वेगळ्या शाळा

रोजचा अभ्यास वेगळ्या पध्दतीने तुम्हाला शिकायला मिळणार असेल तर? अभ्यासाच्या जोडीला मातीकाम, चित्रकला, कविता वाचन, अभिनय ह्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव करता आला तर शिक्षण अधिक मनोरंजक होईल ह्यात शंकाच नाही. वेगळ्या वाटेने जाणा-या ह्या शाळांमधे प्रत्येक विद्यार्थ्याच्या जाणिवा अधिक समृध्द होतात. त्यांचा शारिरीक, भावनिक, बौध्दीक विकास अधिक प्रगल्भ होतो ह्यात शंकाच नाही. ही आणि अशी आणखीन गंमतजंमत अनुभवायची असेल तर ह्या वेगळ्या शाळांच्या वेबसाईटला जरुर भेट द्यायला हवी –

http://www.anandniketan.ac.in,
www.tridha.com,
timesofindia.indiatimes.com/articleshow/164496.cms,
www.multiworld.org/taleemnet/eresources/aksharanandan.htm,
www.multiworld.org/taleemnet/vernedu/9ver_educa_lila.pdf,
www.palakneeti.org/mahitighar.htm

गोईंग टू स्कूल

शहरातल्या मुलांच्या शाळेचं रुटीन अगदी ‘सेट’ असत. ठराविक वेळेला स्कूल बस किंवा रिक्षाने त्यांचा प्रवास होतो. तुम्हाला महिती आहेका की भारतातल्या कित्येक गावातली मुलं चालत, उंटावर, बैलगाडीतून किंवा शिका-यात आणि बोटीतूनही शाळेत जातात. खरं नाहीना वाटत? मग तुम्हाला पोगो चॅनलवरचा गोईंग टू स्कूल हा कार्यक्रम पाहयलाच हवा. गोईंग टू स्कूल हा खेडयातल्या मुलांना शाळेत पाठवण्यासाठी प्रोस्ताहन देणारा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. http://www.goingtoschool.com ह्या साईटवर त्याची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. साईटला लॉगइन होताच सायकलीवर मुलांना घेऊन जाणारा कार्टून दिसतो. साईटची आतील पानेही संपूर्णपणे रंगीत आहेत. त्यामध्ये प्रकल्पाची संपूर्ण माहिती दिली आहे. तसेच प्रकल्पाला हातभार लावण्यासाठी आव्हान केले आहे. तर मग तुम्ही सुध्दा ह्या प्रकल्पाला जरुर मदत करा.

गोईंग टू स्कूल

शाळा सुरु व्हायची वेळ आली की साहित्य खरेदी आणि जमवाजमवीला सुरुवात होते. त्यामध्ये पेन्सिली, खोडरबर, भूमिती साहित्य, वह्या, पुस्तके सा-याची एकच गर्दी असते. नेटवरही अनेक कंपन्या आणि दुकाने सज्ज झाली आहेत. प्रत्येकाच्या साईटवर उपलब्ध मालाची माहिती, प्रकार, दर्जा तसेच किमतीही दिल्या आहेत. साहित्याची ऑनलाईन खरेदी केली नाही तरी नेटवरच्या ह्या साईट जरुर बघा. तुम्हा बाजारात आलेल्या नवीन उत्पादनांची माहिती जरुर कळेल –
http://www.camlin.com,
www.adorostationery.com ,
http://cspl.tradeindia.com,
www.mitsu.info,
www.tradeindia.com/manufacturers/indianmanufacturers/school-stationery.html ,
www.giftsnaccessories.com/back-to-school/1894.htm,
www.stationarymart.com/aboutus.htm

शाळा प्रकाशने

पाठयक्रमात असणारी सुंदर चित्रांची पुस्तके, विविध व्यवसाय, गणिते, व्याकरण हे सारे आपल्या मुलांची अभ्यासातली गोडी अधिकच वाढवतात. शाळा प्रकाशनातील अग्रगण्य नाव म्हणजे नवनीत प्रकाशन. ह्या प्रकाशनाची संपूर्ण माहिती http://www.navneet.com साईटवर आहे. त्याचप्रमाणे इतर प्रकाशनाच्या साईट बघायच्या असल्यास –
www.isb.edu/media/Communications_team.shtml,
www.schoolofmicrofinance.org,
www.ias.ac.in/currsci/apr252003/1154.pdf,
www.ismdhanbad.ac.in/depart/management/faculty.htm,
www.iirs-nrsa.gov.in/dr_mitra.htm,
www.mguniversity.edu/schoole_nvironmental/silt.htm,
www.kamat.com/database/journals/index.htm,
www.hbcse.tifr.res.in/Data/ObjectType/r/rsh_pub/viewObjectType

स्कूल चले हम

सर्व शिक्षा अभियान अंतर्गत भारतातील प्रत्येक बालकाला शाळेला जायला मिळायलाच हवे असे भारत सरकारचे प्रयत्न आहे. त्या दृष्टिने प्रयत्न म्हणून ‘स्कूल चले हम’ ही चित्रफित रेडिओ, दूरदर्शन, खाजगी वाहिन्यांवर दाखविण्यात येते. भारतबाला निर्मित, शंकर, ईशान, लॉय ह्यांचे कर्णमधूर संगीत आणि उत्साहाने सळसळणारी मुलं… हा व्हिडीयो अव्वल दर्जाचा झाला आहे. इतका की इंटरनेटवरच्या अनेक ब्लॉग्ज मध्ये ह्याला खूप मागणी आहे. ‘यू टयूब’ सारख्या साईटवर व्हिडीयोचा काही भाग बघण्यासाठी उपलब्ध आहे. फक्त गाणे एकायचे असेल तर –
http://braindose.com/dd/school-chale-hum.html खालिल काही ब्लॉग्जना भेट जरुर भेट द्या –
www.mumbai-central.com/nukkad/may2006/msg00039.html ,
www.arjunprabhu.com/blog/archives/2006/10/18/school-chale-hum/,
ashwinnaik.com/blog/?p=79 ,
www.venturewoods.org/index.php/2006/08/24/school-chale-hum/ ,
themanwhowrote.blogspot.com/2006/09/school-chale-hum.html ,
youtube.com/watch?v=XSvb1V7YNkc

सर्व शिक्षा अभियान

सर्व शिक्षा अभियान हे भारत सरकारचा महत्त्वाचा प्रकल्प आहे. ६ ते १४ वर्षांतील मुलांना शिक्षण मोफत मिळालच पाहिजे ह्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी दूरच्या खेडयापाडयात अनेक शाळा उघाडल्या आहेत. शाळेत चांगल्या शिक्षिका, प्यायचे स्वच्छ पाणी, शौचालये, पुरेशी जागा ह्या सोयींकडेही सरकारचे लक्ष आहे. त्यांच्या सर्व योजनांची माहिती नेटवर उपलब्ध आहे. जरुर पहा –
http://ssa.nic.in,
www.education.nic.in/ssa/ssa_1.asp ,
www.un.org.in/JANSHALA/Oct-Dec2000/sarva.htm ,
www.azimpremjifoundation.org/downloads/SarvaShikshaAbhiyan.pdf ,
www.ssa.mp.gov.in,
www.ssameghalaya.com