बळीराजा

पारंपारिक पीक पद्धती

pikpaddhati पारंपारिक पीक पद्धतीत शेतात वापरण्यात येणारे सर्व प्रकारचे सेंद्रिय पदार्थ हे त्याच शेतावर तयार केल्या जातात. ह्याकारिता काडी, कचरा, धसकट, तण, जनावरांचे मलमूत्र, अवशेष इत्यादी शेतात कुजवून सेंद्रिय खताची निर्मिती केली जाते. सेंद्रिय खतांचा वापर केल्यामुळे जमिनीची सुपीकता तर वाढतेच शिवाय किडी व रोगांपासून पिकांचे संरक्षण होते. शेतात ताग व धेंचा यासारख्या हिरव्या पिकांची पेरणी करून जमिनीत पुरली जातात. यासाठी बरेचसे शेतकरी बियाणे स्वत: तयार करून जमिनीत पेरत असतात. त्या पिकांचे संगोपन करून पुढील वर्षासाठी पेरणीसाठी बीचा उपयोग केला जातो. त्यामुळे शेतातील ज्या जाती कालानुरूप -हास पावत आहेत त्या जातींचे जतन होऊ शकते.

पारंपारिक पिक पद्धतीच्या वापरामुळे किडी व रोगांचे नैसर्गिक उद्देशाने नियंत्रण होते.

उदाहरणार्थ तुरीतील शेंगा पोखरणा-या अळींचा होणारा त्रास रोखण्यासाठी तूर बारीक शेंगाच्या अवस्थेत असतांनाच तिच्या खोडाच्या भागाला पायाचा हलका दाब देऊन जमिनीकडे झाड वळवितात त्यामुळे अळ्या खाली पडतात. त्याचप्रमाणे कापसाच्या पिकात लाल अंबाडीची एका एकरात २०० किंवा त्यापेक्षा कमीअधिक प्रमाणात झाडांची लागवड करतात त्यामुळे फुलांवर चाल करणा-या कीटकामधे क्रायसोपा या नावाचा मित्र किटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. त्या कीटकामुळे कापसावरील बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी होतो. त्यामुळे या किटकाला कापूस आणि शेतकरी यांच्यातील दुवा मानले जाते. त्याचप्रमाणे कापसाच्या शेतात १० ते १२ ओळीनंतर भगर पेरतात व त्याभोवती मका पेरतात यामुळे अनेक प्रकारची वेगवेगळी कीटके आकर्षित होऊन कोणत्याही प्रकारच्या फवारणीशिवाय कापसाचे चांगले उत्पादन घेता येते.

शेतात दुधी भोपळ्याची झाडे लावल्यास विषाणूपासून होणा-या रोगाचा ब-याच प्रमाणात बंदोबस्त करता येतो. त्याचप्रमाणे टोमॅटो, मिरची पिकांचा सापळा म्हणून झेंडू या पिकाची लागवड करतात. एरंडीची काही झाडे लावल्यास हळदीच्या पिकाच्या जमिनीची धूप कमी होऊन करपा रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो.
कोणत्याही पिकांची लागवड करण्यासाठी किंवा त्या पिकाचे चांगले उत्पादन मिळवण्यासाठी शेतक-यांचा विश्वास असतो की ठराविक दिवशी पिकाची लागवड केल्यास फायदा होतो.

काही ठिकाणी खालिलप्रमाणे लागवड केली जाते –

१. रविवार मुलवर्गाची पिके
२. सोमवारकेळी
४. बुधवारफुलवर्गीय पिके
५. गुरुवारफळवर्गीय पिके
६. शुक्रवारभाजीपाल्यासाठी