.org/wiki/Lage_Raho_Munna_Bhai,
www.apunkachoice.com/movies/mov782/, www.indiafm.com/movies/review/12567/index.html,
123india.santabanta.com/category.asp?catid=1251,
www.dishant.com/album/Lage-Raho-Munna-Bhai.html,
www.bollyfm.net/temp/mp3/m-l/lagerahomunnabhai.php,
www.masti4india.com/Hindi_songs/lage-raho-munnabhai.html,
www.glamsham.com/download/wallpaper/wallpaperdetails.asp?cat=12&wall=529

– सौ. भाग्यश्री केंगे