पिकातील तण नियंत्रणासाठी पेरणी झाल्यानंतर तीन , सहा , व नऊ आठवड्यांनी कोळपे या अवजाराच्या सहाय्याने शेतीची कोळपणी केली जाते. प्रारंभी पिकांची वाढ संथ गतीने होत असते. त्यामुळे पिकाव्यातिरिक्त तणांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असतो. तसेच पेरणी नंतर सुरुवातीच्या दोन तीन आठवड्याच्या कालावधीत तण नियंत्रण न केल्यास उत्पादनात घ्ट होण्याची शक्यता असते , यासाठी कोळपणी करणे हिताचे मानले जाते.
पिकांतील आतील मशागतीसाठी तसेच पिकला भर देण्यासाठी वापरण्यात येणा-या अवजाराला कोळपे असे म्हणतात. कोळपे हे खूप लहान अवजार असल्याने एका बैलजोडीच्या सहाय्याने दोन किंवा तीन कोळपी चालविता येतात. पिकांची पेरणी ज्या रांगेत केलेली असते तेथे कोळपी त्या अ-यामध्ये शेतकरी वरच्या वर न दाबता कोळपे चालवत असतो. म्हणून बैलांनाही जास्त शक्ती लावण्याची गरज नसते. त्यामुळेच एका जुवाडला तीन कोळपे लावले जाऊ शकतात.
कोळप्याचे अनेक प्रकार ग्रामीण भागात प्रचलित आहेत ते खालीलप्रमाणे…..
१. अखंड फासेचे कोळपे.
२. फटीचे कोळपे
३. अकोला कोळपे
४. मोगी एकचाकी कोळपे
आकाराने लहान व वजनाने हलक्या असलेल्या या प्रकारातील कोळप्याची रचना कूळवासारखी असते. दोन ओळीतील अंतर ३० सेंटीमीटरपेक्षा जास्त असलेल्या पिकास या कोळप्याचा वापर फायदेशीर ठरतो. कोळप्याची फास दोन ओळींच्या मधून जात असतांना सर्व प्रकारचे तण निर्मूलन होऊन काही प्रमाणात पिकला भर लावली जाते. एका बैलजोडीवर दोन ते तीन कोळपी सहज चालवता येतात.
शेतीची नांगरणी करण्यासाठी साधारणत: आपली शेती कोणत्या प्रकारची आहे हे लक्षात घेतले जाते म्हणजेच काळी कसदार जमीन असेल तर त्यासाठी आपल्याला भारी नांगर वापरावा लागतो. कारण या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्याने पिकांची वाढ झपाट्याने होत असते. त्यामुळे आपण पिकांचे पाणी बंद करतो तेव्हा मात्र या प्रकारच्या जमिनीत नंतर तडे पडतात त्यामुळे ती शेती नांगरण्यासाठी खूप कष्ट घ्यायला लागतात . या जमिनीत भारी नांगराच्या सहाय्याने जमीन नांगरली जाते. या प्रकारच्या नांगराचे वजन हे साधारण १५० किलोपेक्षा जास्त असते. वजन जास्त असल्याने हा नांगर जमिनीत खोलवर जाऊन जास्तीत जास्त माती मिसळविण्यात मदत करतो त्यामुळे उपयोग करतात.
लाकडी किंवा लोखंडी पट्ट्याच्या दिंडामध्ये खालच्या टोकाला त्रिकोणी आकार दिलेले दोन फण या अवजारात बसवलेले असतात. त्यांच्यामध्ये परंतु दिंडापासून पुढे थोड्या अंतरावर दांडीवर आणखी एक फण बसवलेला असतो. अशाप्रकारे अकोला कोळप्याला तीन फण बसून कोळपणीचे काम केले जाते. लोखंडी कोळप्यात फणातील अंतर कमी जास्त करण्याची सोय असते.
या प्रकारच्या कोळप्याची निर्मिती नंदुरबार येथील कृषिविज्ञान केंद्राने केलेली आहे. सात किलो वजनाच्या या कोळप्यामुळे तण काढण्याचे काम सुलभ झालेले आहे. आदिवासींची देवता असलेल्या “याहामोगी ” हे नाव या कोळप्याला देण्यात आलेले आहे. तणामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी व एकचाकी कोळप्याचा जन्म झाला आहे.