मधल्या वेळचे पदार्थ

खजुराची बर्फी

khajur-barfi साहित्य – १०० ग्रॅम खजूर, ५० ग्रॅम खोबरा किस, अक्रोड व काजूचे तुकडे, विलायची पूड.

कृती – खजूराच्या बी काढून बारीक तुकडे करणे, कुकरमध्ये एका उभ्या बंद स्टीलच्या डब्यात हे तुकडे घालून २ शिट्या होऊ द्याव्या. कुकर थंड झाल्यावर त्या तुकडयांमध्ये इतर साहित्य घालावे व मिश्रण चांगले एकजीव करून त्याचा रोल करावा. हा रोल अर्धा तास फ्रिजमध्ये ठेऊन नंतर सुरीने हव्या तश्या वडया कापाव्या.

याची चव चॉकलेटसारखी लागते, त्यामुळे मुलांना चॉकलेट ऐवजी ही सात्वीक बर्फी देऊ शकतो.

उकडपेंडी

साहित्य – २ वाटया गव्हाची जाडसर कणीक, ४-५ चमचे चिंच-गुळाचे पाणी १ मोठा कांदा, ४-५ हिरव्या मिरच्या, फोडणीसाठी ३ चमचे तेल, मोहरी-हळद प्रत्येकी १ लहान चमचा, आर्धी वाटी धुवून चिरलेली कोथिंबीर.

कृती – प्रथम जाडसर कणिक रवा भाजतो त्याप्रमाणे कढईत कोरडी भाजून घ्यावा. कांदा बारीक कापावा व हिरव्या मिरच्यांचे तुकडे करावेत. नंतर एका पातेल्यात फोडणी करून त्यात मिरच्यांचे तुकडे, भाजलेली कणीक, चवीपुरते मीठ घालावे. नंतर चिंच-गुळाचे पाणी थोडे टाकून परतून उपम्याप्रमाणे ओलसर होईपर्यंत परतावे. शिजायला हवे असल्यास थोडे साधे पाणीही वरून शिपडांवे. खायला देताना त्यावर कांदा, कोथिंबीर पेरावी.

पोळीचा लाडू

policha-ladooसाहित्य – आदल्या दिवशीच्या किंवा सकाळच्या पोळ्या आवडीनुसार गुळ किंवा साखर आश्यकतेनुसार साजूक तूप.

कृती – आपल्या आवडीनुसार पोळ्या हाताने कुस्करुन किंवा मिक्सर मधून बारीक करुन घ्या. मिक्सरवर पोळ्या अधिक बारीक होतात. त्यात साखर किंवा बारीक चिरलेला गुळ मिसळून घ्यावा. लाडू वळले जातील इतके साजूक तूप त्याच्यात मिसळावे व लाडू वळावे. आवडत असल्यास ह्या लाडूत मनुका, काजू, बदामाचे कापही घालू शकता.

मक्याची उसळ

maka usal साहित्य – ओल्या मक्याचे दाणे, साखर , मीठ, हळद, कोथिंबीर बारीक चिरलेली, ओले खोबरे पाव वाटी, लिंबू चिरून, फोडणीचे साहित्य.

कृती – मक्याचे दाणे मिक्सरमध्ये भरडून घ्यावे एक मिनिटांपेक्षा कमी फिरवावे. फोडणीत हिंग-हळद, हिरवी मिरची घालून वाटलेले मके, मीठ साखर घालून मंद आचेवर वाफ येऊ द्यावी. सर्व्ह करतांना कोथिंबीर व खोबरे घालून खाण्यास द्यावे. लिंबाची फोड ठेवावी. गरम असताना खायला फार मजा येते.