शेती हा भारताचा प्रमुख व्यवसाय म्हणून ओळखले जाते. नांगरणीला शेतीचा कणाच म्हटले तर वावगे ठरणार नाही. शेतीची मशागत करतांना पहिल्यांदा नांगरणीपासूनच सुरवात करावी लागते. त्यामुळेच शेतीची नांगरणी खूप महत्त्वाची ची मानली जाते. शेती करतांना प्रामुख्याने नांगर, मैद, कुळव, केणी,पांभर, कोळपी, या प्रमुख सहा अवजारांचा उपयोग होतो. त्याचबरोबर विळा, कोयता, खुरपे, कुदळ,टिकाव,या साधनांचाही शेतीत उपयोग मोठ्या प्रमाणात होत असतो. पूर्वीच्या काळी शेतीची अवजारे बाभूळ, खैर, सागवान या तीन प्रमुख झाडांच्या लाकडाचा उपयोग करून तयार केली जात. मात्र त्यात आता आधुनिक तंत्रज्ञानाची भर पडल्यामुळे शेती काही अंशी सोपी झाली आहे.
सर्वसाधारणपणे नांगरणी करण्यासाठी अवजारांना सरासरी ओढ खूप महत्त्वाची असते ती खालीलप्रमाणे…..
हलका नांगर – ६७-६८ किलो
मध्यम नांगर -९०-९९ किलो
भारी नांगर – १५० किलो
आता या तीनही नांगरांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे.
हलक्या नांगराने नांगरणी फक्त मुरमाड किंवा खडकाळ जमिनीत केली जाते. हलक्या नांगराने शेत नांगरतांना खूप काही कष्ट घ्यावे लागत नाही कारण हा नांगर ६७ ते ६८ किलो वजनाचा असतो आणि तो ओढण्यास जास्त शक्तीचा वापर करावा लागत नाही. मुरमाड आणि खडकाळ जमिनीत साधारणपणे फळपिकांचे उत्पादन घेतले जाते. नंतर या जमिनीच्या आ-यामध्ये पाणी सोडले जाते त्यामुळे या ठिकाणीची जागा ओलीच राहते म्हणून ह्या ठिकाणी हलक्या नांगरचीच गरज भासत असते. सर्वसाधारणपणे ह्या शेतीत डाळिंब, चिक्कू, शेवगा, आदी पिकांची लागवड केली जाते. या शेतीच्या नांगरणीसाठी वापरण्यात येणारे नांगर हलका नांगर म्हणून ओळखला जाते आणि ह्या नांगराचे वजन ६५-६८ किलोपर्यंत असते.
आपल्याला भुरी किंवा लाल मृदा माहितीच असेल हि मृदा डोंगराळ भागात किंवा सपाट तसेच पठारी प्रदेशात पहावयास मिळते. ही जमीन खडकाळ किंवा मुरमाड जमिनीपेक्षा चांगल्या प्रतीची असते. ह्या मृदेची नांगरणी करण्यासाठी मध्यम नांगराचा उपयोग करतात. साधारण या नांगराचे वजन ९० ते ९९ किलोपर्यंत असते. त्यामुळे जमीन व्यवस्थितरित्या मशागाती योग्य होत असते. अशाप्रकारे तीन प्रकारच्या मृदेला अनुसरून नांगरणी केली जाते आणि या नांगराचा वेगवेगळ्या प्रकारे उपयोगात आणून शेती पेरणीपूर्व मशागातीयोग्य केली जाते.
तसेच काही देशी नांगर विविध भागात वेगवेगळ्या नावाने ओळखले जातात.
१.सोलापूर नांगर.
२.पुणेरी नांगर.
३.भातशेतीतील नांगर.
४.चरोचर नांगर.
५.पंचमहाल नांगर.
६.धारवाडी हलका नांगर.
ही सगळी देशी नांगर असून शेतीत त्यांचा वेगवेगळ्या भागात आपापल्या मर्जीनुसार वापरले जातात. लाकडी अवजारे संपृष्टात आल्यानंतर लोखंडी अवजारे बाजारात आल्यानंतर आता शेती करणे खूपच सोपे झाले आहे.
शेतीची नांगरणी करण्यासाठी साधारणत : आपली शेती कोणत्या प्रकारची आहे हे लक्षात घेतले जाते म्हणजेच काळी कसदार जमीन असेल तर त्यासाठी आपल्याला भारी नांगर वापरावा लागतो. कारण या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्याने पिकांची वाढ झपाट्याने होत असते. त्यामुळे आपण पिकांचे पाणी बंद करतो तेव्हा मात्र या प्रकारच्या जमिनीत नंतर तडे पडतात त्यामुळे ती शेती नांगरण्यासाठी खूप कष्ट घ्यायला लागतात. या जमिनीत भारी नांगराच्या सहाय्याने जमीन नांगरली जाते. या प्रकारच्या नांगराचे वजन हे साधारण १५० किलोपेक्षा जास्त असते. वजन जास्त असल्याने हा नांगर जमिनीत खोलवर जाऊन जास्तीत जास्त माती मिसळविण्यात मदत करतो त्यामुळे उपयोग करतात.